• A-AA+
  • NotificationWeb

    Title should not be more than 100 characters.


    0

WeatherBannerWeb

Asset Publisher

About भुशी धरण


भुशी धरण हे भारतातील महाराष्ट्रातील लोणावळा येथील इंद्रायणी नदीवरील एक धरण आहे. भुशी धरण हे पुणे आणि मुंबई मधील पर्यटकांसाठी तसेच स्थांनिकांसाठी विकेंड भटकंतीसाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी आहे. भुशी धरणाचे पाणी, पावसाळ्यात जेव्हा पायर्‍यावरून ओसंडुन वाहते तेव्हाचे दृश्य विलोभनीय असते. 

जिल्हा /प्रदेश    
पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत.

 
इतिहास     
भुशी धरण 19 व्या शतकात ग्रेट इंडियन प्रायद्वीप रेल्वेने त्यांच्या वाफेच्या इंजिनासाठी पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी बांधले होते. 2014 च्या माहिती नुसार, हे भारतीय रेल्वेच्या सेंट्रल रेल्वे झोनच्या मालकीचे आहे. महानगरपालिका प्राधिकरणाच्या निधीतून धरण बांधण्यात आले असल्याने रेल्वे कंपनीने नंतर लोणावळा शहराला पाणी देण्याचे मंजूर केले. 2011 मध्ये भारतीय नौदल, भारतीय नौदल स्टेशन शिवाजी येथे प्रशिक्षण उपक्रमांसाठी भुशी  धरण आणि भूगाव तलाव ताब्यात घेण्याकरिता पुढे आले, जे धरणाच्या पश्चिमेला 1.5 किमी अंतरावर आहे. 
    
भूगोल      
भुशी धरण हे लोणावळा येथे आहे. मुंबईच्या आग्नेयस आणि पुण्याच्या वायव्येस सह्याद्रीच्या रांगांमध्ये एक थंड हवेचे ठिकाण आहे. पुण्याजवळील सर्वात जास्त भेट दिलेल्या थंड हवेच्या ठिकाणांपैकी एक आहे. 
    
वातावरण/हवामान    
या प्रदेशात वर्षभर उष्ण काही प्रमाणात शुष्क हवामान असते आणि सरासरी तापमान 19-33 अंश सेल्सियस असते. 
एप्रिल आणि मे हे सर्वात उष्ण महीने असतात जेव्हा तापमान 42 अंश सेल्सियस पर्यन्त पोचते. 
हिवाळा अत्यंत तीव्र असतो आणि रात्री तापमान 10 अंश सेल्सियस इतके खाली जाऊ शकते, परंतु दिवसाचे सरासरी तापमान सुमारे 26 अंश सेल्सियस असते. 
या भागात वार्षिक पाऊस सुमारे 4200 मिमी इतका असतो 

काय काय करु शकाल    
लोणावळ्यातील भुशी धरण हे पुणे आणि इतर जवळपासच्या शहरातील लोकांसाठी एक लोकप्रिय विकेंड भटकंतीचे ठिकाण आहे. हिरवेगार डोंगर, पाण्याचा विलक्षण आवाज, पक्ष्यांचा किलबिलाट, आणि नेहमीचे प्रसन्न हवामान यामुळे लोणावळ्यातील पर्यटकांचे विशेषत: पावसाळ्यातले आकर्षण केंद्र आहे. पाण्याच्या चंचल प्रवाहामुळे अधिकारी या धरणात पोहण्यास परवानगी देत नसले तरी पर्यटकांना येथे अनेक गोष्टी करता येऊ शकतात. 

     
जवळची पर्यटन स्थळे     
अॅम्बी व्हॅली : 
भारतातील महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील, लोणावल्या पासून 24 किमी अंतरावर असलेली ही एक टाउनशिप आहे. ही सहारा परिवाराने विकसित केली आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य असलेल्या डिझाईन द्वारे अंदाजे 10000 एकरचा डोंगराळ प्रदेश यामुळे एक प्रभावी पॅनोरामा तयार झाला आहे. भव्य शहरी पायाभूत सुविधा, शांत वातावरण आणि या ठिकाणी विशेषत्वाने जगभरातील भेट देणार्‍या लोकांना आकर्षित केले आहे. 


लोणावळा तलाव : 
हा तलाव लोणावळ्याचा बाहेरच्या बाजूला आहे आणि इंद्रायणी नदी यातून वाहते. हा तलाव पावसाळ्यात भरून वाहतो  आणि हिवाळ्यात हा तलाव पूर्ण सुकून जातो ज्यामुळे हा हंगामी तलाव म्हणून प्रसिद्ध आहे. हे पिकनिक साठी प्रसिद्ध ठिकाण असून या ठिकाणी पक्षी निरीक्षण , तसेच पोहणे अशा गोष्टी करता येतात. 


