• स्क्रीन रीडर प्रवेश
  • A-AA+
  • NotificationWeb

    Title should not be more than 100 characters.


    0

Asset Publisher

अंबाझरी तलाव

पर्यटन स्थळे/ जागा यांची नावे आणि स्थळांचे थोडक्यात ३-४ ओळींमध्ये वर्णन

नागपुर मधील अकरा तलावांपैकी अंबाझरी हा सगळ्यात मोठा तलाव  आहे. पर्यटकां मध्ये  हे सगळ्यात प्रसिद्ध असे पर्यटन स्थळ आहे आणि साध्या बोटी व पॅडल बोटी अशा दोन्ही प्रकारच्या बोटिंग सारखे करमणुकीचे उपक्रम या करिता ही जागा प्रसिद्ध आहे.  

जिल्हा/प्रदेश

नागपुर जिल्हा, महाराष्ट्र, भारत.  

इतिहास

शासकीय अधिकारी आणि शहरातील नागरिकांना मातीच्या पाईप मधून पाणीपुरवठ्याची सोय व्हावी म्हणुन 1870 साली भोसले घराण्याने अंबाझरी तलाव बांधला होता. 30 वर्षापेक्षा अधिक कालावधी करिता तलावाने त्याचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने केले. प्रदुषणाच्या वाढत्या पातळीमुळे तलावाचा जलस्त्रोत म्हणुन वापर संपुष्टात आला आहे. 1958 मध्ये तलावाजवळ अंबाझरी उद्यान तयार करण्यात आले. पर्यटक निसर्ग सौंदर्य आणि कौटुंबिक वेळ याचा या जागी एकत्रित आनंद घेतात.

भूगोल

अंबाझरी तलाव महाराष्ट्रातील नागपुरच्या नैऋत्य दिशेच्या सीमेवर आहे, त्याची ऊंची सुमारे 72.2 फुट आहे. त्यांच्या उत्तरेस फुटला तलाव आहे आणि त्याच्या दक्षिणेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.  

वातावरण/हवामान

हा प्रदेश वर्षभर बर्‍याच अंशी शुष्क असतो, आणि उन्हाळा तीव्र असतो. उन्हाळ्यामध्ये तापमान सुमारे 30-40 अंश सेल्सियस असते.

हिवाळ्यामध्ये तापमान 10 अंश सेल्सियस पर्यन्त खाली जाते.

या प्रदेशात सरासरी वार्षिक पर्जन्यमान सुमारे 1064.1 मिमी आहे.

काय काय करु शकाल

अंबाझरी तलाव हे नागपुर मधील महत्वाचे पर्यटन आकर्षण म्हणुन विकसित करण्यात आले आहे. शारीरिक हालचालींसाठी इथे अनेक उपक्रम आणि सुविधा तैनात करण्यात आल्या आहेत. उदाहरणा दाखल काही उपक्रम जसे की सांगीतिक  कारंजी, करमणुकीचे खेळ आणि त्याशेजारील बागेत इलेक्ट्रिक राईड्स आहेत.  अंबाझरी तलावात बोटिंगची सुविधा आहे आणि चालण्यासाठी मुद्दाम बनविलेला ट्रॅक आहे. तलाव आणि लगतच्या उद्यानामुळे अंबाझरी हे स्थानिक आणि पर्यटकांसाठी सुट्टीचे चांगले ठिकाण बनले आहे.

