• स्क्रीन रीडर प्रवेश
  • A-AA+
  • NotificationWeb

    Title should not be more than 100 characters.


    0

Asset Publisher

रायगड किल्ला (रायगड)

रायगड, हा एक असा किल्ला ज्याला युरोपियन लोकांद्वारे ‘पूर्वेचे जिब्राल्टर’ म्हणूनही ओळखले जात होते, हा एक भव्य किल्ला आहे जो एकेकाळी मराठा साम्राज्याची राजधानीही होता. पूर्वी रायरी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या किल्ल्याला मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी ‘रायगड’ म्हणजेच ‘रॉयल फोर्ट’ असे नाव दिले.
    
जिल्हे/प्रदेश    

रायगड जिल्हा, महाराष्ट्र, भारत.

इतिहास    
छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला १६५६ मध्ये पश्चिम घाटाच्या एका भागावर राज्य करणारे सरंजामदार चंद्रराव मोरे यांच्याशी झालेल्या लढाईत जिंकून घेतला. किल्ल्याचा प्रचंड आकार, तीव्र उतार आणि मुख्य भूभाग आणि समुद्राशी सुलभ दळणवळण यामुळे, छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६२ मध्ये हा किल्ला आपली राजधानी म्हणून निवडला.
त्यानंतर त्यांनी कल्याणचे राज्यपाल आबाजी सोनदेव आणि वास्तुविशारद हिरोजी इंदुलकर यांना राजेशाही आणि सार्वजनिक इमारतींनी किल्ला सुशोभित करण्यास सांगितले. किल्ल्यावर सुमारे ३०० दगडी घरे, वाड्या, राजवाडे, कार्यालये, एक नाणे टांकसाळ, २००० माणसे बसणारी चौकी आणि एक मैल लांब असलेली बाजारपेठ होती. बागा, वाटा, खांब, तलाव, बुरुजांनी किल्ला सुशोभित केला होता. तसेच सर्वसामान्य आणि मान्यवरांची निवासस्थाने देखील होती. 
किल्ल्याची तटबंदी आणि संरक्षण अशा प्रकारे तयार केले गेले होते की ते कुटुंब आणि आप्तेष्ठांसाठी तिथे प्रवेश होता परंतु शत्रूंना आत प्रवेश करणे अशक्य होते.
किल्ल्याला अभेद्य करण्यासाठी बांधलेला असाच एक बुरुज म्हणजे हिरकणी बुरुज. बुरुजच्या उत्पत्तीमागे एक मनोरंजक कथा आहे. हिरकणी नावाच्या दूध विकणारी महिला कोजागिरी पौर्णिमेला दूध विकण्यासाठी गडावर जात होत्या. त्यांचे घर गडाच्या पायथ्याशी होते. त्या दिवशी त्यांना उशीर झाला आणि सूर्यास्तानंतर किल्ल्याचे दरवाजे बंद झाले. त्यांचे तान्हे मूल घरी एकटेच त्यांची वाट पाहत असल्याने त्यांनी सुरक्षा रक्षकाला गड उतार होण्यासाठी परवानगी द्यावी यासाठी विनंती केली. तथापि, रक्षकाने नकार दिला आणि हिरकणीनी त्यांच्या मुलापर्यंत पोहोचण्याच्या दुसरा मार्गाचा विचार केला. त्या तीव्र उतारावरून उतरू लागल्या आणि घराकडे निघाल्या. सकाळी जेव्हा द्वार उघडले आणि पहारेकरी हिरकणींना शोधायला आले तेव्हा त्या निघून गेल्या होत्या आणि ही बातमी छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचली.  ते त्यांच्या इच्छाशक्तीने प्रभावित झाले आणि त्यांनी ‘हिरकणी बुरुज’ नावाच्या ठिकाणावरून एक बुरुज बांधला व त्यांना बक्षीस दिले. 
गडावरील अनेक रचना अवशेष रूपात आहेत. शेकडो चौथरे निवासी रचनेची स्पष्टीकरणे देतात. गडावर शाही वास्तूंचा मुख्य परिसर आजही पाहायला मिळतो. सदर म्हणून ओळखला जाणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा मुख्य दरबार आणि शाही निवासस्थान एकमेकांना लागून आहेत. सदर हे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचे ठिकाण आहे. हा एक वास्तुशास्त्राचा चमत्कार मानला जातो. यापासून काही अंतरावर प्रधानांचे निवासी संकुल आहे. धान्य कोठार म्हणून ओळखल्या जाणार्या काही दगडी रचना आहेत.
गंगासागर या नावाने ओळखला जाणारा मोठा जलसाठा आहे. त्यापासून काही अंतरावर एक मोठी बाजारपेठही दिसते.
गडावरील संरचनात्मक संकुलांपैकी जगदीश्वर मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी हे सर्वात महत्त्वाचे आहे.

भूगोल    
रायगड हा सह्याद्री पर्वत रांगांमध्ये किंवा पश्चिम घाटात वसलेला एक डोंगरी किल्ला आहे. येथील तीव्र उतार हि त्याची मुख्य भौगोलिक ओळख आहे तसेच समुद्रसपाटीपासून २८५१ फूट उंचीवर आहे. गडाचा माथा पूर्वेकडून पश्चिमेकडे सुमारे २.५ किमी आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे १.६ किमी पसरलेला आहे.

