• स्क्रीन रीडर प्रवेश
  • A-AA+
  • NotificationWeb

    Title should not be more than 100 characters.


    0

Asset Publisher

भिरा धरण

पर्यटन स्थळे/ जागा यांची नावे आणि स्थळांचे थोडक्यात ३-४ ओळींमध्ये वर्णन 

भिरा धरण महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील भारताच्या पश्चिम किनार्‍याजवळील रोहा तालुक्यात आहे. कुंडलिका नदीवर हे धरण आहे आणि याला टाटा पावरहाऊस धरण म्हणूनही ओळखले जाते. हे धरण जल विद्युत निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे, पण त्याच बरोबर हे लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून देखील खूप प्रसिद्ध आहे. 


जिल्हा/प्रदेश    
रायगड जिल्हा, महाराष्ट्र, भारत.  

इतिहास     
टाटा पावर हाऊस धरण म्हणून प्रसिद्ध असलेले भिरा धरण, अद्भुत धबधबा असलेल्या कोलाड जवळील छोट्या नयनरम्य गावात आहे. 1927 साली टाटा पावर कंपनीने बांधलेले हे धरण भारतातील विशाल जलविद्युत प्रकल्पांपैकी एक मानले जाते. या धरणातील पाणी जवळच्या गावांना सिंचनासाठी वापरले जाते. या प्रकल्पामधून निर्माण होणारी वीज मुंबई पुणे प्रदेशातील अनेक औद्योगिक आस्थापनांना मोठा आधार ठरली आहे. 

भूगोल      
भिरा पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या डोंगराळ प्रदेशात आहे. हे मुंबईच्या आग्नेय दिशेला 132 किमी आहे आणि पुण्याच्या पश्चिमेला 104 किमी आहे. 

वातावरण/हवामान    
या ठिकाणी हवामान उष्ण आणि दमट असुन भरपुर पाऊस पडतो, कोकण पट्ट्यात सरासरी 2500 मिमी ते 4500 मिमी इतका जास्त पाऊस पडतो. या हंगामात तापमान 30 अंश सेल्सियस पर्यन्त पोचते. 
उन्हाळा गरम आणि दमट असतो आणि तापमान 40 अंश सेल्सियस पर्यन्त पोचते. 
हिवाळ्यात हवामान तुलनेने सौम्य असते ( सुमारे 28 अंश सेल्सियस), आणि वातावरण थंड आणि कोरडे राहते. 

काय काय करु शकाल    
भिरा त्याच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे, पावसाळ्यात सह्याद्रीच्या पर्वत रांगा ढगांनी झाकल्या जातात आणि आणि मुंबई पुण्यातील पर्यटकांना या ठिकाणची हिरवीगार हिरवळ आकर्षित करते. हे ठिकाण बोटिंग, ट्रेकिंग, फोटोग्राफी आणि पिकनिकसाठी प्रसिद्ध आहे. काही हंगामी धबधबे धरणक्षेत्रा भोवती तयार होतात. 


जवळची पर्यटन स्थळे     
▪देवकुंड धबधबा :  धारणापासून 1.2 किमी वर असलेला देवकुंड धबधबा हिरव्या शेतांनी आणि उंच कड्यांनी वेढलेला एक मोहक धबधबा आहे. पर्यटकांना नयनरम्य देखावा तसेच ट्रेकचा आनंद घेता येऊ शकतो. 

▪ताम्हीणी घाट : भिरा धरणाच्या दक्षिणेला 23.7 किमी अंतरावर वसलेले हे ठिकाण निसर्गसौंदर्य आणि  जोरदार वाहणारे धबधब्यांनी आहे. हे ट्रेकर्स आणि निसर्ग्प्रमींसाठी एक लोकप्रिय वीकेंड भटकंतीचे ठिकाण आहे.