जवळची पर्यटन स्थळे  

  • श्री गणेश मंदिर टेकडी (7 किमी) – टेकडीवर गणपतीचे एक प्राचीन मंदिर आहे ज्याला ‘टेकडीचा गणेश’ म्हणुन ओळखले जाते आणि स्थानीकांमध्ये ज्याचे खूप महत्व आहे. 
  • दीक्षाभूमी (3 किमी) – दीक्षाभूमी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपुर येथे स्थित बौद्ध धर्माचे पवित्र स्मारक आहे; जिथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी अशोक विजया दशमीला मुख्यत: अनुसुचीत जातीतील सुमारे 600000  अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला.
  • रामटेक किल्ला आणि मंदिर (55 किमी) – रामटेक हे जैन तीर्थंकरांच्या विविध पुरातन मूर्ती आणि त्यांच्या प्राचीन जैन मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. मुख्य मूर्ती ही शांतीनाथ म्हणुन ओळखल्या जाणार्‍या  सोळाव्या शतकातील तीर्थंकरांची आहे.
  • फुटाला तलाव (4.4किमी ) – फुटाला तलाव हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील नागपुर येथील एक तलाव आहे. हा तलाव 60 एकर एवढा व्यापलेला आहे. नागपुरच्या भोसले घराण्याने बनवलेला हा तलाव त्याच्या रंगीत कारंज्यांसाठी ओळखला जातो. संध्याकाळी कारंज्यांसह प्रकाशित दिवे यामुळे हे स्थान अतिशय सुंदर बनुन जाते.

या पर्यटन स्थळावर रेल्वे, हवाई, रस्ता ( ट्रेन, विमान, बस) मार्गे कसे जायचे, अंतर आणि लागणार्‍या वेळासह

अंबाझरी तलाव हा रस्त्याने जाता येते जो महामार्गांना जोडलेला आहे. मुंबई 807किमी ( 16 तास 20 मिनिटे ), अमरावती 157 किमी (3 तास 20 मिनिटे ), नांदेड 342 किमी ( 7 तास), अकोला 248 किमी ( 6 तास 15 मिनिटे ) या शहरांपासून राज्य परिवहन मंडळ, खाजगी आणि लक्झरी बस उपलब्ध आहेत.

जवळचे विमानतळ: 5 किमी (12 मिनिटे) अंतरावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ

जवळचे रेल्वे स्टेशन: 6.5 किमी ( 20 मिनटे) वरील नागपुर रेल्वे स्टेशन

विशेष अन्नपदार्थ वैशिष्ट्य आणि हॉटेल

विदर्भ प्रांतातील खाद्यपदार्थांना साओजी पाककृती किंवा वर्‍हाडी पाककृती म्हणतात. नागपुरचे पारंपारिक खाद्यदार्थ हे त्यात घातलेल्या मसाल्यांचे स्वाद आणि  रुचि संपन्नता यासाठी प्रसिद्ध आहेत. लवंगा, वेलची , खसखस, काळी मिरी, तमालपत्र, आणि धने हे या भागातील पाककृतींच्या रस्श्यामध्ये वापरले जाणारे मसाले आहेत.

जवळील राहण्याच्या व्यवस्था आणि हॉटेल/हॉस्पिटल/पोस्ट ऑफिस/पोलिस स्टेशन

अंबाझरी तलावाजवळ अनेक हॉटेल्स आणि रिसॉर्ट आहेत.

अंबाझरी तलावाजवळ असंख्य हॉस्पिटल्स आहेत.

अंबाझरी तलावाजवळचे पोस्ट ऑफिस हे 2.2 किमी वर आहे.

अंबाझरी तलावाजवळचे पोलिस स्टेशन हे 1.2 किमी वर आहे.

जवळच्या एमटीडीसी रिसॉर्टचा तपशील

अंबाझरी तलावाजवळ एमटीडीसी रिसॉर्ट उपलब्ध आहे.

भेट देण्याचे नियम आणि वेळ

भेट देण्यासाठी उत्तम महिना

अंबाझरी तलाव हा वर्षभर 24 तास खुला असतो.

हा सुंदर तलाव पाहायला कोणतेही प्रवेश शुल्क नाही.

अक्टोबर ते  फेब्रुवारी हा कालावधी  तलावाला भेट देण्यासाठी उत्तम काळ असतो या  काळात उर्वरित वर्षाच्या तुलनेत थंड हवामान असते.  

या भागात बोलली जाणारी भाषा

इंग्रजी, हिन्दी आणि मराठी.