कारल्याची लेणी :
 करला लेणी ही प्राचीन बौद्ध दगडात कोरलेली लेणी आहेत आणि लोणावळ्याजवळील एक प्रसिद्ध पर्यटन आकर्षण आहे. हे भारतातील प्राचीन बौद्ध लेण्यांपैकी एक आहे. यातील गुहेचा गाभारा हा भारतातील सर्वात मोठ्या चैत्य स्थानापैकी ( स्तूप असलेला प्रार्थना हॉल) आहे. कारला लेणी आतमध्ये असलेल्या एकवीरा देवीच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहेत. पूर्व इतिहास काळात हे वेलुरका म्हणून ओळखले जात होते, या कारला लेण्यांमध्ये एकवीरा देवीला समर्पित मंदिरासह 15 मीटर उंच स्तंभ आहे.  


▪ टायगर लिप : 
टायगर लिप पाहण्याची जागा लोणावळ्यापासून सुमारे 8 किलोमीटर अंतरावर आहे आणि हे या ठिकाणचे प्रमुख आकर्षण आहे.  वातावरण ढगाळ नसेल तर सूर्योदय आणि सूर्यास्ताला दिसणार्‍या भव्य दृश्यासाठी लोकप्रिय आहे. दरी मध्ये झेप घेणार्‍या वाघाच्या आकाराशी साधर्म्य असल्यामुळे या जागेला टायगर लिप असे नाव पडले. टायगर लिप वरील एको पॉइंटनेही पर्यटकांना आकर्षित केले आहे. 
    
या पर्यटन स्थळावर रेल्वे, हवाई, रस्ता ( ट्रेन, विमान, बस) मार्गे कसे जायचे, अंतर आणि लागणार्‍या वेळासह     भुशी धरण मुंबई पासून 90 किमी अंतरावर आहे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाने कुणीही बसने किंवा स्वत: गाडी चालवत जाऊ शकते. काही गाड्या मुंबई ते लोणावल्या पर्यन्त जातात आणि या ठिकाणी जायला फक्त दोन किंवा अडीच तास लागतात. 
जवळचे विमानतळ : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ 75 किमी ( 1 तास 47 मिनिटे), 
छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळ 93 किमी ( 2 तास 10 मिनिटे).   
जवळचे रेल्वे स्टेशन : लोणावळा रेल्वे स्टेशन 4.5 किमी ( 15 मिनिटे)
    
विशेष अन्नपदार्थ वैशिष्ट्य आणि हॉटेल     
लोणावल्या सहलीत आवर्जून खाऊन पहावे असे काही लोकप्रिय पदार्थ आणि स्नॅक्स म्हणजे छोला भाटुरा, बटर चिकन, आणि चोकोलेट फज. तसेच महाराष्ट्रियन मिसळ चाखुन  बघा जी मोड आलेले मसूर आणि घेवड्याची बनलेली असते. परिपूर्ण शाकाहारी अनुभवासाठी, पारंपरिक शाकहारी थाली खाऊन बघा.  हे ठिकाण चिक्कीसाठी प्रसिद्ध आहे ( शेंगदाणे आणि गुळासह सुखामेवा यांचे मिश्रण. )
    
जवळील राहण्याच्या व्यवस्था आणि हॉटेल/हॉस्पिटल/पोस्ट ऑफिस/पोलिस स्टेशन     
अनेक हॉटेल आणि रिसॉर्ट भुशी धरणाजवळ आणि लोणावळा येथे उपलब्ध आहेत. 
भुशी धरणपसून 5.5 किमी वर अनेक हॉस्पिटल आहेत. 
जवळचे पोस्ट ऑफिस 4.2 किमी अंतरावर आहे. 
जवळचे पोलिस स्टेशन हे 4.3 किमी अंतरावरती आहे. 
     
जवळच्या एमटीडीसी रिसॉर्टचा तपशील     
एमटीडीसी शी संबंधित रिसॉर्ट खंडाळा येथे 9 किमी वर आहे. 
     
भेट देण्याचे नियम आणि वेळ 
भेट देण्यासाठी उत्तम महिना 
भुशी धरणाच्या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी, भुशी धरणाला भेट देण्याचा उत्तम कालावधी म्हणजे पावसाळा, जून ते सप्टेंबर दरम्यान, जेव्हा धरण पाण्याने ओसंडून वाहते.  भुशी धरण पाण्याने ओसंडते. कधीकधी पाण्याचा वेग धोकादायक होतो आणि पायर्‍या निसरड्या असतात. पर्यटकांनी अतिवृष्टी मध्ये जाणे टाळावे.  
     
या भागात बोलली जाणारी भाषा     
इंग्रजी, हिन्दी, मराठी     
 


Tour Package

Hotel Image
Blue Diamond Short Break Bustling Metropolis

2N 1Day

Book by:

MTDC Blue Diamond

Where to Stay

Responsive Image
MTDC associated resort

MTDC associated resort is available at Khandala at a distance of 9 KM.

Visit Us

Tourist Guides

No info available