▪कोलाड : भिरा च्या पश्चिमेस 29.4 किमी वसलेले आहे. कोलाड रिव्हर राफ्टिंग तसेच बंजी जम्पिंग सारख्या साहसी खेळासाठी खूप लोकप्रिय आहे. हे रॅपिड्स आणि रिव्हर राफ्टिंगसाठी महाराष्ट्रचे ऋषिकेश म्हणून प्रसिद्ध आहे. 

▪प्लस व्हॅली ट्रेक : भिरा पासून 31.3 किमी अंतरावर हे ठिकाण आहे. माध्यम स्तरीय ट्रेकिंग ट्रेल आहे जे त्याचा श्वास रोखणार्‍या दृश्यांसाठी ओळखले जाते. हे ताम्हीणी घाटाजवळ आहे. 

▪रायगड किल्ला : भिराच्या दक्षिण बाजूला हा किल्ला आहे, 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत हा किल्ला बांधण्यात आला. हा किल्ला स्वराज्याची राजधानी होता. याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक झाला होता. 

या पर्यटन स्थळावर रेल्वे, हवाई, रस्ता ( ट्रेन, विमान, बस) मार्गे कसे जायचे, अंतर आणि लागणार्‍या वेळासह     या जागी जायला थेट बस उपलब्ध नाही. मुंबईहून भिराला रस्त्याने आणि रेल्वेने  पोचता येते. हे  एनएच 66 या मुंबई गोवा महामार्गाला जोडलेले आहे. शिवाय वाकण वरूनही भिराला जाता येऊ शकते. पुण्याहुन  ताम्हीणी घाट मार्गे  हे 104 किमी ( 3 तास 35 मिनिटे) अंतरावर आहे. 


जवळचे विमानतळ :

पुणे विमानतळ 112 किमी ( 3 तास 50 मिनिटे) 


जवळचे रेल्वे स्टेशन :

कोलाड 28.7 किमी ( 50 मिनिटे)  


विशेष अन्नपदार्थ वैशिष्ट्य आणि हॉटेल     

इथे फारशी रेस्टोरंट उपलब्ध नाहीत, पर्यटकांनी स्वत:च स्वत:चे जेवण सोबत आणावे. आधीच आगाऊ ऑर्डर दिली तर या परिसरातील काही हॉटेल्स जेवण देतात. 
जवळील राहण्याच्या व्यवस्था आणि हॉटेल/हॉस्पिटल/पोस्ट ऑफिस/पोलिस स्टेशन     हॉटेल्स, कॉटेज, होमस्टे, नदीजवळ तंबू लाऊन राहणे अश्या स्वरुपात निवासी व्यवस्था उपलब्ध आहे.  
कोलाडच्या आसपास असंख्य हॉस्पिटल आहेत. 
जवळचे पोस्ट ऑफिस 1 किमी अंतरावर आहे. 
जवळचे पोलिस स्टेशन 1.4 किमी अंतरावर आहे. 

जवळच्या एमटीडीसी रिसॉर्टचा तपशील     
जवळील एमटीडीसी रिसॉर्ट हे भिरा पासून 89.9 किमी वर कर्ला येथे आहे. 
  
पर्यटन मार्गदर्शक माहिती 

भेट देण्याचे नियम आणि वेळ 
भेट देण्यासाठी उत्तम महिना 

इतर ऋतूंच्या तुलनेत येथे उन्हाळा थोडा दमट असला तरी पावसाळा हा भेट देण्यासाठी उत्तम काळ आहे. 
पावसाळ्यात संपूर्ण प्रदेश जणू जिवंत होतो, एखादी व्यक्ती प्रचंड वेगाने वहाणारे असंख्य धबधबे आणि नद्या पाहु शकते.  
हिवाळ्यामध्ये एखाद्याला कमी आलेल्या तापमानासह या भागाच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेता येतो.  

या भागात बोलली जाणारी भाषा     
इंग्रजी, हिन्दी, मराठी