• Screen Reader Access
  • A-AA+
  • NotificationWeb

    Title should not be more than 100 characters.


    0

Asset Publisher

अजिंठा लेणी (औरंगाबाद)

अजिंठा लेणी ३१ बौद्ध लेण्यांचा एक जटिल समूह आहे, जो औरंगाबाद जवळील वाघूर नदीच्या निसर्गरम्य खोऱ्यात स्तिथ आहे. यात क्षेत्रात १५०० वर्षांपूर्वीच्या उत्तम संरक्षित चित्रकलेचा समावेश आहे आणि हे त्याच्या भित्तीचित्र आणि शिल्पकलेच्या उत्कृष्ट नमुन्यांसाठी एक मान्यताप्राप्त जागतिक वारसा आहे.

जिल्हा/विभाग

औरंगाबाद जिल्हा, महाराष्ट्र .भारत

ऐतिहासिक माहिती

अजिंठा लेणी हि जगभरात बौद्ध धार्मिक कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखली जातात. युनेस्को हेरिटेज क्षेत्रात ३० हून अधिक गुहा आहेत. सर्व लेण्या नैसर्गिक रित्या खडकाळ आहेत आणि त्यांची प्राचीनता २००० हून अधिक वर्षांपूर्वीची आहे. हे प्रामुख्याने प्राचीन व्यापारी मार्गावर आहे, जे रेशीम मार्गाचा भाग आहे. 
अजिंठा लेणी संकुल वाघूर नदीचा दिशेने पहिले तर घोड्याचा नाळेचा आकृती प्रमाणे उतारावर आहे. या आकर्षक गुहा दोन टप्प्यांत खडकावर कोरल्या गेल्या आहेत. पहिला टप्पा इ.स.पूर्व दुसऱ्या शतकाच्या जवळपास थेरवडा किंवा हीनयान बौद्ध धर्माच्या वर्चस्वाखाली आणि दुसरा महायान बौद्ध धर्मात ४६०-४८० च्या जवळपास सुरू झाला. अजिंठा लेण्यांचा उपयोग अनेक धार्मिक हेतूंसाठी करण्यात आला होता आणि ह्या लेण्यांमध्ये पुढे चैत्य (प्रार्थना हॉल), विहार (असेंब्ली हॉल) सारख्या कार्यात्मक भूमिका समर्पित केल्या ज्यामुळे अजिंठा येथील प्राचीन मठ बनला.
अजिंठा लेण्यांत गौतम बुद्धाच्या विविध भावमुद्रा तसेच बौद्ध तत्त्वज्ञानाला चित्रशिल्प रूपात व्यक्त करणाऱ्या शिल्पकलेचा अद्वितीय अविष्कार पाहायला मिळतो. गुहेच्या भिंतींवरील सुंदर आणि आकर्षक कथात्मक भित्तीचित्रे जे  नैसर्गिक आणि भौमितिक नमुन्यांची मांडणी करणाऱ्या सजावटीच्या चित्रांसह आहेत
१८१९ मध्ये कॅप्टन जॉन स्मिथने ज्या ठिकाणा हुन अजिंठा लेणी पहिल्यांदा पहिल्या आणि नव्याने जगासाठी त्यांची ओळख निर्माण केली त्या जागेला 'व्ह्यू पॉईंट' म्हणून ओळखले जाते आणि हे लेण्यांचे प्रवेशद्वार म्हणून प्रसिद्ध आहे.

लेणी क्र. १, २, १६ आणि १७ ह्या जातक कथा आणि अवदाना कथांवरील चित्रलेखासाठी प्रसिद्ध आहेत.  

लेणी क्र. ९ आणि १० थेरवडा (हीनयान) आणि महायान ह्यात बुद्धांचे प्रतिनिधित्व करणारे अनेक स्तूप आहेत. लेणी क्र. १९ आणि २६ ही महायान कालखंडातील  चैत्यगृह आहेत आणि गौतम बुद्धांचा मूर्ती असलेले स्तूप आहेत. लेण्यांमधील अनेक शिलालेखांमध्ये समूहाच्या  संरक्षकांचा उल्लेख आहे ज्यात प्रामुख्याने व्यापारी, राजे, मंत्री आणि भिक्षू यांचा समावेश आहे.

अजिंठा लेणी मध्ये आढळलेल्या अनेक आकर्षित कलांचा समावेश दख्खनमधील शाळा आणि स्मारकांवर प्रामुख्याने प्रभाव टाकला आहे. चित्रकला परंपरेचा वारसा श्रीलंकेतील सिगिरिया आणि मध्य आशियातील किझिल सारख्या इतर ठिकाणी सुद्धा पाहायला मिळतो.

