• A-AA+
  • NotificationWeb

    Title should not be more than 100 characters.


    0

WeatherBannerWeb

Banner Heading

Asset Publisher

अक्सा

अक्सा हे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील महाराष्ट्राच्या मुंबई उपनगरातील एक समुद्र किनारा आहे. हा किनारा त्याच्या शांत आणि स्वच्छ परिसरासाठी ओळखला जातो. मुंबई तसेच मुंबई नजीकच्या पर्यटकांसाठी हे एक लोकप्रिय ठिकाण आहे.

जिल्हा/विभाग :

मुंबई जिल्हा उपनगर, महाराष्ट्र, भारत 

इतिहास  :

अक्सा त्याच्या निर्मळ समुद्रकिनाऱ्यासाठी ओळखले जाते. स्थानिक तसेच इतर पर्यटक इथे येतात, लोकांचे ते एक आवडते पर्यटन स्थळ आहे. या समुद्रकिनाऱ्याची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे शहरापासून आणि शहरीकरणापासून दूर आहे त्याचे नैसर्गिक सौंदर्य अबाधित आहे. हे नयनरम्य ठिकाण आहे, आणि इथे भारतीय नौदलाचा तळ ‘आयएनएस हमला’ देखील आहे. 

भूगोल :

हा किनारा महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टी भागात म्हणजे अरबी समुद्रावरील मनोरी खाडी आणि मालाड खाडी दरम्यान आहे. हे मुंबई शहराच्या वायव्येस २८.६ किलोमीटर अंतरावर आहे.

हवामान :

या प्रदेशातील प्रमुख ऋतू म्हणजे पाऊस, कोकण किनार पट्ट्यात जास्त पाऊस (सुमारे २५०० मिमी ते ४५०० मिमी) अनुभवायला मिळतो आणि हवामान दमट आणि उबदार असते. पावसाळ्यात तापमान ३० अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.

उन्हाळा फार गरम आणि दमट असतो आणि तापमान ४० अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.

इथे हिवाळ्यात तुलनेने सौम्य हवामान (सुमारे २८ अंश सेल्सिअस) असते आणि हवामान थंड आणि कोरडे असते. 
 

करण्यासारख्या गोष्टी  :

अक्सा किनारा हे शहरापासून दूर असलेले एक शांत ठिकाण आहे. अक्सा किनाऱ्याची शांतता काही काळ एकांतवासात किंवा आपल्या प्रियजनांसोबत वेळ घालवण्यासाठी एक परिपूर्ण ठिकाण आहे. किनाऱ्यावर चालणे, लाटांचा कर्णमधुर आवाज ऐकणे आणि सूर्यस्नान याचा आनंद येथे लुटता येतो. मात्र, समुद्राच्या खोलीमुळे इथे पोहायला सक्त मनाई आहे.

जवळची पर्यटनस्थळे  :

अक्सासह खालील पर्यटन स्थळांना भेट देण्याची योजना आपण करू शकता.

मार्वेचा किनारा (मार्वे बीच): मालाडच्या पश्चिम भागात, मार्वे समुद्रकिनारा निसर्गरम्य ठिकाणांपैकी एक आहे जिथून एस्सेल वर्ल्ड, मनोरी आणि उत्तनला जाण्यासाठी फेरीची व्यवस्था आहे. 
मढ किल्ला: शक्तिशाली मढ किल्ला समुद्रकिनाऱ्यावर वसलेला आहे आणि सिनेमाचे शूटिंग तसेच उच्चभ्रूच्या सोहळ्यांसाठीचे  एक प्रमुख ठिकाण आहे.
मुंबादेवी मंदिर: दक्षिण मुंबईच्या झवेरी बाजारात बांधलेले मुंबादेवी मंदिर हे मुंबईतील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक आहे.
कान्हेरी लेणी: मुंबईतील लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक. कान्हेरी लेणी म्हणजे १०९ बौद्ध लेण्यांचा संग्रह आहे.
 

रेल्वेने, विमानाने आणि रस्त्याने (ट्रेन, विमान, बस) तसेच ठराविक वेळेत पर्यटन स्थळावर कसे पोहोचावे :

अक्सा येथे रेल्वे आणि रस्त्याने पोहोचता येते. या ठिकाणी बेस्ट बस, तसेच टॅक्सी उपलब्ध आहेत.

जवळचे विमानतळ: छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ मुंबई पासून  २०.५ किमी.

जवळचे रेल्वे स्टेशन: मालाड पासून ९ किमी.
 

खाद्य वैशिष्ट्य आणि हॉटेल्स  :

अक्साच्या आसपास फार हॉटेल्स किंवा रेस्टॉरंट्स नाहीत. भाजलेले शेंगदाणे, कॉर्न, चाट इत्यादी खाण्याचे विविध स्टॉल उपलब्ध आहेत. मात्र, मार्वे आणि मढ जवळच्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये विविध प्रकारचे पदार्थ व जेवण मिळते. 

 

जवळच्या निवास सुविधा आणि हॉटेल/ हॉस्पिटल/ पोस्ट ऑफिस/पोलीस स्टेशन  :

अक्सा किनाऱ्याच्या आसपास अनेक हॉटेल्स उपलब्ध आहेत.

समुद्र किनाऱ्यापासून ६.८ किमी अंतरावर महापालिका रुग्णालये उपलब्ध आहेत.

सर्वात जवळचे पोस्ट ऑफिस ८.५ किमी अंतरावर मालाड येथे आहे.

सर्वात जवळचे पोलीस स्टेशन १.९ किमी अंतरावर आहे.
 

जवळपासचे एमटीडीसी रिसॉर्ट :

जवळपास कोणतेही एमटीडीसी रिसॉर्ट नाही.

 

पर्यटनासाठीचे नियम आणि वेळ, पर्यटनासाठी योग्य काळ  :

या ठिकाणी वर्षभर भेट देता येते परंतु पर्यटनासाठी सर्वोत्तम काळ ऑक्टोबर ते मार्च हा आहे. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो आणि त्यामुळे इथे या काळात पर्यटन धोकादायक होऊ शकते. 

पर्यटकांनी समुद्रात प्रवेश करण्यापूर्वी भरती आणि ओहोटीच्या वेळ तपासून मगच समुद्रात जावे.

पावसाळ्यात समुद्राला येणारी भरती धोकादायक असू शकते म्हणून याकाळात समुद्रात जाणे टाळले पाहिजे.

या किनाऱ्यावर पोहण्यास मनाई आहे.
 

या ठिकाणी बोलल्या जाणाऱ्या भाषा :

मराठी, हिंदी, इंग्रजी 

 


Tour Package

Hotel Image
Blue Diamond Short Break Bustling Metropolis

2N 1Day

Book by:

MTDC Blue Diamond

Where to Stay

No Hotels available!


Tourist Guides

No info available