• स्क्रीन रीडर प्रवेश
  • A-AA+
  • NotificationWeb

    Title should not be more than 100 characters.


    0

Asset Publisher

सुवर्णदुर्ग किल्ला

सुवर्णदुर्ग किल्ला, दापोलीतील हर्णे समुद्र किनाऱ्यावर एका बेटावर स्तिथ आहे. महाराष्ट्र राज्याच्या कोकण विभागातील पश्चिम किनाऱ्यावरील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. सुवर्ण याचा शाब्दिक अर्थ इंग्रजीमध्ये 'गोल्डन' आहे, आणि म्हणूनच त्याला सुवर्ण किल्ला म्हणूनही ओळखले जाते. हा किल्ला भारत सरकारच्या केंद्र सरकारचे संरक्षित स्मारक आहे.

    
जिल्हे/प्रदेश     

दापोली तालुका, रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र.

इतिहास    
सुवर्णदुर्ग किल्ला नौदल धोरणात्मक दृष्टिकोनातून प्रमुख किनारपट्टी किल्ल्यांपैकी एक आहे. सुवर्णदुर्ग किल्ला कान्होजी आंग्रे यांचे जन्मस्थान म्हणून ओळखला जातो. ते मराठा साम्राज्यातील सर्वात लक्षणीय योद्धा होते, ज्यांना छत्रपती राजारामांकडून 'सरखेल' ही विशेषाधिकार प्राप्त झालेली होती. कान्होजीचे वडील तुकोजी, १६४० च्या दशकात शहाजीराजे यांच्या सेवेत होते. जेव्हा निजामशाहीचे राज्य संपले तेव्हा दक्षिण कोकणचा हा भाग आदिलशाहीच्या राज्यात हलविला गेला. मराठा राजा शिवाजीने सुवर्णदुर्ग किल्ला जिंकला. काही तज्ज्ञांचे असे म्हणे आहे की अहमदनगरच्या निजामाच्या राज्यात या किल्ल्याच्या मजबूत भिंती बांधल्या गेल्या आहेत. पुढे १६६९ मध्ये मराठा शूरवीरांनी सुवर्णदुर्गच्या दुरुस्तीची कामे केली. कान्होजी आंग्रे, एक उल्लेखनीय मराठा योद्धा, १६९८ मध्ये मराठी नौदल दलाचा कार्यभार स्वीकारला आणि त्याच्या कार्यकाळात सुवर्णदुर्ग आणि विजयदुर्गात ताफ्याची छावणी उभारण्यात आली. १७३१ पर्यंत कोणताही लढाई न होता हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यात होता म्हणून हा किल्ला शांततापूर्ण असल्याचे मानले जात असे. हा किल्ला १८१८ मध्ये ब्रिटिश साम्राज्याच्या ताब्यात आला कारण कर्नल केनेडीने पेशव्यांकडून किल्ला जिंकला.
कनकदुर्ग आणि गोवा किल्ला नावाचे इतर दोन किनारपट्टी वरचे किल्ले बेटावरच्या सुवर्णदुर्ग किल्ल्याचे संरक्षक किल्ले म्हणून ओळखले जातात. फत्तेगड ज्याला कनकदुर्ग असेही म्हटले जाते ते एक लहान तटबंदी आहे. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधला गेला असे मानले जाते.

भूगोल    
हा किल्ला हर्णे समुद्र किनाऱ्यापासून सुमारे २५० मीटर अंतरावर असलेल्या एका बेटावर आहे आणि तीनही बाजूंनी अरबी समुद्राने वेढलेला आहे.  हा किल्ला महाराष्ट्र राज्याच्या रत्नागिरी जिल्ह्याच्या अधिकार क्षेत्रात येतो.

हवामान/वातावरण    
या प्रदेशातील प्रमुख ऋतू म्हणजे पाऊस, कोकण पट्ट्यात उच्च पावसाळा (सुमारे २५०० मिमी ते ४५०० मिमी) अनुभवला जातो आणि हवामान दमट व उबदार असते. या हंगामात तापमान ३० अंश सेल्सिअस पर्यंत जाते. 
उन्हाळ्यात वातावरण उष्ण आणि दमट असते आणि तापमान ४० अंश सेल्सिअस पर्यंत जाते.
 हिवाळ्यात त्या तुलनेने सौम्य हवामान (सुमारे २८ अंश सेल्सिअस) असते आणि वातावरण थंड आणि कोरडे असते.


