• Screen Reader Access
  • A-AA+
  • NotificationWeb

    Title should not be more than 100 characters.


    0

Asset Publisher

अमरावती

अमरावती हे महाराष्ट्रातील प्रचंड सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व असलेले शहर आहे. विदर्भाची सांस्कृतिक राजधानी म्हणूनही ओळखले जाते. नागपूर नंतर अमरावती हे विदर्भातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. येथे एक खूप मोठे वाघ आणि वन्यजीव अभयारण्य आहे.

जिल्हे/प्रदेश

अमरावती जिल्हा, महाराष्ट्र, भारत.

इतिहास       

या ठिकाणाचे पुरातन नाव उंबरावती होते परंतु चुकीच्या उच्चारांमुळे ते अमरावती झाले. हे महाराष्ट्राच्या ईशान्य दिशेला आहे. हे ठिकाण इंद्रदेवाचे शहर आहे असे मानले जाते आणि येथे भगवान श्रीकृष्ण आणि अंबादेवीची विविध मंदिरे आहेत. 18 व्या शतकाच्या शेवटी अमरावती शहराची स्थापना झाली. पूर्वी या ठिकाणावर हैदराबादच्या निजामांचे राज्य होते आणि नंतर ते ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने ताब्यात घेतले. देवगाव आणि अंजनगाव सुर्जीच्या करारानंतर आणि गावीगडावर (चिखलदरा किल्ला) विजय मिळवल्यानंतर राणोजी भोसले यांनी शहराची पुनर्बांधणी आणि विकास केला. असे मानले जाते की ब्रिटिश जनरल आणि लेखक वेलेस्ली यांनी अमरावतीमध्ये तंबू ठोकून राहिले होते, म्हणून त्याला 'कॅम्प' म्हणूनही ओळखले जाते.

भूगोल         

अमरावती नागपूरच्या पश्चिमेला 156 किमी अंतरावर आहे आणि अमरावती जिल्हा व अमरावती विभागाचे प्रशासकीय केंद्र आहे. अमरावती शहर समुद्र सपाटीपासून 340 मीटर वर स्थित आहे. जिल्हा प्रामुख्याने दोन भौगोलिक प्रदेशांमध्ये विभागला गेला आहे, सातपुडा पर्वतरांगामधील मेळघाटचा डोंगराळ भाग आणि सपाट भाग. हे वर्धा आणि पूर्णा या दोन प्रसिद्ध नद्यांच्या दरम्यान स्थित आहे ज्या अनुक्रमे त्याच्या पूर्व आणि पश्चिमेस आहेत. शहराच्या पूर्व भागात दोन महत्वाचे तलाव आहेत, छत्री तलाव आणि वडाळी तलाव. पोहरा आणि चिरोडी टेकड्या शहराच्या पूर्वेला आहेत. मालटेकडी टेकडी शहरात आहे, जी 60 मीटर उंच आहे. हे राज्याची राजधानी मुंबईपासून 685.3 किलोमीटर अंतरावर आहे.

हवामान/वातावरण

हा प्रदेश मुख्यतः वर्षभर कोरडा असतो आणि प्रचंड उन्हाळा असतो. उन्हाळ्यात तापमान सुमारे 48 अंश सेल्सिअस असते.

येथे थंडीत 10 डिग्री सेल्सिअस इतके कमी असते

या प्रदेशात सरासरी वार्षिक पाऊस सुमारे 1064.1 मिमी आहे.

करावयाच्या गोष्टी    

अमरावतीमध्ये वडाळी तलाव नावाचा तलाव आहे, जो मुळात आसपासच्या लोकांना शुद्ध पाणी देण्यासाठी बांधण्यात आला आहे, शनिवार व रविवारी हा तलाव कौटुंबिक पिकनिकसाठी एक परिपूर्ण ठिकाण आहे.

निवांत बसण्यासाठी, वॉटर स्पोर्ट्स, प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी, किंवा रम्य निसर्गचित्र फक्त अनुभवण्यासाठी या. आकाशात बदलते रंग पाहण्यासाठी सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ असेल. शिवाय, भेट देण्यासाठी अनेक धार्मिक स्थळे आहेत.

जवळचे पर्यटन स्थळ        

अमरावतीच्या जवळ असलेल्या खालील पर्यटन स्थळांना भेट देण्याचे ठरवू शकता.

चिखलदरा: चिखलदरा हे महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण आणि नगरपरिषद आहे. अमरावतीपासून 80 किमी उत्तर दिशेला आहे. हरिकेन पॉईंट, प्रॉस्पेक्ट पॉईंट आणि देवी पॉईंटवरून चिखलदराच्या निसर्गसौंदर्याचा आनंद घेता येतो. इतर जवळच्या ठिकाणांमध्ये गविलगड आणि नरनाला किल्ला, पंडित नेहरू बोटॅनिकल गार्डन, आदिवासी संग्रहालय आणि सेमाडोह तलाव यांचा समावेश आहे.

मेळघाट व्याघ्र प्रकल्प: मेळघाट हा व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आला होता आणि 1973-74 मध्ये वाघ प्रकल्पांतर्गत अधिसूचित केलेल्या पहिल्या नऊ व्याघ्र प्रकल्पांपैकी एक होता. हे महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्याच्या उत्तरेस, मध्य प्रदेशच्या सीमेवर नैऋत्य दिशेला सातपुडा पर्वत रांगांमध्ये वसलेला आहे. मेळघाट हा मराठी शब्द आहे ज्याचा अर्थ 'घाटांची मेळ' असा होतो. वाघांशिवाय इतर प्रमुख प्राणी स्लॉथ बेअर, इंडियन गौर, सांबर हरण, बिबट्या, नीलगाय इ. आहेत.

