• स्क्रीन रीडर प्रवेश
  • A-AA+
  • NotificationWeb

    Title should not be more than 100 characters.


    0

Asset Publisher

विजयदुर्ग (सिंधुदुर्ग)

विजयदुर्ग किल्ला किंवा घेरिया किल्ला किंवा फोर्ट व्हिक्टर हा तिन्ही बाजूंनी अरबी समुद्राने वेढलेला प्रमुख सागरी किल्ल्यांपैकी एक आहे आणि सिंधुदुर्ग किनाऱ्यावरील सर्वात जुना सागरी किल्ला आहे.

जिल्हे/प्रदेश     
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुका, महाराष्ट्र, भारत.

इतिहास    
विजयदुर्ग किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेल्या देवगड तालुक्यात आहे. विजयदुर्ग किल्ला विजयदुर्ग बंदरापासून सुमारे ४०० मीटर अंतरावर आहे जे लहान असुन पश्चिम किनारपट्टीवरील महत्त्वपूर्ण बंदरांपैकी एक आहे. त्यात ४० किमी लांब वाघोटन/खारेपाटन खाडीचा देखील समावेश आहे. किल्ल्याला 'घेरिया' असे संबोधले जात होते कारण ते 'गिर्ये' शहरात वसलेले आहे.
विजयदुर्ग हा सागरी किल्ला असल्याने भरती आणि लाटांमुळे ह्याचे भरपूर नुकसान झाल्याचे दिसते. तथापि, शिवाजी महाराजांच्या काळात, किल्ल्याच्या भिंतींच्या तिहेरी रेषा, विविध बुरुज आणि आतल्या भव्य रचना बांधल्या गेल्या होत्या. हा किल्ला त्यावर ताबा मिळवण्यासाठी शतकानुशतके लढलेल्या नौदल लढ्यांसाठी देखील ओळखला जातो.
कालांतराने किल्ल्यावरील मध्ययुगीन वास्तूंचे अनेक अवशेष जोडले गेल्याचे पाहायला मिळते. किल्ल्याचे संरक्षण करण्यासाठी पाण्याखाली बांधलेली भिंत यामुळे ह्या किल्ल्याला एक अद्वितीय सागरी किल्ला म्हणून विशेष ओळख आहे.  

भूगोल    
विजयदुर्ग किल्ला वाघोटन नदीच्या तोंडाशी आहे जो रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना दुभागतो. हा किल्ला मुंबईच्या दक्षिण दिशेस ४८७.९ किलोमीटर अंतरावर आहे. वाघोटन नदीच्या प्रवेशद्वाराच्या दक्षिण किनाऱ्यावरील एका लहान बंदराजवळ हा किल्ला आहे.

हवामान/वातावरण    
या प्रदेशातील प्रमुख ऋतू म्हणजे पाऊस, कोकण पट्ट्यात उच्च पावसाळा (सुमारे २५०० मिमी ते ४५०० मिमी) अनुभवला जातो आणि हवामान दमट आणि उबदार राहते. या हंगामात तापमान ३० अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.
उन्हाळ्यात उष्ण आणि दमट वातावरण असते आणि सरासरी तापमान ४० अंश सेल्सिअस पर्यंत जाते.
 हिवाळ्यात त्या तुलनेने सौम्य हवामान (सुमारे २८ अंश सेल्सिअस) असते आणि वातावरण थंड आणि कोरडे राहते

करावयाच्या गोष्टी    
- खाडीवर गोदी पासून दोन मैल खाली एक मजबूत बांधलेला मार्टेलो टॉवर आहे ज्याला मित्या बुरुज म्हणतात
-किल्ल्यापासून वाघोटन रस्त्यावर थोड्या अंतरावर रामेश्वराचे मंदिर आहे, जे बहुधा १०० वर्षे जुने आहे
-एक भव्य मंदिर ज्यामध्ये एक विशाल विश्रामगृह आहे कुठेतरी अरुंद दरीत स्तिथ आहे. या परिसरात बैलावर बसलेली चार हाथ असलेली मूर्ती, मजबूत चांदीची असून शंभर किलो वजनाची आहे आणि आतापर्यंत ती उत्तम स्थितीत आहे.