करावयाच्या गोष्टी    
किल्ल्याला दोन प्रवेशद्वार आहेत, पूर्वेला महादरवाजा आणि पश्चिमेला चोर दरवाजा. किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला कासव आणि भिंतीवर भगवान हनुमानाचे चित्र दिसते. त्यामध्ये बांधलेल्या खोल्यांसह बुरुज आहेत. पाण्याची विहीर आणि काही तलाव असे अनेक पाण्याचे स्त्रोत देखील आहेत.

जवळचे पर्यटन स्थळ    
● गोवा किल्ला - ०.७ किमी
● फत्तेगड / कनकदुर्गा किल्ला - ०.४ किमी
● पालांडे बीच - ४.४ किमी
● आंजर्ले बीच - ७.८ किमी

रेल्वे, हवाई, रस्त्याने (ट्रेन, उड्डाण, बस) द्वारे पर्यटन स्थळास अंतर आणि आवश्यक वेळ लक्षात घेऊन प्रवास कसा करावा     
● रस्त्याने मुंबईतून येत असल्यास NH-६६ ने येऊ शकता. पुण्याहून रस्त्याने MH SH-७० ने येऊ शकता. एमएसआरटीसी बसेसच्या विविध बस सुविधा आणि लक्झरी बसेस दापोली शहरापर्यंत उपलब्ध आहेत.
● जवळचे रेल्वे स्थानक: खेड रेल्वे स्थानक- ४३.६ किमी.अंतरावर आहे.  येथून भाड्याने टॅक्सी आणि खाजगी वाहने उपलब्ध आहेत.
● जवळचे विमानतळ पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे - २१० किमी अंतरावर आहे.

विशेष खाद्यपदार्थ आणि हॉटेल    
जवळपास अनेक स्थानिक रेस्टॉरंट्स आहेत. खाद्यपदार्थांमध्ये प्रामुख्याने मास्यांचा समावेश असतो.

जवळच्या निवास सुविधा आणि हॉटेल/हॉस्पिटल/पोस्ट ऑफिस/पोलीस स्टेशन    
● सर्वात जवळचे पोलीस स्टेशन हे हर्णे बंदरपासून ९०० मीटर दूर हरनाई पोलीस स्टेशन आहे.
● सर्वात जवळचे पोस्ट ऑफिस बंदरापासून २.१ किमी दूर हर्णे पोस्ट ऑफिस आहे.
● बंदरापासून जवळचे हॉस्पिटल डॉ.दळवी हुसामी क्लिनिक आहे जे १.१ किमी अंतरावर आहे.


जवळचे एमटीडीसी रिझॉर्ट    
१८.३ किमी अंतरावर फर्न समली रिसॉर्ट हे दापोलीत असलेले जवळचे एमटीडीसी रिसॉर्ट आहे.
    
स्थळास भेटीचे नियम आणि वेळ, भेटण्यासाठीचा सर्वोत्तम महिना    
● येथे कोणतीही सरकारी बोट सुविधा उपलब्ध नाही, म्हणून एखाद्याला जायचे असल्यास खाजगी बोट करावी लागते ज्याची वारंवारता पर्यटकांच्या संख्येवर अवलंबून असते.
● बोटीचे शुल्क प्रति व्यक्ती १००-३५० रुपये आहे.
● किल्ला सकाळी ७ च्या सुमारास उघडतो आणि संध्याकाळी बंद होण्याची वेळ समुद्राच्या भरतीवर अवलंबून असते.
● इथल्या स्थानिक लोकांच्या मते जाण्यासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी ७ च्या सुमारास.
● किल्ला पाहण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जात नाही.

परिसरात बोलली जाणारी भाषा    
इंग्रजी, हिंदी, मराठी, कोकणी.