• Screen Reader Access
  • A-AA+
  • NotificationWeb

    Title should not be more than 100 characters.


    0

Asset Publisher

भराडीदेवी मंदिर

भराडीदेवी मंदिर, जे आंगणेवाडी मंदिर म्हणूनही ओळखले जाते ते आंगणेवाडी जत्रेसाठी प्रसिद्ध आहे जी इथे दरवर्षी साजरी केली जाते.
जिल्हा/विभाग
    
सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र, भारत.

ऐतिहासिक माहिती
भराडीदेवी मंदिर हे 'जागृत देवस्थान' मानले जाते. भराडीदेवी देवी तिच्या इच्छा पूर्ण करण्याची शक्ती (नवस) साठी प्रसिद्ध आहे. लोक तिच्याकडे आपल्या इच्छा व्यक्त करतात आणि ते पूर्ण झाल्यावर ते पुन्हा कृतज्ञतेने आणि दृढ विश्वासाने तिला भेट देतात.
भराडी देवीच्या उत्पत्तीच्या अनेक दंतकथा आहेत, एक अशी आहे की ४०० वर्षांपूर्वी खडकाळ मातीमध्ये एक देवी दगडी पाट्याच्या स्वरूपात प्रकट झाली. तेव्हापासून तिला भराडीदेवी म्हटले जाते.
भराडीदेवीची आंगणेवाडी जत्रा ग्रामस्थांच्या संमतीने ठरवली जाते. जत्रेच्या दिवस संमतीने ठरविण्याची पद्धत अतिशय रोचक आहे. कापणी संपल्यानंतर, ग्रामस्थ देवीला प्रसाद म्हणून अर्पण करण्यासाठी वन्य प्राण्याची शिकार करण्यासाठी एकत्र येतात. नंतर जनावर शिजवले जाते आणि ग्रामस्थांमध्ये वाटले जाते जे नंतर जत्रेसाठी योग्य दिवस ठरवतात. विधी सकाळी ४.०० वाजता सुरू होतात आणि पहिल्या दिवशी रात्री १०.०० वाजता संपतात. दुसऱ्या दिवशी विधी पुन्हा पहाटे ४.०० वाजता सुरू होतात आणि दुपारी संपतात, या दिवसाला 'मोड जत्रा' (जत्रेचा शेवट) म्हणतात. जत्रा दीड दिवसांची असते, परंतु उत्सव ४-५ दिवस चालतात.
मंदिर आधुनिक काळातील असले तरी ते पारंपरिक शैलीत बांधलेले आहे.

भौगोलिक माहिती    
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गड नदीच्या पूर्वेला आंगणेवाडी गावात आहे.

हवामान    
या भागातील प्रमुख ऋतू म्हणजे पाऊस, कोकण किनार पट्ट्यात जास्त पाऊस (सुमारे २५०० मिमी ते ४५०० मिमी) अनुभवायला मिळतो आणि हवामान दमट आणि उबदार असते. पावसाळ्यात तापमान ३० अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.
उन्हाळा फार गरम आणि दमट असतो आणि तापमान ४० अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.
कोकणात हिवाळ्यात तुलनेने सौम्य हवामान (सुमारे २८ अंश सेल्सिअस) असते आणि हवामान थंड आणि कोरडे असते.

करण्यासारख्या गोष्टी      
मंदिर आणि निसर्गरम्य परिसराला भेट द्या.

जवळची पर्यटनस्थळे     
•    भारतगड किल्ला (६.९ किमी)
•    रामेश्वर मंदिर (७.९ किमी)
•    मिरवेलवाडी धबधबे (८.३ किमी)
•    सर्जेकोट सुवर्णकडा बीच (१३.६ किमी)
•    सिंधुदुर्ग किल्ला (१६.१ किमी)
•    रामगड किल्ला (१९.१ किमी)
•    तारकर्ली बीच (१९.७ किमी)- साहसी खेळांसाठी प्रसिद्ध.
•    वेताळगड किल्ला (१९.८ किमी)
•    इनामदार श्री रामेश्वर मंदिर (२२.९ किमी)
•    कुणकेश्वर मंदिर (४५.३ किमी)
•    दाजीपूर वन्यजीव अभयारण्य (७४.२ किमी)
•    विजयदुर्ग किल्ला (७५.७ किमी)
•    राजापूर गंगा मंदिर (८५.६ किमी)

रेल्वेने, विमानाने आणि रस्त्याने (ट्रेन, विमान, बस) तसेच ठराविक वेळेत पर्यटन स्थळावर कसे पोहोचावे     
•    जवळचे विमानतळ: कोल्हापूर विमानतळ (१४७ किमी)
•    गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ (१४० किमी)
•    जवळचे रेल्वे स्टेशन: कणकवली रेल्वे स्टेशन (३३.२ किमी)
•    कुडाळ रेल्वे स्टेशन (३४.५ किमी)
•    जवळचे स्टेशन सिंधुदुर्ग (२६.५ किमी) असले तरी सर्व गाड्या तिथे थांबत नाहीत.
•    रस्त्याने: कुडाळ आणि कणकवली रेल्वे स्थानकांवरून खाजगी वाहने आणि ऑटो उपलब्ध आहेत.
•    कणकवलीहून MSRTC बसेसही आहेत.
•    मुंबईहून राष्ट्रीय महामार्ग ४८ (NH 48) किंवा राष्ट्रीय महामार्ग ६६ (NH 66) ने जाता येते.

खाद्य वैशिष्ट्य आणि हॉटेल्स    
मालवणी पाककृती ही इथली खासियत आहे ज्यात मुख्य घटक म्हणून मासे, तांदूळ आणि नारळ यांचा समावेश आहे.

जवळच्या निवास सुविधा आणि हॉटेल/ हॉस्पिटल/ पोस्ट ऑफिस/पोलीस स्टेशन    
•    सर्जेकोट जवळ हॉटेल्स आणि होमस्टे.
•    सर्जेकोट जवळ रेस्टॉरंट्स.
•    जवळचे पोस्ट ऑफिस: पोस्ट ऑफिस हाडी (१३.३ किमी)
•    जवळचे पोलीस स्टेशन: मालवण पोलीस स्टेशन (१५.८ किमी)
•    मालवणमधील जवळची रुग्णालये. (१४ किमी)

जवळपासचे एमटीडीसी रिसॉर्ट    
MTDC तारकर्ली रिसॉर्ट (१९.३ किमी)

पर्यटनासाठीचे नियम आणि वेळ, पर्यटनासाठी योग्य काळ      
मंदिराच्या आत छायाचित्रण करण्यास सक्त मनाई आहे.
प्रत्येक वर्षी फेब्रुवारी महिन्यात जत्रा असते, जिचे इथे विशेष महत्व आहे. मंदिर वर्षभर खुले असते.

या ठिकाणी बोलल्या जाणाऱ्या भाषा     
इंग्रजी, हिंदी, मराठी.