भौगोलिक माहिती

अजिंठा लेणी हि वाघूर नदीच्या बेसाल्टिक घाट ह्या परिसरा शेजारी कोरलेली आहेत. बेसाल्टिक घाट ही एक अद्वितीय भूवैज्ञानिक रचना आहे ज्यामध्ये विविध लावा प्रवाह आहेत ज्यामुळे डेक्कन सापळा तयार झाला. अजिंठा लेणी जवळपास घनदाट जंगले आहेत जे गौतला ऑट्रामघाट वन्यजीव अभयारण्याला लागून आहेत.

हवामान

औरंगाबाद भागात उष्ण आणि कोरडे असे मिश्र हवामान आहे.

इथला उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळ्या पेक्षा अधिक तीव्र असतो, ज्याचे तापमान ४०.५ अंश सेल्सिअस पर्यंत जाते.

हिवाळा सौम्य असतो आणि सरासरी तापमान २८-३० अंश सेल्सिअस पर्यंत बदलते.

पावसाळ्यात अत्यंत हंगामी बदल होतात आणि औरंगाबादमध्ये वार्षिक पाऊस सुमारे ७२६ मिमी होतो.

करण्यासारख्या गोष्टी 

. इथल्या व्ह्यू पॉईंट आणि केव्ह कॉम्प्लेक्सला आवर्जून भेट द्या

. साइट संग्रहालय आणि माहिती केंद्राला भेट द्या

. निसर्ग सौंदर्याचं अन्वेषण  करा

. अजिंठा लेणी जवळील मध्ययुगीन तटबंदी असलेल्या गावाला भेट द्या

. स्थानिक कारागीर आणि शॉपिंग प्लाझा मधून खरेदीचा आनंद घ्या

जवळची पर्यटनस्थळे

१. नृत्य, संगीत आणि कारागिरीसाठी अजिंठा एलोरा आंतरराष्ट्रीय महोत्सव ऑक्टोबरमध्ये मोठ्या जल्लोशात साजरा केला जातो.

२. येथे असलेल्या पितलखोरा, घटोत्कचा, एलोरा आणि औरंगाबाद सारख्या इतर गुहा स्थळांचे सुद्धा अन्वेषण करा.

३. दौलताबाद किल्ला, बीबी का मकबरा, अनवा मंदिर, पाटणदेवी येथील चंडिकादेवी मंदिर यासारख्या पुरातत्व स्थळांना आवर्जून भेट द्या.

४. येथील गौतला वन्यजीव अभयारण्य पाहण्यासारखे आहे.

५. हिंदू तीर्थक्षेत्र घृष्णेश्वर मंदिर, एलोरा येथील क्षेत्राला भेट द्या.

खाद्य वैशिष्ट्य आणि हॉटेल्स

मांसाहारी: नान खलिया

शाकाहारी: हुरडा, दाल बट्टी, वांग्याचं भरीत (वांगी/वांग्याची खास पद्धतीने बनवलेली भाजी ), शेव भाजी

कृषी उत्पादन: जळगाव ची प्रसिद्ध केळी.

जवळच्या निवास सुविधा आणि हॉटेल/ हॉस्पिटल/ पोस्ट ऑफिस/पोलीस स्टेशन

हे एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ असल्याने, येथे राहण्यासाठी हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि सार्वजनिक शौचालये सारख्या उत्तम पर्यटन सुविधा उपलब्ध आहेत..

 पर्यटकांचा उत्तम सोयीसाठी MTDC ने या क्षेत्राला लागूनच एक रेस्टॉरंट उभारले आहे

पर्यटनासाठीचे नियम आणि वेळ, पर्यटनासाठी योग्य काळ

पर्यटकांना टी पॉइंटवर आपली वाहने सोडावी लागतात आणि तिथे उपलब्ध असलेली ग्रीन बस मधून पुढचा प्रवास करावा लागतो, कारण ती जागा संरक्षित जंगलाच्या आत येते.

क्षेत्रावर फिरताना पर्यटकांना कोणत्याही खाद्य पदार्थ नेण्यास परवानगी नाही.

जून ते मार्च हा अजिंठा लेण्यांना भेट देण्याचा उत्तम काळ मानला जातो.

या ठिकाणी बोलल्या जाणाऱ्या भाषा

इंग्रजी, हिंदी, मराठी.