हवामान/वातावरण     
या प्रदेशातील प्रमुख हवामान अति पर्जन्यमान आहे, कोकण पट्ट्यात पाऊस जास्त पडतो (सुमारे २५०० मिमी ते ४५०० मिमी पर्यंत) आणि हवामान दमट आणि उबदार असते. या हंगामात तापमान सुमारे ३० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते.
उन्हाळा उष्ण आणि दमट असतो आणि तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते.
तसेच या प्रदेशातील हिवाळ्यातील तुलनेने सौम्य हवामान (सुमारे २८ अंश सेल्सिअस) असते आणि हवामान थंड आणि कोरडे राहते.

करावयाच्या गोष्टी    
रायगडावर पाहण्यासारख्या पुढील पुरातन वास्तू रचना आहेत. 
१.     महा दरवाजा
२.    हिरकणी बुरुज
३.    राजांचा दरबार/ सदर 
४.    टकमक टोक
५.    भवानी टोक
६.    किल्ला चढवा.
७.    रोपवे
८.        नाणे दरवाजा 
याशिवाय रायगडावरून सुंदर दऱ्या आणि पर्वतीय रांगांची निसर्गरम्य दृश्ये दिसतात ज्यामुळे तुम्हाला पुन्हा पुन्हा परत जाण्याची इच्छा होऊ शकते!

जवळचे पर्यटन स्थळ    
●रायगडच्या सहलीचे नियोजन करताना जवळची काही पर्यटन स्थळे ज्यांना देखील तुम्ही भेट देऊ शकता!
●सागरगड किल्ला. (९५ किमी)
●पाचाड, जिजामाता समाधी (२.१ किमी)
●हरिहरेश्वर मंदिर (८६ किमी)
●बाणकोट (९९ किमी)
●महाड (२५ किमी)
●गांधारपाले लेणी (२६.५ किमी)    

रेल्वे, हवाई, रस्त्याने (ट्रेन, उड्डाण, बस) द्वारे पर्यटन स्थळास अंतर आणि आवश्यक वेळ लक्षात घेऊन प्रवास कसा करावा     
गडावर जाण्यासाठी उपलब्ध पर्याय 
●विमान मार्ग: रायगडचे सर्वात जवळचे विमानतळ मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. (१६९ किमी)
●रेल्वे: सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन वीर रेल्वे स्टेशन आहे जे किल्ल्यापासून ३० किमी अंतरावर आहे आणि मुंबईला जोडलेले आहे.
●रस्ते वाहतूक: मुंबई-गोवा महामार्गाने (NH १७) महाड नावाच्या शहरापर्यंत जाता येते, महाड किल्ल्यापासून २८ किमी अंतरावर आहे, वाहतुकीसाठी एसटी बसेस आणि खाजगी वाहने उपलब्ध आहेत.
किल्ल्यावर जाण्याचा मार्ग: किल्ल्यावर चढण्यासाठी दोन पर्यायी मार्गे आहेत, एक किल्ल्यावर जाण्याचा मार्ग आहे, जो १४५० पायर्यांची चढण आहे ज्यात सरासरी २-३ तास लागतात आणि दुसरा म्हणजे रोपवे, रोपवे. आजूबाजूच्या निसर्गाचा आनंद घेत केवळ ५ मिनिटांत आपण डोंगराच्या माथ्यावर पोहोचतो.

विशेष खाद्यपदार्थ आणि हॉटेल    
महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ प्रामुख्याने मिळतात, तेथे मुख्यतः महाराष्ट्रीयन व्यंजने उपलब्ध असणारे रेस्टॉरंट आहेत, तथापि, किल्ल्यावर अन्न किंवा पाण्याची सोय होईल इतपत सोय आहे.

जवळच्या निवास सुविधा आणि हॉटेल/हॉस्पिटल/पोस्ट ऑफिस/पोलीस स्टेशन
●गडावर व गडाच्या पायथ्याशी निवासी सुविधा आहेत. 
●महाड तालुका पोलीस ठाणे हे सर्वात जवळचे पोलीस ठाणे आहे. (२५.५ किमी)
●शासकीय रुग्णालय पोलादपूर हे सर्वात जवळचे रुग्णालय आहे. (४०.९ किमी)

जवळचे MTDC रिझॉर्ट     
सर्वात जवळचे MTDC रिसॉर्ट रायगड किल्ल्या जवळच आहे.

प्रवासी मार्गदर्शक माहिती    
गडावर गेल्यावर स्थानिक पर्यटक मार्गदर्शक उपलब्ध आहेत.

प्रवासी चालकाची माहिती      
रायगडला नियोजित टूर करणारे बरेच टूर ऑपरेटर आहेत, ज्यात वाहतूक, जेवण आणि मार्गदर्शित टूर यांचा समावेश आहे.

स्थळास भेटीचे नियम आणि वेळ, भेटण्यासाठीचा सर्वोत्तम महिना    
●या किल्ल्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम महिने सप्टेंबर ते मार्च दरम्यान आहेत. 
●सर्वोत्तम वेळ सकाळी ८:०० ते संध्याकाळी ६.०० पर्यंत आहे. 
●पर्यटकांनी काळजी घेण्याच्या गोष्टी पुढीलप्रमाणे आहेत: - 
●जर एखाद्याने किल्ल्यापर्यंत ट्रेकिंगची योजना आखली असेल तर स्पोर्ट्स शूज घाला आणि पुरेसं पाणी स्वतः सोबत घेऊन चला. 
●तुम्ही भेट देत असलेल्या ऋतू प्रमाणे कपडे घाला.
●रोपवेच्या वेळेची नोंद घ्या.
●गड उतरायचा विचार असेल तर सूर्यास्ताच्या दोन तास आधी उतरायला सुरुवात करावी.
●प्रवेश तिकिटासाठी पैसे द्यावे लागतील.

परिसरात बोलली जाणारी भाषा     
इंग्रजी, हिंदी, मराठी.