• Screen Reader Access
  • A-AA+
  • NotificationWeb

    Title should not be more than 100 characters.


    0

Asset Publisher

भाजे लेणी

भाजे लेणी ही दख्खनच्या सर्वात प्राचीन बौद्ध मठांपैकी एक म्हणून ओळखली जाते. त्या इसवी सनाच्या दुसऱ्या शतकातील आहे. या समूहात २२ गुहा आहेत.

जिल्हा/प्रदेश

मावळ तालुका, पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत.

इतिहास

दुसरे प्रमुख 'आयटी हब ऑफ इंडिया'-म्हणून ओळखले जाणारे पुणे शहर या परिसरात, भाजे लेण्यांना एक मोठा आणि समृद्ध इतिहास आहे. ह्या लेण्यांना बौद्ध धर्माच्या थेरवडा (हीनयान) परंपरेचा वारसा आहे आणि ह्या पश्चिम भारतातील सर्वात जुन्या लेण्या आहेत. ह्या लेण्या भाजे गावापासून अंदाजे ४०० फूट उंचीवर स्तिथ आहेत.  हा मार्ग एक महत्त्वाचा प्राचीन व्यापारी मार्ग म्हणून वापरला जातो जो अरबी समुद्रापासून पूर्वेकडे दख्खनच्या पठारापर्यंत गेला आहे. हा मार्ग ज्याला 'भोर घाट' असे हि म्हटले आहे, जो कोकण किनारपट्टीच्या बंदरांना दख्खनला जोडणारा एक सामरिक पर्वतमार्ग आहे.

या क्षेत्रातील एकमेव 'चैत्यगृह' (प्रार्थना सभागृह) कोणत्याही क्षेत्राचा तुलनेत विलक्षण मानले जाते. हे महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन चित्रशिल चैत्य गृह आहे. संकुलाच्या सभोवताली एकूण सत्तावीस अष्टकोनी खांब आणि चैत्यगृहाला लाकडी तुळयांचे छत आहे. या तुळयांवर ब्राह्मी लिपीतील लेख आहेत. इथल्या गुहेत लाकडी दर्शनी भागांसह घोड्याच्या नालाचे कमानी प्रवेशद्वार होते. या चैत्यगृहा व्यतिरिक्त, भाजे लेण्यांचा परिसर दगड-विहार आणि स्तूपांनी परिपूर्ण आहे. विहार (मठ) येथे उत्कृष्टतेने साधेपणा दर्शवतात. इथे फक्त अशाच एका विहारात काही वास्तूशास्त्रीय सजावटी आढळतात. या साधेपणासह, अनेक विहार आहेत जे दुमजली आहेत. १४ चित्रशिल स्तूपांमध्ये गुरूंचे अवशेष आहेत ज्यांचे येथे वास्तव्य होते आणि कालांतराने ते मृत पावले. तिथे त्यांचे अनेक स्मारक बांधले गेले आहेत. ह्या क्षेत्राचा दुसऱ्या टोकाला असलेल्या विहारात दख्खनच्या आरंभीच्या कलेच्या शिल्पकलेच्या उत्कृष्ट नमुने आहेत. व्हरांड्याच्या जवळील दोन फलक कोरलेले आहेत ज्यात दरवाजाला हत्ती स्वार आणि रथ स्वार त्यांच्या सहकाऱ्यांसह दर्शविलेले आहेत. काही विद्वान ह्या स्तूपांची ओळख सूर्य (सूर्य देव) आणि इंद्र (देवांचे राजे) ह्या नावाने करतात.  इथला व्हरांडा इतर काही शिल्पकलेच्या स्तूपांनी परिचर आणि काही कथात्मक दृश्यांनी सजलेला आहे.

भूगोल

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात मुंबई-पुणे महामार्गावर पुण्यापासून वायव्ये दिशेस जवळजवळ ५९. २ किलोमीटर अंतरावर भाजे लेणी आहेत. लोणावळा, एक प्रसिद्ध हिल-स्टेशन, ह्या क्षेत्रा पासून १२ किमी अंतरावर आहे. लेण्यांचा समूह विसापूर किल्ल्याच्या डोंगरात कोरलेला आहे.

हवामान

पुण्याचे हवामान वर्षभर उष्ण-आणि अर्ध-शुष्क असते आणि सरासरी तापमान १९-३३ अंश सेल्सिअस असते.
एप्रिल आणि मे महिना हे पुण्यातील सर्वात उष्ण हवामान असलेले महिने आहेत जेव्हा तापमान ४२ अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.
हिवाळ्यात पुण्याचे हवामान अत्यंत तीव्र असते आणि रात्री तापमान १० अंश सेल्सिअस इतके खाली जाऊ शकते, परंतु दिवसाचे सरासरी तापमान सुमारे २६ अंश सेल्सिअस असते.पुणे विभागात वार्षिक पाऊस सुमारे ७६३ मिमी होतो

येथे काय करावे

भाजे लेण्यांचा संपूर्ण परिसर एखाद्याला भूतकाळात फिरण्याचा अनुभव घेऊ देतो.

ह्या क्षेत्रातील आवर्जुन भेट देण्याचे इतर स्थळ

गुहा ६- अनियमित विहार.

गुहा ९- लाकडी किंव्हा लोखंडी पॅटर्नचे दागिने, तुटलेली प्राण्यांची बांधणी, व्हरांडा.

गुहा १२ - चैत्यगृह अखंड स्तूप दालन.

गुहा १९- इंद्र आणि सूर्य विहार

जवळची पर्यटन स्थळे

भाजे लेण्यांच्या जवळपास अनेक पर्यटन स्थळे आहेत. भाजे लेण्यांसह खालील पर्यटन स्थळांना भेट दिली जाऊ शकते:

  • कार्ला लेणी - ७. २ किमी
  • नारायणी धाम मंदिर - १३. ५ किमी
  • लोणावळा - १२. १ किमी
  • लोहगड - ८ किमी
  • विसापूर किल्ला - २ किमी

विशेष खाद्य वैशिष्ट्य आणि हॉटेल

जवळपासच्या रेस्टॉरंटमध्ये विविध प्रकारच्या पाककृती उपलब्ध आहेत. महाराष्ट्रीयन व्यंजने हे स्थानिक वैशिष्ट्य आहे.

जवळ उपलब्ध असलेली राहण्याची ठिकाणे, आणि हॉटेल, हॉस्पिटल, पोस्ट ऑफिस/ पोलीस स्टेशन

भाजे लेणी जवळ आरामदायी, आरोग्यदायी आणि परवडणारी राहण्याची उत्तम व्यवस्था  इतर मूलभूत सुविधांसहित उपलब्ध आहेत.

क्षेत्राला भेट देण्याचे नियम आणि वेळ, भेट देण्याचा सर्वोत्तम महिना

पर्यटकांनी आपल्या सोबत टोप्या औषधे (आवश्यक असल्यास), सनस्क्रीन, पाण्याची बाटली, कॅमेरा यासारख्या आवश्यक गोष्टी ठेवणे गरजेचे आहे

ह्या क्षेत्रातील लेणी ला भेट देण्याची वेळ सकाळी ९:०० ते संध्याकाळी ५:०० पर्यंत काटेकोरपणे आहे

ह्या क्षेत्रातील लेणी ला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हे सर्वोत्तम महिने आहेत.

इथे उन्हाळ्यात येणे टाळला पाहिजे कारण तेव्हा येथे हवामान अत्यंत उष्ण आणि दमट असते

क्षेत्रात बोलल्या जाणाऱ्या भाषा

इंग्रजी, हिंदी, मराठी.