• स्क्रीन रीडर प्रवेश
  • A-AA+
  • NotificationWeb

    Title should not be more than 100 characters.


    0

Asset Publisher

सिंधुदुर्ग किल्ला

सिंधुदुर्ग किल्ला महाराष्ट्र राज्याच्या कोकण प्रदेशातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहराच्या किनाऱ्यावरील बेटावर आहे. हा किल्ला केंद्र सरकार द्वारे संरक्षित स्मारक आहे.


जिल्हे/प्रदेश     
मालवण तालुका, सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र, भारत.

इतिहास    
मालवण समुद्रकिनारा हा चंद्रकोर आकाराचा आहे.  या समुद्रकिनाऱ्याला वैशिष्ट्यपूर्ण भूवैज्ञानिक वैशिष्ट्य म्हणून पाहिले जाते.  सिंधुदुर्ग किल्ला हा मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला होता. हा किल्ला एका मध्यम खडकावर आहे जो मालवण किनाऱ्यापासून काही अंतरावर आहे. हा किल्ला मराठा साम्राज्याची किनारपट्टी राजधानी आणि शिवाजी महाराजांच्या काळात प्रमुख नौदल तळ म्हणून ओळखला जातो. समुद्रातून निर्माण होणाऱ्या किल्ल्याच्या तटबंदीच्या भिंती हे याचे एक अनोखे आणि आश्चर्यकारक वैशिष्ट्य आहे. किल्ल्याच्या भिंतींची उंची आणि रुंदी किल्ल्याच्या रचनेला वैभव देते. या किल्ल्याचे प्रवेशद्वार ईशान्य दिशेला आहे. असे मानले जाते की हा किल्ला एकेकाळी इमारतींनी भरलेला होता, परंतु आता फक्त काही लहान मंदिरे वगळता आत काहीच राहिलं नाही. मराठ्यांसाठी सिंधुदुर्ग किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आहे आणि त्याच्या मुख्य मंदिरात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पूजा केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांचे हात आणि पायांचे ठसे मंदिरात श्रद्धेने ठेवले आहेत आणि लहान देवळांनी ते संरक्षित केले गेले आहे. किल्ल्यात काही पाण्याच्या टाक्या आहेत ज्यात पिण्या योग्य पाणी आहे.
अरबी समुद्र आणि किनारपट्टी सुरक्षेमध्ये नौदलाचे महत्त्व ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांना कोकण परिसरात एक मजबूत किल्ला हवा होता. मुरुडजवळ सिद्धींच्या जंजिरावर विजय मिळवण्याच्या विविध अयशस्वी प्रयत्नांनंतर, त्याने १६६५ च्या आसपास सिंधुदुर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या समुद्री रत्नाचा विचार केला. मोठ्या बेटावरील सिंधुदुर्गाच्या मुख्य किल्ल्याव्यतिरिक्त, शिवाजी महाराजांनी छोट्या बेटाला मजबूत करण्यासाठी लहान किल्ला पद्मगड बांधला जो मुख्य किल्ल्याची सुरक्षा करायचा. शहरासमोरील मुख्य भागात आणि खाडीच्या सुरवातीला दीड मैल उत्तरेस राजकोट आणि सर्जेकोट हे किल्ले बांधले.

भूगोल    
सिंधुदुर्ग किल्ला एका बेटावर स्तिथ आहे. ज्याच्या पश्चिम दिशेस अरबी समुद्र तर पूर्वेकडे मालवण किनारपट्टी सुमारे १.५ किलोमीटर अंतरावर आहे.

हवामान/वातावरण    
या प्रदेशातील प्रमुख ऋतू म्हणजे पाऊस, कोकण पट्ट्यात उच्च पावसाळा (सुमारे २५०० मिमी ते ४५०० मिमी) नोंदवला जातो आणि हवामान दमट आणि उबदार राहते. या हंगामात तापमान ३० अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.
उन्हाळा उष्ण आणि दमट असतो आणि तापमान ४० अंश सेल्सिअस पर्यंत जाते.
प्रदेशातील हिवाळ्यात त्या तुलनेने सौम्य हवामान (सुमारे २८ अंश सेल्सिअस) असते आणि वातावरण थंड आणि कोरडे राहते

करावयाच्या गोष्टी    
सिंधुदुर्ग किल्ल्यावर जरी मरी मातेचे मंदिर, श्री भवानी मातेचे मंदिर आणि श्री शिव राजेश्वर मंदिर अशी तीन मंदिरे आहेत. श्री शिव राजेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा केली जाते. हे मंदिर पर्यटकांचे लोकप्रिय आकर्षण आहे. किल्ल्याच्या उत्तर-पश्चिम भागात समुद्रकिनारा देखील आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांचे ठसे आणि हाताचे ठसे असलेले एक वर्चस्ववादी रचना आहे.

