• Screen Reader Access
  • A-AA+
  • NotificationWeb

    Title should not be more than 100 characters.


    0

Asset Publisher

अष्टविनायक वरद विनायक मंदिर

अष्टविनायक वरद विनायक मंदिर हे महाराष्ट्रातील गणपती अथवा श्रीगणेशाच्या ८ तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. ही मंदिरे गणपतीशी संबंधित अनेक पौराणिक कथांनी भरलेली आहेत.
जिल्हा/विभाग 
   
रायगड जिल्हा, महाराष्ट्र, भारत.

ऐतिहासिक माहिती    
विनायक गणेश किंवा गणपतीच्या परोपकारी रूपांपैकी एक आहे. मध्ययुगाच्या उत्तरार्धात (१८ व्या शतकात) विनायकाच्या पंथाने पेशवे काळात लोकप्रियता मिळवली. या काळात अनेक आठ विनायक (अष्ट विनायक) उदयास आले. हे अष्टविनायक प्राचीन व्यापारी मार्गांवर स्थित आहेत आणि प्राचीन काळात प्रवाशांचे रक्षक असल्याचे मानले जाते.
महड येथील वरद विनायकाचे मंदिर विनायकाच्या प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. सध्याची रचना जुन्या रचनेचा विस्तार आहे. मंदिराची रचना साधी आहे आणि शिल्प किंवा चित्रांनी सजलेली नाही. वरद विनायक ही मूर्ती स्वयंभू आहे आणि ती शेजारच्या तलावामध्ये सापडली असल्याचे मानले जाते. १६९० मध्ये श्री धोंडू पौडकर यांना तलावात श्री वरदविनायकाची स्वयंभू मूर्ती सापडली. ही मूर्ती जवळच्या देवीच्या मंदिरात काही काळ ठेवण्यात आली होती. प्रसिद्ध वरद विनायक मंदिर १७२५ मध्ये पेशवे सुभेदार रामजी महादेव बिवलकर यांनी बांधले होते आणि त्यांनी हे गावाला भेट म्हणून दिले होते. हे मंदिर अजूनही एका सुंदर तलावाच्या काठावर आहे ज्यातून मूर्ती सापडली. महड वरद विनायक मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे नंदादीप जो १८९२ पासून सतत जळत आहे.
या मंदिरात मुशक (उंदीर, ज्याला गणेशाचे वाहन मानले जाते), नवग्रह देवता (नऊ ग्रह देवतांच्या प्रतिमा) आणि शिवलिंगाच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या चारही बाजूंना चार हत्तींच्या मूर्ती आहेत. या अष्टविनायक मंदिरात भक्त गर्भगृहात प्रवेश करू शकतात आणि मूर्तीची वैयक्तिकरित्या पूजाअर्चा करू शकतात. वर्षभर भक्त वरदविनायक मंदिरात येतात. माघ चतुर्थी सारख्या सणांमध्ये या मंदिरात प्रचंड गर्दी दिसून येते.

भौगोलिक माहिती    
वरद विनायक मंदिर हे मुंबई-पुणे महामार्गावर महड गावात आहे. हे गाव भोर घाट सुरू होण्याच्या अगदी आधी वसलेले आहे. हा एक जुना रस्ता आहे जो मुंबईला पुण्याशी जोडतो.

हवामान     
•    या भागातील मुख्य ऋतु म्हणजे पावसाळा, कोकण पट्ट्यात पाऊस (सुमारे २५०० मिमी ते ४५०० मिमी) इतका पडतो आणि हवामान दमट व उबदार असते. पावसाळ्यात तापमान ३० अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.
•    उन्हाळा गरम आणि दमट असतो आणि तापमान ४० अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.
•    कोकणातील हिवाळा तुलनेने सौम्य हवामान (सुमारे २८ अंश सेल्सिअस) आहे आणि हवामान थंड आणि कोरडे असते.

करण्यासारख्या गोष्टी      
अष्टविनायकाच्या साखळी मंदिरांपैकी एक असलेले हे मंदिर धार्मिक स्थळ असल्याने कोणीही इथे शांतता अनुभवण्यासाठी भेट देऊ शकते. 

जवळची पर्यटनस्थळे     
अष्टविनायक महडच्या आसपास अनेक पर्यटन स्थळे आहेत.
•    लोहगड किल्ला (३०.९ किमी)
•    भुशी धरण (२५.२ किमी)
•    कार्ला बुद्ध लेणी (३२.४ किमी)
•    राजमाची किल्ला (३२.५ किमी)
•    बेडसे लेणी (४७.६ किमी)
•    लोणावळा हिल स्टेशन (२६ किमी)

रेल्वेने, विमानाने आणि रस्त्याने (ट्रेन, विमान, बस) तसेच ठराविक वेळेत पर्यटन स्थळावर कसे पोहोचावे     
•    अष्टविनायक महडला जाण्याचे अनेक मार्ग आहेत:
•    जवळचे विमानतळ: मुंबई (७५.५ किमी), पुणे विमानतळ (९०.३ किमी).
•    जवळची रेल्वे: खोपोली रेल्वे स्टेशन (६.९ किमी)
•    प्रत्यक्षात अष्टविनायक महडला जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे रस्ता. वेगवेगळ्या शहरांमधून अनेक बसेस चालवल्या जातात ज्यामुळे येथे पोहोचणे सुलभ होते.

खाद्य वैशिष्ट्य आणि हॉटेल्स    
हे अस्सल महाराष्ट्रीय पद्धतीच्या जेवणासाठी ओळखले जाते इथे महाराष्ट्रीय पदार्थांची चव अनुभवता येते.

जवळच्या निवास सुविधा आणि हॉटेल/ हॉस्पिटल/ पोस्ट ऑफिस/पोलीस स्टेशन    
•    मंदिराच्या परिसरात हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सची उपलब्धता आहे.
•    खोपोली पोलीस स्टेशन हे जवळचे पोलीस स्टेशन आहे (७ किमी)
•    श्री पार्वती हॉस्पिटल खोपोली हे जवळचे हॉस्पिटल (७.४ किमी) आहे

जवळपासचे एमटीडीसी रिसॉर्ट    
एमटीडीसी कार्ला हे परिसरातील सर्वात जवळचे एमटीडीसी रिसॉर्ट आहे जिथे राहण्याची आणि इतर मूलभूत सुविधा आहेत (२६.८ किमी).

पर्यटन मार्गदर्शक (माहिती)    
संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटन मार्गदर्शक अष्टविनायक मंदिरांच्या दर्शनासाठी टूर आयोजित करतात.

पर्यटनासाठीचे नियम आणि वेळ, पर्यटनासाठी योग्य काळ      
हे मंदिर वर्षाच्या कोणत्याही वेळी भेट देण्यासाठी योग्य आहे परंतु सणासुदीच्या काळात भेट देणे चांगले.
मंदिर पहाटे ५.३० वाजल्यापासून ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले असते. 

या ठिकाणी बोलल्या जाणाऱ्या भाषा     
इंग्रजी, हिंदी, मराठी.