• Screen Reader Access
  • A-AA+
  • NotificationWeb

    Title should not be more than 100 characters.


    0

Asset Publisher

अंबरनाथ

अंबरनाथ हे मुंबई महानगर क्षेत्रातील उपनगरीय शहर आहे. प्राचीन अंब्रेश्वर शिवमंदिरावरून या शहराला हे नाव मिळाले.
जिल्हा/विभाग    

ठाणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत.

ऐतिहासिक माहिती    
अंबरनाथ मंदिर अंबरनाथमधील एका छोट्या ओढ्याच्या काठावर आहे. हे ११ व्या शतकातील भूमीजा शैलीचे मंदिर आहे, जे शिलहारा कलेचा उत्कृष्ट नमुना मानले जाते. काळ्या बेसाल्टचा वापर करून मंदिर बांधण्यात आले. हे मंदिर शिवाला समर्पित आहे आणि त्यात अनेक कलाकृती, प्रतिमा आणि फलक आहेत जे शैव धर्माचे महत्त्व दर्शवतात. गर्भगृहात शिवलिंग किंवा भगवान शिव यांचे प्रतीक स्थापित केले आहे. मंदिराच्या उत्तर भागात १०६० काळातला संस्कृत शिलालेख आहे. प्रवेशद्वारावर दोन मोठे, सुंदर आणि समृद्ध कोरीव खांब आहेत. मुख्य प्रवेशद्वाराव्यतिरिक्त आणखी दोन प्रवेशद्वार आहेत. भगवान शिव यांचे वाहन असलेल्या नंदीची मूर्ती प्रवेशद्वारावर आहे. मंदिराचे दोन विभाग आहेत. दोन्ही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरलेले बुरुज, खांब आणि छप्पर आहे. या मंदिराच्या वास्तुकलेत सममिती हा एक महत्त्वाचा पैलू आहे. मंदिराचे स्तंभ नृत्य आकृत्या, भौमितिक डिझाईन्स इत्यादी जोड्यांमध्ये कोरलेले आहेत. अनेक हिंदू देवी -देवता मंदिराच्या दर्शनी भागावर कोरलेल्या आहेत. हे मंदिर या राज्यातील सर्वात जुने आणि जतन केलेले भूमीजा मंदिर आहे.
१०६० मध्ये शिलाहार राजा चित्तराजा पहिले यांनी हे मंदिर बांधले. मंदिर जरी शिलाहाराच्या काळात बांधले गेले असले तरी इथल्या कला आणि वास्तुकलेवर इतर राजवंश जसे चालुक्य आणि सोलंकी यांचा प्रभाव दिसून येतो.  हे मंदिर शैव सिद्धांत शैलीवर आधारित आहे, जी  शैव धर्माची आणखी एक विचारधारा आहे. मंदिर स्थापत्य आणि आध्यात्मिक स्मारकाचे सुंदर उदाहरण आहे. हे मंदिर भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत येते.
धार्मिक विधी पार पाडण्यासाठी एक मोठे अंगण जे सुसंस्कृत पवित्र स्थान वाटते. मंडप, हॉलला तीन प्रवेशद्वार आहेत. मंदिराचे आतील भाग कथात्मक फलक, शिल्प आणि भौमितिक रूपांनी सजलेले आहे. प्रत्येक पदक अद्वितीयपणे दगडात कोरलेले आहे. खांब अत्यंत विस्तृत कोरीवकाम आणि शिल्पकला पॅनेलसह सुशोभित केलेले आहेत.
मुख्य मंदिरातून आत मंदिराच्या गाभाऱ्यात उतरावे लागते. गाभाऱ्याचे आतील भाग साधे आहेत तिथे कोणतीही सजावट नाही. एकेकाळी पश्चिम भारतात लोकप्रिय असलेल्या भूमीजा शैलीतील गाभाऱ्याची अथवा गर्भगृहाची अधोसंरचना आज जीर्ण अवस्थेत आहे.

भौगोलिक माहिती    
मुंबईपासून ४९ किमी अंतरावर अंबरनाथमध्ये हे मंदिर आहे.

हवामान     
•    या भागातील मुख्य ऋतु म्हणजे पावसाळा, कोकण पट्ट्यात पाऊस (सुमारे २५०० मिमी ते ४५०० मिमी) इतका पडतो आणि हवामान दमट व उबदार असते. पावसाळ्यात तापमान ३० अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.
•    उन्हाळा गरम आणि दमट असतो आणि तापमान ४० अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.
•    कोकणातील हिवाळा तुलनेने सौम्य हवामान (सुमारे २८ अंश सेल्सिअस) आहे आणि हवामान थंड आणि कोरडे असते. 

करण्यासारख्या गोष्टी      
मंदिराच्या बाह्य भिंतींवर अप्रतिम शिल्पे आहेत.
मंदिराची स्थापत्यकलेची भव्यता मनाला भुरळ पाडते. 

जवळची पर्यटनस्थळे     
मंदिर परिसरापासून सुरू होणाऱ्या डोंगर रांगांमध्ये सुंदर ट्रेकिंग स्थळे आहेत.
•    मलंगगड किल्ला (१७.७ किमी)
•    विकटगड किल्ला (४७.७ किमी)
•    चंदेरी किल्ला (३७ किमी)
•    माथेरान हे प्रसिद्ध हिल स्टेशन अंबरनाथ पासून ३८ किमी अंतरावर आहे. 

रेल्वेने, विमानाने आणि रस्त्याने (ट्रेन, विमान, बस) तसेच ठराविक वेळेत पर्यटन स्थळावर कसे पोहोचावे     
•    जवळचे रेल्वे स्टेशन: अंबरनाथ रेल्वे स्टेशन (१.६ किमी) आहे.
•    जवळचे विमानतळ: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई (४८.५ किमी).
•    स्टेशनवरूनच कॅब किंवा खाजगी वाहन भाड्याने घेता येते.

खाद्य वैशिष्ट्य आणि हॉटेल्स    
मंदिर परिसरात अनेक रेस्टॉरंट्स उपलब्ध आहेत. वडा पाव, पाव भाजी, फ्रँकी रोल अशा अनेक खाद्यपदार्थ मंदिराबाहेर उपलब्ध आहेत.

जवळच्या निवास सुविधा आणि हॉटेल/ हॉस्पिटल/ पोस्ट ऑफिस/पोलीस स्टेशन    
•    या परिसरात आणि आसपास विविध हॉटेल्स आहेत.
•    शिवकृपा हॉस्पिटल ०.६५ किमी अंतरावर सर्वात जवळचे हॉस्पिटल आहे.
•    जवळचे पोलीस स्टेशन शिवाजी नगर पोलीस स्टेशन आहे (१.९ किमी)

जवळपासचे एमटीडीसी रिसॉर्ट    
MTDC टिटवाळा रिसॉर्ट १८.३ किमी अंतरावर आहे.
MTDC रेसिडेन्सी ३३ किमी अंतरावर आहे. 

पर्यटनासाठीचे नियम आणि वेळ, पर्यटनासाठी योग्य काळ      
•    मंदिर दररोज सकाळी ८.०० वाजल्यापासून संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत खुले असते. 
•    या मंदिराला भेट देण्याचा सर्वोत्तम महिना फेब्रुवारी-मार्च आहे.
•    महाशिवरात्रीच्या दिवसात हजारो भाविक अंबरनाथ मंदिराला भेट देतात

या ठिकाणी बोलल्या जाणाऱ्या भाषा     
इंग्रजी, हिंदी, मराठी.