• स्क्रीन रीडर प्रवेश
  • A-AA+
  • NotificationWeb

    Title should not be more than 100 characters.


    0

Asset Publisher

आरवली उन्हाळे ( गरम पाण्याचा झरा)

भारतातील महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यात आरवली गावात आरवली उन्हाळे ( गरम पाण्याचा झरा) आहे. गड नदीवरील पुलाच्या दक्षिणेला हा निसर्गाचा आविष्कार आहे. या उन्हाळ्याचे ( गरम पाण्याच्या झर्‍याचे ) सरासरी तापमान हे ४०° से. इतके असते.  

जिल्हा/प्रदेश    
रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र, भारत.  

इतिहास     
काही शतकांपूर्वी या उन्हाळ्याचा (गरम पाण्याचा झर्‍यांचा) शोध लागला. पुरुष व स्त्रियांकरिता स्वतंत्र सोय म्हणुन याभवती दोन स्वतंत्र कुंड बांधण्यात आली.  हिंदू धर्मियांसाठी धार्मिक दृष्टीने या उन्हाळ्याचे ( गरम पाण्याच्या झर्‍यांचे ) खूप महत्व आहे  आणि ते त्याची पुजा करतात. याशिवाय यात औषधी गुणधर्म आहेत असे मानले जाते आणि  रोगातून मुक्त होण्यासाठी त्वचा रोग असलेले लोक इथे भेट देतात. 

भूगोल      
आरवली उन्हाळे (गरम पाण्याचे झरे) हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात सह्याद्री पर्वत रांगांमध्ये आहे. हे चिपळुणच्या दक्षिणेला  २९ किमी आणि सातार्‍याच्या आग्नेय दिशेला १४९ किमी आहे.    

वातावरण/हवामान    
या ठिकाणी हवामान उष्ण व दमट असुन भरपूर पाऊस पडतो, कोकण पट्ट्यात भरपुर म्हणजेच सरासरी २५०० मिमी ते ४५०० मिमी इतका पाऊस पडतो. या हंगामात तापमान ३० अंश सेल्सियस पर्यन्त पोचते. 
उन्हाळ्यात हवामान गरम आणि दमट असते, आणि तापमान ४० अंशापर्यन्त पोचते. 
हिवाळ्यात तुलनेने सौम्य हवामान असते (सुमारे २८ अंश ) आणि वातावरण थंड आणि कोरडे राहते. 

काय काय करु शकाल    
तुम्ही आध्यात्मिक असाल तर येथे विश्रांति घेणे आणि पवित्र स्नान घेणे खूपच सुखदायी आहे . निसर्गरम्य सौंदर्यासाठी हे ठिकाण ओळखले जाते. 

