• स्क्रीन रीडर प्रवेश
  • A-AA+
  • NotificationWeb

    Title should not be more than 100 characters.


    0

Asset Publisher

बोधलकसा धरण

बोधलकसा धरण हे तिरोडाजवळील भागदेवगोटी नदीवर मातीने केलेले  धरण आहे. या भागातील शांत ठिकाणांपैकी एक आहे निठे नैसर्गिक शांताता अनुभवता येईल.  जंगल सफारी आणि निसर्गात भटकंती करून निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी आणि आराम करण्यासाठी योग्य ठिकाण आहे. 

जिल्हा/प्रदेश    
गोंदिया जिल्हा, महाराष्ट्र, भारत.  

इतिहास     
1917 मध्ये सिंचन सुधारण्याच्या दृष्टीने बोधलकसा  धरण  बांधण्यात आले. हे धरण महाराष्ट्र राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली आहे . धरणाची ऊंची १९.२ मीटर आणि ५१० मीटर लांब आहे. 

भूगोल      
बोधलकसा हे महाराष्ट्राच्या पूर्व भागात आहे. या प्रदेशाला विदर्भ असे म्हणतात. बोधलकसा हे गाव तीन बाजूंनी घनदाट जंगलणे वेढलेले आहे आणि याच्या चौथ्या  बाजुला धरण आहे. हे मध्य प्रदेशला अतिशय जवळ आहे.  

वातावरण/हवामान    
हा प्रदेश जवळपास वर्षभर शुष्क असतो , आणि उन्हाळा तीव्र असतो. उन्हाळ्यातील तापमान सुमारे ३०-४० अंश सेल्सियस पर्यन्त असते. 
हिवाळ्यात तापमान १० अंश सेल्सियस पर्यन्त खाली येते. 
या भागातील सरासरी वार्षिक पर्जन्यमान सुमारे १०६४.१ मिमी इतके आहे. 

काय काय करु शकाल    
मागेझरी नागझिरा जंगलचे प्रवेश द्वार बोधलकश्यापासून  ४.४ किमी ( ८ मिनिटे) वर आहे; एखादी व्यक्ती इथे जंगलसफारीचा आनंद घेऊ शकते. 
घोटी जिंदतोळा नैसर्गिक सफर इथून ३.१ किमी म्हणजे बोधलकसा  पासून 5 मिनिटेवर आहे: कोणी व्यक्ती येथे सोपा ट्रेक किंवा सहज चालण्याचा आनंद घेऊ शकते. 
काही जलक्रीडा जशा की रायडिंग, पॅडलिंग, स्पीडबोट इत्यादि सध्या बोधलकसा येथे  नव्याने चालू केले आहे.  

जवळची पर्यटन स्थळे 
•नावेगगाव नॅशनल पार्क : ही पार्क गोंदिया जिल्ह्याच्या दक्षिण भागात, बोधलकसा पासून ८५ किमी वर आहे. हे महाराष्ट्राच्या पूर्व भागात वसलेले असून त्याचे क्षेत्रफळ १३३.७८ स्क्वे किमी इतके आहे. निसर्ग सवर्धंनाच्या दृष्टीने त्याला खूप महत्व आहे. याठिकाणी पक्ष्यांच्या २०० पेक्षा जास्त प्रजाती आहेत, सरपटणार्‍या प्राण्यांच्या ९ प्रजाती आणि सस्तन प्राण्यांच्या २६ प्रजाती आहेत ज्यात वाघ, बिबट्या, लांडगा, कोल्हा, जंगली मांजर, स्मॅल इंडियन सिव्हेट आणि पाम सिव्हेट यांचा समावेश आहे.  

•नागझिरा वन्यजीव अभयारण्य : नागझिरा वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा आणि गोंदिया जिल्हयाच्या दरम्यान स्थित आहे. हे बोधलकसा पासून १५.६ किमी अंतरावर आहे. हे अभयारण्य निसर्गरम्य आहे आणि रमणीय लँडस्केप, वनस्पतींच्या वैविध्याने समृद्ध आहे. निसर्गाची स्तुति आणि प्रशंसा करण्यासाठी आकाश जिवंत संग्रहालय म्हणून काम करते.  