जवळचे पर्यटन स्थळ    
येथे विविध पर्यटन स्थळे आहेत जिथे उत्तम निसर्ग आणि अद्भुत नैसर्गिक सौंदर्य आहे
-देवघळी किल्ला:- विजयदुर्ग किल्ल्यापासून ६८.१ किमी
-देवगड बीच:- विजयदुर्ग किल्ल्यापासून ३०.२ किमी
-श्री कनकादित्य मंदिर- विजयदुर्ग किल्ल्यापासून ६७.३ किमी
-रामेश्वर मंदिर:- विजयदुर्ग किल्ल्यापासून ३ किमी
-देवगड किल्ला:- विजयदुर्ग किल्ल्यापासून ३१.६ किमी
-हॉट स्प्रिंग्स- उन्हाळे, महाराष्ट्र, विजयदुर्ग किल्ल्यापासून ५० किमी
-महाकाली मंदिर- विजयदुर्ग किल्ल्यापासून ६२.७ किमी
-देवगड पवनचक्की:- विजयदुर्ग किल्ल्यापासून ३० किमी
-मिठमुंबरी बीच:- विजयदुर्ग किल्ल्यापासून ३१.६ किमी.

रेल्वे, हवाई, रस्त्याने (ट्रेन, उड्डाण, बस) द्वारे पर्यटन स्थळास अंतर आणि आवश्यक वेळ लक्षात घेऊन प्रवास कसा करावा     
हवाई मार्गाने:- सर्वात जवळचे विमानतळ गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे [२०६ किमी अंतरावर आहे]
- रेल्वे ने - जवळचे रेल्वे स्थानक राजापूर रोड ६३ किमी आणि कणकवली रेल्वे स्थानक ७६ किमी अंतरावर आहे. सर्व एक्सप्रेस आणि प्रवासी गाड्या राजापूर आणि कणकवली स्थानकांवर थांबतात.
-रस्त्याने:-गोवा -२२२ किमी, पुणे -३४४ किमी, मुंबई -४१८ किमी. 
-राज्य परिवहन बसेस देखील विजयदुर्ग आणि जवळच्या शहरांशी जोडलेल्या आहेत. एमएसआरटीसी बसेस महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधून विजयदुर्गला जाण्यासाठी उपलब्ध आहेत.
विजयदुर्गपासून सुमारे ६० किमी अंतरावर असलेल्या सिंधुदुर्गला जाणाऱ्या खाजगी बसचालकांच्या चांगल्या प्रमाणात बस आहेत. 
    
विशेष खाद्यपदार्थ आणि हॉटेल    
- कोंबडी वडे, आणि सिंधुदुर्ग प्रदेशात मालवणी पद्धतीने बनवला जाणारा कोंबडीचा रस्सा, समुद्री माश्यांचे विविध पदार्थ, ह्या परिसरातले प्रसिद्ध खाद्य पदार्थ आहेत.

जवळच्या निवास सुविधा आणि हॉटेल/हॉस्पिटल/पोस्ट ऑफिस/पोलीस स्टेशन    
- राहण्यासाठी विविध व्यवस्था उपलब्ध आहेत
-विजयदुर्ग पोलीस स्टेशन-विजयदुर्ग किल्ल्यापासून २.५ कि.मी अंतरावर आहे. 
-विजयदुर्ग पोस्ट ऑफिस विजयदुर्ग, देवगड, सिंधुदुर्ग येथे आहे

जवळचे एमटीडीसी रिझॉर्ट    
एमटीडीसी चे मान्यता प्रमाण असलेले ग्रीन व्हॅली फोर्ट व्ह्यू रिसॉर्ट हे विजयदुर्ग किल्ल्याजवळ राहण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे.

स्थळास भेटीचे नियम आणि वेळ, भेटण्यासाठीचा सर्वोत्तम महिना    
-हिवाळ्यात या ठिकाणी येण्याचा उत्तम काळ आहे कारण तापमान थंड आणि सुखद असते. 
- पर्यटकांना इथे येऊन किल्ल्याच्या समृद्ध इतिहासाचा आनंद घेता येतो. 

परिसरात बोलली जाणारी भाषा    
इंग्रजी, हिंदी, मराठी.