जवळची पर्यटन स्थळे     
•भाट्याचा समुद्रकिनारा
भाट्याचा समुद्रकिनारा हा महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यातील भाट्ये येथे असलेला एक अप्रतिम समुद्रकिनारा आहे. कोकण किनार्‍यावर वसलेले, रत्नागिरीतील सर्वोत्तम पर्यटन स्थळांपैकी हे एक आहे. आरवली उन्हाळ्यापासूनचे  ( गरम पाण्याच्या झर्‍यापासून) याचे अंतर हे ६१.७ किमी इतके आहे. 
•जयगडचा किल्ला 
जयगडचा किल्ला १६ व्या शतकात विजापुरच्या राजघराण्याने बांधला असे म्हटले जाते. पुढे तो संगमेश्वरच्या नाईकांच्या हातात गेला.  जयगड किल्ल्याची तटबंदी ही किनार्‍यालगत असुन, हा रत्नागिरी जिल्ह्यातील शास्त्री नदीच्या खाडीच्यानजीक अगदी टोकाला आहे. 
•थिबा राजवाडा 
ब्रम्हदेश (आत्ताचे म्यानमार) चे माजी सम्राट थिबा यांना नजर कैदेत ठेवण्याकरिता ब्रिटिश सरकारने १९१० मध्ये थिबा राजवाडा बांधला होता. १९१६ पर्यन्त म्यानमारचे सम्राट आणि महाराणी येथे रहात होते. आता या राजवाड्यात एक संग्रहालय आहे.  आरवली उन्हाळया पासून (गरम पाण्याचा झर्‍या पासून) चे याचे अंतर ५९.४ किमी आहे. 
•रत्नदुर्ग किल्ला 
रत्नागिरी किल्ला, याला रत्नादुर्ग किल्ला किंवा भगवती किल्ला असेही म्हणतात. हा किल्ला बहामनी काळात बांधलेला आहे. १६७० साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला विजापूरच्या अदिलशाहा कडून ताब्यात घेतला. याचे आरवली उन्हाळ्या (गरम पाण्याचा झर्‍यापासून) अंतर ६३ किमी आहे. 
•वेळणेश्वर समुद्रकिनारा 
हे गाव १२०० वर्षे जुने आहे असे मानले जाते. माडांच्या सुंदर लागवडीने वेढलेला आणि स्वच्छ, साफ समुद्रकिनारा म्हणून प्रसिद्ध आहे. याचे आरवली उन्हाळ्या (गरम पाण्याचा झर्‍यापासून) अंतर ६३.८ किमी आहे.
•सवतसडा धबधबा 
सवतसडा हा धबधबा त्याच्या मंत्रमुग्ध करणार्‍या सौंदर्यासाठी ओळखला जातो. हा मुंबई- चिपळूण मार्गावरून सहज दिसतो आणि याला भेटही देता येते. याचे   आरवली उन्हाळ्या (गरम पाण्याचा झर्‍यापासून) अंतर ३१.४ किमी आहे.
• गोवळकोट किल्ला 
गोवळकोट हा वासिष्ठी नदीच्या दक्षिण किनारी वसलेला लहान किल्ला आहे.  जंजीर्‍याच्या सिद्धि हबशींनी केलेल्या बांधणी साठी हा किल्ला प्रसिद्ध आहे. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी ताब्यात घेतला आणि त्याचे नामकरण गोविंदगड असे केले. याचे  आरवली उन्हाळ्या (गरम पाण्याचा झर्‍यापासून) अंतर ३१.६ किमी आहे.
• गणपतीपुळे 
गणपतीपुळे हे महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवरील रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी शहराच्या उत्तरेस २५ किमी अंतरावर वसलेले एक छोटे गाव  आहे. गणपतीपुळे येथील ४०० वर्ष जुनी गणपतीची मूर्ती स्वयंभू म्हणजे स्वत: उद्भवलेली असल्याचे म्हटले जाते. याचे  आरवली उन्हाळ्या (गरम पाण्याचा झर्‍यापासून) अंतर ५६.६ किमी आहे.
• मांडवी समुद्र किनारा 
रत्नागिरी शहरातील मांडवी समुद्र किनार्‍याचा विस्तार खूप मोठा आहे. हा किनारा राजिवडा बंदरा पर्यन्त पसरलेला असून दक्षिणेकडे अरबी समुद्राला मिळतो.  येथे मिळणार्‍या काळ्या वाळूमुळे याला काळा समुद्र म्हणून ओळखला जातो. हे रत्नागिरीचे प्रवेशद्वार म्हणूनही प्रसिद्ध आहे. याचे  आरवली उन्हाळ्या (गरम पाण्याचा झर्‍यापासून) अंतर ६१.८ किमी आहे.
• आंजर्ले 
दरवर्षी फेब्रुवारी ते मे पर्यन्त, आंजर्ले समुद्रकिनार्‍यावर हजारो ऑलिव रीडले कासवे दिसतात जे अरबी समुद्राच्या दिशेने प्रवास सुरू करतात. याचे  आरवली उन्हाळ्या (गरम पाण्याचा झर्‍यापासून) अंतर १०६.६ किमी आहे.