•कचरगढ लेणी : कचरगढ हे बोधलकसा पासून ७३ कमी अंतरावर आहे आणि येथे असलेलेय नैसर्गिक लेण्यांमुळे हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे जे पुरातत्ववेत्त्यांना  या परिसरात सापडलेल्या दगडी शस्त्रांवरून २५००० वर्षे जुने आहे असे मानले जाते. हे घनदाट जंगलात आहे आणि ज्याने  उत्साही ट्रेकर्सना  आकर्षित केले आहे, स्थानिक जमाती या जागेचा वापर पूजेसाठी करतात.   

•हजारा धबधबा : हा बोधलकसा धारणा पासून ६९ किमी वर आहे. हा प्रचंड वेगाने कोसळणारा असुन, हिरव्या कच्च वनस्पतींनी  वेढलेले, कॅम्पिंग साठी उत्तम ठिकाण आहे. हे दरेकसा रेल्वे स्टेशन पासून फक्त १ किमी अंतरावर आहे.  

या पर्यटन स्थळावर रेल्वे, हवाई, रस्ता ( ट्रेन, विमान, बस) मार्गे कसे जायचे, अंतर आणि लागणार्‍या वेळासह     रस्त्याने बोधलकसाला जाण्यासाठी : 
मुंबई पासून हे ९२९ किमी ( २० तास ) आहे, नागपुरहुन १२० किमी म्हणजेच 3 तासाच्या अंतरावर आहे, बोधलकसाहुन तिरोडा बस स्टँड १७ किमी म्हणजेच २५ मिनिटे अंतरावर आहे.  

हे गोंदियाच्या जिल्हा मुख्यालयापासुन पश्चिमेला २५ किमी अंतरावर आहे. 

जवळचे विमानतळ : 
बिरसी विमानतळ गोंदिया ५३ किमी ( १ तास २० मिनिटे ) 

जवळचे रेल्वे स्टेशन :
 गोंदिया रेल्वे स्टेशन ३० किमी ( ५५ मिनिटे ) 

विशेष अन्नपदार्थ वैशिष्ट्य आणि हॉटेल     
विदर्भात सर्वसाधारणपणे मसालेदार पदार्थ लोकप्रिय आहेत. स्थानिक स्वाद, साओजी पाककृती, मांस किंवा अंड्याची करी, विशेषत: तीव्र मसालेदार चवीसाठी ओळखली जाते. 

अनेक अस्सल महाराष्ट्रियन शाकहारी पदार्थ चाखून बघता येतील.
मिठाईमध्ये ‘संत्र बर्फी’ किंवा ऑरेंज बर्फी प्रसिद्ध आहे.  

बोधलकसा हा ग्रामीण भाग असल्यामुळे, तुम्हाला काही स्थानिक उपहारगृह आणि ‘ढाबे’ येथे मिळून जातील.  
 

जवळील राहण्याच्या व्यवस्था आणि हॉटेल/हॉस्पिटल/पोस्ट ऑफिस/पोलिस स्टेशन     
बोधलकसा जवळ अनेक छोटी हॉटेल्स आणि रेसोर्ट्स आहेत. 
बोधलकसाहुन ३० ते ५० मिंनिटांवर असंख्य हॉस्पिटल्स आहेत. 
जवळचे पोस्ट ऑफिस तिरोडा येथे १७ किमी वर आहे. 
जवळचे पोलिस स्टेशन तिरोडा येथे १७ किमी वर आहे 

जवळच्या एमटीडीसी रिसॉर्टचा तपशील     
एमटीडीसी रिसॉर्ट बोधलकसा येथे आहे.  
  
पर्यटन मार्गदर्शक माहिती 

    
भेट देण्याचे नियम आणि वेळ 
भेट देण्यासाठी उत्तम महिना 

विदर्भात उन्हाळयात जाणे टाळावे. बोधलकसा येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा थंड काळ असतो या कलावधीत जावे.  

या भागात बोलली जाणारी भाषा     
इंग्रजी, हिन्दी, मराठी.