2017 मध्ये व्याघ्र प्रकल्पात अंदाजे 2,000 चौरस किमी मध्ये 41 वाघांची नोंद झाली आहे. पर्यटक सर्व ऋतूंमध्ये मेळघाट पाहू शकतात परंतु पावसाळा जुलैपासून सप्टेंबरच्या अखेरीपर्यंत सुरू होतो आणि सर्वोत्तम दिसते. हिवाळ्यात थंड असते आणि रात्रीचे तापमान 5 अंशांपेक्षा कमी होते. उन्हाळा प्राणी पाहण्यासाठी चांगला असतो.

मुक्तागिरी: मुक्तागिरी ज्याला मेंढागिरी म्हणूनही ओळखले जाते ते भारतातील मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर स्थित एक जैन तीर्थक्षेत्र आहे. हे बैतूल जिल्ह्यातील भैंसदेही तालुक्यात येते आणि अमरावतीपासून 65 किमी अंतरावर आहे. ह्याच्या भोवती धबधबा आणि आधुनिक वास्तुकलेत बांधलेली अनेक जैन मंदिरे आहेत. मुक्तागिरी सिद्ध क्षेत्र हे धबधब्यांच्या पार्श्वभूमीवर सातपुडा पर्वत रांगांमध्ये स्थित 52 जैन मंदिरांचे संकुल आहे.

कोंडेश्वर मंदिर: भगवान शिव यांना समर्पित कोंडेश्वर मंदिर हे दक्षिण अमरावतीमध्ये 13.3 किलोमीटर अंतरावर घनदाट जंगलाच्या मध्यभागी असलेले एक प्राचीन हत्ती मंदिर आहे. हे मंदिर प्राचीन हेमाडपंथी वास्तुकलेचे प्रतिनिधित्व करते आणि हे काळ्या दगडांचा वापर करून बांधले गेले. मंदिराच्या भोवती सातपुडा डोंगररांगा आहेत.

रेल्वे, हवाई, रस्त्याने (ट्रेन, उड्डाण, बस) द्वारे पर्यटन स्थळास अंतर आणि आवश्यक वेळ लक्षात घेऊन प्रवास कसा करावा  

अमरावती रस्त्याद्वारे महाराष्ट्र राज्याच्या आत व बाहेरील सर्व महत्वाची गावे आणि शहरांशी चांगले जोडलेले आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) इंटरसिटी आणि आंतरराज्य प्रवासासाठी परिवहन सेवा पुरवते. अनेक खाजगी वाहतुकी अमरावती - पुणे आणि अमरावती - इंदूर मार्गावर धावतात. नागपूर, यवतमाळ, भोपाळ, हरदा, इंदूर, रायपूर, जबलपूर, मुंबई, पुणे, अकोला, धारणी, नांदेड, औरंगाबाद, जालना, बुरहानपूर, परभणी, सोलापूर, खंडवा, गोंदिया, शिर्डी, हैदराबाद, परतवाडा (अचलपूर) आणि कोल्हापूर शहरांसाठी बस सेवा देखील उपलब्ध आहेत.

जवळचे विमानतळ: अमरावती प्रादेशिक विमानतळ 15.6 किमी (29 मिनिटे)

डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर 154 किमी (2 तास 51 मिनिटे)

जवळचे रेल्वे स्टेशन: अमरावती (1.1 किमी), नवीन अमरावती (4.3 किमी), अमरावती बायपास केबिन (6.5 किमी).

विशेष खाद्यपदार्थ आणि हॉटेल     

अमरावती महाराष्ट्राच्या विदर्भात असल्याने मसालेदार आणि गोड पदार्थ हे येथील वैशिष्ट्य आहे. तथापि, येथील रेस्टॉरंट्समध्ये विविध प्रकारच्या पाककृती देतात. या प्रदेशातील काही प्रसिद्ध गोड पदार्थ शिरा, पुरी, बासुंदी आणि श्रीखंड आहेत, जे मुख्यतः दुधाने बनवले जातात. पुरण पोळी हा एक प्रसिद्ध गोड पदार्थ आहे जो गव्हाच्या पिठाच्या कणकेच्या गोळ्यात हरभरा डाळ आणि गूळ भरून बनवला जातो. गाय आणि म्हैस हे दुधाचे प्राथमिक स्त्रोत आहेत आणि सामान्यतः वापरले जातात.

जवळच्या निवास सुविधा आणि हॉटेल/हॉस्पिटल/पोस्ट ऑफिस/पोलीस स्टेशन     

अमरावतीत विविध हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स उपलब्ध आहेत.

अमरावतीपासून सुमारे 0.1 किमी अंतरामध्ये रुग्णालये आहेत.

सर्वात जवळचे पोस्ट ऑफिस अमरावतीमध्ये 0.6 किमी अंतरावर आहे.

सर्वात जवळचे पोलीस स्टेशन अमरावतीत 0.5 KM अंतरावर आहे.

जवळचे एमटीडीसी रिसॉर्ट          

एमटीडीसी रिसॉर्ट अमरावतीत चिखलदरा येथे 195 किलोमीटर अंतरावर उपलब्ध आहे.

         

स्थळास भेटीचे नियम आणि वेळ, भेटण्यासाठीचा सर्वोत्तम महिना     

ह्या ठिकाणी वर्षभर जाऊ शकतो परंतु सर्वोत्तम वेळ नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान म्हणजे जेव्हा तापमान 20 ते 32 अंश सेंटीग्रेडच्या आसपास असते. पर्यटकांचा शहर पाहण्याचा गर्दीचा मौसम आहे.

परिसरात बोलली जाणारी भाषा    

इंग्रजी, हिंदी, मराठी, वऱ्हाडी.