या पर्यटन स्थळावर रेल्वे, हवाई, रस्ता ( ट्रेन, विमान, बस) मार्गे कसे जायचे, अंतर आणि लागणार्‍या वेळासह     
आरवली उन्हाळे (गरम पाण्याचे झरे) रस्त्यापासून जवळ आहेत. 
• गोवा ते आरवली उन्हाळे ( गरम पाण्याचे झरे) : ३०२ किमी ( ७ तास ९ मिनिटे ) 
• मुंबई ते आरवली उन्हाळे ( गरम पाण्याचे झरे ) : २६९.६ किमी ( ६ तास ४३ मिनिटे) 
• ठाणे ते आरवली उन्हाळे ( गरम पाण्याचे झरे) : २७० किमी (६ तास ५५ मिनिटे) 

जवळचे विमानतळ : 
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक विमानतळ रत्नागिरी विमानतळ,  ( डोमेस्टिक विमानतळ) ५४.५ किमी ( १ तास १७ मिनिटे) 
जवळचे रेल्वे स्टेशन : 
आरवली रोड ७.१ किमी ( ११ मिनिटे). 

विशेष अन्नपदार्थ वैशिष्ट्य आणि हॉटेल     
या ठिकाणी पाककृतींचा खजिना आहे ज्यात हापुस आंबे, काजू, आंबोळी, सांदण, आणि अनेक प्रकारची सरबते आहेत ज्यात विशेषत: कोकम सरबत आहे. शिवाय त्यासोबत इतर चविष्ट पदार्थ जसे आंबापोळी, सोळकढी, मोरी मसाला करी किंवा शार्क करी आणि मालवणी मटन करी आणि इतर अनेक  उत्कृष्ट कोकणी पदार्थ आहेत.  

विविध प्रकारची हॉटेल्स आणि हॉटेल्सच्या खोल्या आरवली रत्नागिरी मध्ये आहेत. 
आरवली उन्हाळ्यांपासून  ( गरम पाण्याच्या झर्‍यांपासून) १३.३ कमी (२२ मिनिटे ) वर जवळ हॉस्पिटल उपलब्ध आहेत. 
आरवली उन्हाळ्यांपासून  ( गरम पाण्याच्या झर्‍यांपासून) ६.४ किमी ( ८ मिनिटे ) वर जवळ पोस्ट ऑफिस उपलब्ध आहे. 
आरवली उन्हाळ्यांपासून  ( गरम पाण्याच्या झर्‍यांपासून ) ११.२ किमी ( १७ मिनिटे) वर जवळ पोलिस स्टेशन आहे. 

जवळच्या एमटीडीसी रिसॉर्टचा तपशील     
एमटीडीसी शी संबंधित हॉटेल चिपळूणमध्ये उपलब्ध आहे आणि जवळचे एमटीडीसी चे रिसॉर्ट वेळणेश्वर येथे उपलब्ध आहे. 

पर्यटन मार्गदर्शक माहिती 
भेट देण्याचे नियम आणि वेळ 
भेट देण्यासाठी उत्तम महिना 
या ठिकाणी वर्षभर जाता येते. 
परंतु उन्हाळ्यांमध्ये ( गरम पाण्याच्या झर्‍यात ) आंघोळीचं आनंद घेण्यासाठी भेट देण्याची उत्तम कालावधी
हा महाराष्ट्रातील उन्हाळयांच्या ( गरम पाण्याच्या झर्‍याच्या) स्थानावर अवलंबुन असते. 
उन्हाळे ( गरम पाण्याचे झरे ) किंवा जवळचा किनारपट्टीचा प्रांतासाठी, सप्टेंबर ते एप्रिल हा आदर्श कालावधी आहे.  

या भागात बोलली जाणारी भाषा     
इंग्रजी, हिन्दी, मराठी.