जवळचे पर्यटन स्थळ    
● पद्मगड किल्ला - ५.४ किमी
● राजकोट किल्ला - २.९ किमी
● मालवण बीच - ३.९ किमी
● धारण पॉईंट (कोरल गार्डन) - ५ किमी

रेल्वे, हवाई, रस्त्याने (ट्रेन, उड्डाण, बस) द्वारे पर्यटन स्थळास अंतर आणि आवश्यक वेळ लक्षात घेऊन प्रवास कसा करावा     
किल्ल्यावर जाण्यासाठी रस्ता, रेल्वे आणि हवाई मार्गाने प्रवास करता येतो.
● जवळचे रेल्वे स्टेशन सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन सुमारे ३० किमी अंतरावर आहे. स्टेशन वरून टॅक्सी किंवा खाजगी वाहन भाड्याने घेता येते.
● सर्वात जवळचे विमानतळ सिंधुदुर्ग चिपी विमानतळ २२.४ किमी अंतरावर आहे.
● रस्त्याने, मुंबईहून येत असल्यास NH-६६ मार्गाने येऊ शकता, कणकवली, कोल्हापूर, बेळगाव सारख्या जवळच्या शहरांमध्ये अनेक एमएसआरटीसी बस आणि लक्झरी बस सुविधा आहेत.
● किल्ल्यावर जाण्यासाठी मालवण शहरातून सिंधुदुर्ग किल्ला पर्यंत जेट्टी घ्यावी लागते जी दर १५-३० मिनिटाने उपलब्ध असते.

विशेष खाद्यपदार्थ आणि हॉटेल    
या क्षेत्रातील पाककृती मालवणी पाककृती म्हणून ओळखली जाते. यात मुख्यतः मासे आणि काही शाकाहारी पदार्थांचा समावेश आहे. पदार्थांमध्ये सर्व प्रकारचे तळलेले मासे आणि मालवणी मसाला घातलेल्या फिश करीचा समावेश आहे. हे इथले विशेष पदार्थ आहेत. 
● कोंबडी वडे किंवा वडे सगोती (तांदळाच्या पिठापासून बनवलेल्या जाड पुरी)
● घावणे - रस (गोड नारळाच्या दुधाबरोबर तांदळाचा डोसा)
● आंबोली - उसळ (मसालेदार करीसह आंबवलेल्या तांदळाचा डोसा)
● शिरवले (नूडल्स गोड नारळाच्या दुधाबरोबर दिले जातात)
● उकड्या तांदळाची पेज (तपकिरी-लाल तांदळापासून बनवलेली मऊ उकडलेला पदार्थ)
● सोल कढी (सोल (कोकम) आणि नारळाच्या दुधापासून बनवलेला पदार्थ).
● सुकी मच्ची ही 'गोलमा' सारखा स्थानिक पदार्थ आहे.
शाकाहारी पदार्थांमध्ये आहे:-
● कार्मेल, बिंबली, अंबा हळदीचे लोणचे.
● अप्पे, घावणे, डालीमबाची उसळ, काजू उसळ, रायवाल अंब्यचा रायता.

जवळच्या निवास सुविधा आणि हॉटेल/हॉस्पिटल/पोस्ट ऑफिस/पोलीस स्टेशन    
राहण्यासाठी विविध स्थानिक हॉटेल्स उपलब्ध आहेत.
● सर्वात जवळचे पोलीस स्टेशन मालवण पोलीस स्टेशन आहे - ३ किमी.
● सर्वात जवळचे पोस्ट ऑफिस मालवण पोस्ट ऑफिस आहे - २.३ किमी.
● सर्वात जवळचे हॉस्पिटल अंकुर हॉस्पिटल आहे जे ३ किमी अंतरावर आहे.

जवळचे एमटीडीसी रिझॉर्ट    एमटीडीसी रिसॉर्ट -
 ८.५ किमी अंतरावर असलेले तारकर्ली रिसॉर्ट सर्वात जवळचे रिसॉर्ट आहे.


स्थळास भेटीचे नियम आणि वेळ, भेटण्यासाठीचा सर्वोत्तम महिना
● किल्ला पाहण्याची वेळ सकाळी ८:०० ते संध्याकाळी ६:०० आहे. 
● भारतीय पर्यटकांसाठी प्रवेश शुल्क ५० रुपये आणि परदेशी पर्यटकांसाठी २०० रुपये आहे.
● फेरीचे शुल्क प्रति व्यक्ती ९० रुपये आहे. पार्किंगची जागा फक्त समुद्रकिनाऱ्याजवळ उपलब्ध आहे.
● काही स्थानिक लोकांच्या मते कमी उष्णतेमुळे, दुपारी ३:०० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पर्यंत किल्ला पाहण्याची उत्तम वेळ मानली आहे. 
● पावसाळ्यात किल्ल्यावर जाण्यास मनाई आहे.

परिसरात बोलली जाणारी भाषा    
इंग्रजी, हिंदी, मराठी.