• Screen Reader Access
  • A-AA+
  • NotificationWeb

    Title should not be more than 100 characters.


    0

Asset Publisher

अक्कलकोट स्वामी

अक्कलकोट स्वामी दत्तात्रेय परंपरेचे आध्यात्मिक गुरू होते. इथल्या वटवृक्षाच्या अस्तित्वामुळे त्यांचे मंदिर अगदी वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर म्हणून ओळखले जाते.
जिल्हा/विभाग  
 
अक्कलकोट, सोलापूर जिल्हा, महाराष्ट्र, भारत.

ऐतिहासिक माहिती    
अक्कलकोट हे दत्त संप्रदायाचे महत्त्वाचे केंद्र आहे. हे १९ व्या शतकातील संत श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्थान होते ज्यांना भगवान दत्तात्रेयांचा अवतार मानले जाते. भगवान दत्तात्रेय म्हणजे हिंदू धर्मातील देवता. मंदिराची कथा श्री स्वामी समर्थ महाराजांभोवती फिरते, ज्यांची तिथी/वर्ष आणि मूळ ठिकाण अज्ञात आहे, परंतु पौराणिक कथेनुसार ते १८५७ साली अक्कलकोटला आले होते असे समजते. त्यांनी अनेक चमत्कार केल्याचे सांगितले जाते. त्यांनी १८७८ साली समाधी घेतली असावी आणि त्यानंतर त्यांच्या अनुयायांनी एक छोटेसे मंदिर बांधले.
मंदिरासोबतच नगरखान्यासह दुमजली रचना बांधण्यात आली. १९२० मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला, आणि सभागृह (सभामंडप) १९२५ च्या आसपास बांधण्यात आले. मंदिराच्या आतील गाभाऱ्याचे पुढील बांधकाम १९४३ मध्ये सुरू झाले आणि १९४६ साली  पूर्ण झाले. वास्तुशास्त्रानुसार हे एक आधुनिक मंदिर आहे. श्रीं स्वामी समर्थ संबंधित असंख्य पवित्र स्थळे मंदिराच्या परिसरात आहेत.

भौगोलिक माहिती     
हे मंदिर अक्कलकोट शहरात आहे जे सोलापूर शहराच्या ३८ किमी दक्षिण-पश्चिमेस आहे, सोलापूर शहर हे जिल्हा मुख्यालय आहे.

हवामान     
•    या भागात वर्षभर उष्ण आणि काही अंशी शुष्क (कोरडे) हवामान असते आणि सरासरी तापमान १९-३३ अंश सेल्सिअस असते.
•    एप्रिल आणि मे हे सर्वात उष्ण महिने असतात तेव्हा तापमान ४२ अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.
•    हिवाळा अत्यंत तीव्र असतो आणि रात्री तापमान १० अंश सेल्सिअस इतके खाली जाऊ शकते, परंतु दिवसाचे सरासरी तापमान सुमारे २६ अंश सेल्सिअस असते.
•    पुणे विभागात सरासरी वार्षिक पाऊस सुमारे ७६३ मिमी इतका असतो. 

करण्यासारख्या गोष्टी      
महाराष्ट्रातील मुख्य तीर्थक्षेत्रांपैकी एक असलेल्या या मंदिराला भेट देणे आवश्यक ठरते. दत्त जयंती आणि गुरुपौर्णिमेच्या वेळी हे अनेक भाविकांना आकर्षित करते.

जवळची पर्यटनस्थळे     
अक्कलकोटच्या आसपास असलेली पुढील स्थळेही पर्यटकांना आकर्षित करतात. 
•    नळदुर्ग धरण: ४४.१ किमी
•    नळदुर्ग किल्ला: ४३.८ किमी
•    सोलापूर विज्ञान केंद्र: ४९.८ किमी
•    अक्कलकोट पॅलेस: १.२ किमी
•    सोलापूर भुईकोट किल्ला: ३९ किमी

रेल्वेने, विमानाने आणि रस्त्याने (ट्रेन, विमान, बस) तसेच ठराविक वेळेत पर्यटन स्थळावर कसे पोहोचावे     
•    रस्त्याने: मुंबई (४४० किमी), पुणे (२९२ किमी), औरंगाबाद (३४३ किमी). MSRTC बस सुविधा आणि लक्झरी बस सुविधा सोलापूर पर्यंतच्या शहरांपासून उपलब्ध आहेत.
•    जवळचे रेल्वे स्टेशन: अक्कलकोट रोड रेल्वे स्टेशन (१२.५ किमी). स्थानकावरून भाड्याने देण्यासाठी कॅब आणि खाजगी वाहने उपलब्ध आहेत.
•    जवळचे विमानतळ: पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ (२९४ किमी).

खाद्य वैशिष्ट्य आणि हॉटेल्स    
शेंगा चटणी (शेंगदाण्यापासून बनवलेली चटणी) आणि खारा मटण (खारट बकरीच्या मांसाचा रस्सा) हे या भागातले खास पदार्थ आहेत.

जवळच्या निवास सुविधा आणि हॉटेल/ हॉस्पिटल/ पोस्ट ऑफिस/पोलीस स्टेशन    
•    विविध सुविधा जसे राहण्याची आणि नाश्त्याची सुविधा, होम-स्टे इत्यादी उपलब्ध आहेत.
•    अक्कलकोट पोलीस स्टेशन १.५ किमी अंतरावर सर्वात जवळ आहे.
•    ग्रामीण रुग्णालय अक्कलकोट मध्ये ०.८५ किमी अंतरावर आहे.

जवळपासचे एमटीडीसी रिसॉर्ट    
एमटीडीसी रिसॉर्ट अक्कलकोटपासून २ किलोमीटर अंतरावर आहे.

पर्यटनासाठीचे नियम आणि वेळ, पर्यटनासाठी योग्य काळ      
•    मंदिर सकाळी ५.०० वाजता उघडते आणि रात्री १०.०० वाजता बंद होते.
•    मंदिर वर्षभर खुले असते.
•    जे लोक या मंदिराला भेट देतात ते अनेकदा इथे त्यांना सकारात्मक उर्जा मिळते असा उल्लेख करतात. 

या ठिकाणी बोलल्या जाणाऱ्या भाषा     
इंग्रजी, हिंदी, मराठी.