• स्क्रीन रीडर प्रवेश
  • A-AA+
  • NotificationWeb

    Title should not be more than 100 characters.


    0

Asset Publisher

बोर धरण

बोर धरण हे महाराष्ट्रातील, वर्धा जिल्हातील, सेलू तालुक्यात बोर नदीवर बांधलेले मातीचे धरण आहे. हे बोर वन्यजीव अभयारण्याच्या परिसरात आहे, जे त्याचा भोवतालच्या हिरव्या टेकड्यांसह एक उत्तम पिकनिक स्पॉट आणि वीकएंड भटकाती साठी एक ठिकाण आहे. जंगलसारखे हिरवेगार वातावरण असल्यामुळे पक्षांच्या अनेक प्रजाती इथे पहिल्या जाऊ शकतात. 

जिल्हा/प्रदेश    
वर्धा जिल्हा, महाराष्ट्र, भारत.  

इतिहास     
१९६५ मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने सिंचन प्रकल्पाचा एक भाग म्हणुन हे धरण बांधले. बोर सिंचन प्रकल्प हा बोर राष्ट्रीय वन्यजीव अभयारण्य व वाघांच्या संवर्धन क्षेत्रात आहे. या धरणाची पानी साठवण्याची क्षमता १२७.४२ एमसीएम इतकी आहे. पाया लहान असलेल्या या धरणाची ऊंची ३६.२८ मी. आहे आणि याची लांबी ११५८ मी. आहे. 

भूगोल     
वर्धा शहरापासून बोर धरण हे ४० किमी अंतरावर आहे. धरणाचे पाणलोट क्षेत्र हे ३८.०७५ हजार हेक्टर आहे. 

वातावरण/हवामान    
हा प्रदेश वर्षभर शुष्क असतो, उन्हाळे तीव्र असतात. उन्हाळ्यातील तापमान ३०-४० अंश सेल्सियस इतके असते. 
हिवाळ्यातील तापमान १० अंशपर्यंत खाली उतरते. 
या प्रदेशचे सरासरी पर्जन्यमान १०६४.१ मिमी एवढे आहे 

काय काय करु शकाल    
पर्यटक बोर राखीव अभयारण्याला भेट देऊ शकतात. समृद्ध जैवविविधता असलेले हे अभयारण्य शहरातील व्यस्त आणि दमछाक करणार्‍या जीवनापासून मोकळा करणारा एक सुंदर बदल आहे. वन्यजीव अभयारण्य केंद्र आणि बोर सफरीला भेट देऊन पर्यटक त्यांचा दौर्‍याचे नियोजन करू शकतात.   अभयरण्याखेरीज या प्रदेशात इतरही प्रेक्षणीय स्थळे आहेत. या ठिकाणी बौद्ध मंदिरही आहे आणि सुंदर अशा हयुएन त्सांग बौद्ध ध्यान केंद्राला आवश्य भेट द्या. बोर सरोवराने आपल्या निसर्ग रम्य सौंदर्यामुळे पर्यटकांना आकर्षित केले आहे . 

जवळची पर्यटन स्थळे      
●गीताई मंदिर : हे मंदिर धरणापासून ३१.४ किमी अंतरावर आहे. हे छप्पर नसलेले भारतातील एक अद्वितीय मंदिर आहे. त्यात फक्त ग्रँनाईटच्या भिंती आहेत ज्यावर गीताईचे १८ अध्याय ( पवित्र श्रीमत भगद्वत गीतेचे मराठी भाषांतर) कोरलेले आहे. भिंतींनी एक छोटे उद्यान तयार केले आहे. आचार्य विनोबा भावे आणि जमनालाल बजाज यांचे जीवन या ठिकाणी दाखविण्यात आले आहे.    

●विश्व शांती स्तुप: विश्व शांती स्तुप हे नीचिदात्सु फूजी आणि फूजी गुरुजी जसे की राष्ट्रपिता महात्मा गांधी त्यांना हाक मारत असत, त्यांची महत्वाकांक्षा होती.  बुद्धांच्या मूर्ति एका स्तूपवर चारी बाजूंनी लावल्या आहेत, प्रत्येक दिशा त्यांच्या आयुष्यातील महत्वाच्या घटनेचे चित्रण करते असे मानले जाते . त्याच्या जवळच मोठे उद्यान असलेले छोटेसे जपानी बुद्धिस्ट मंदिर आहे. 

●मगन संग्रहालय : या संग्रहालयाचे उट्घाटन राष्ट्रपिता एम. के. गांधी यांच्या हस्ते १९३८ साली झाले.  हे गावाच्या विज्ञान केंद्राजवळ मगणवाडीत आहे. हे शेतीशी संबंधित माहिती, दुग्धव्यवसाय, पशुपालन, डेअरी, चरखा, खादी ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या हस्तकला इत्याशी संबंधित प्रदर्शन आहे. 

●सेवाग्राम आश्राम : सेवाग्राम आश्रमाला ऐतिहासिक महत्व आहे कराण १९३६ ते १९४८ दरम्यान राष्ट्रपिता एम.के. गांधी यांचे निवासस्थान होते. १९३० च्या दांडी यात्रेनंतर गांधीजींना साबरमती येथील त्यांच्या आश्रमात परत जायचे नव्हते. काही वर्षे तुरुंगात घालवल्या नंतर, त्यांनी भारतभर प्रवास केला आणि गांधीवादी उद्योगपती जमनलाल बजाज यांच्या आमंत्रणवर, वर्धा शहरात जमनालाल यांच्या बंगल्यावर काही काळ मुक्काम केला. 

●परमधाम आश्रम/ “ब्रम्हा विद्या मंदिर “ : या आश्रमाची स्थापना आचार्य विनोबा भावे यांनी १९३४ मध्ये पावनार येथे धाम नदीच्या बाजुला अध्यात्मिक उद्देशाने केली होती. यासह त्यांनी येथे ब्रम्ह विद्या मंदिर आश्रम देखील स्थापन केला. आश्रमाच्या बांधकामासाठी खोदकाम करताना, अनेक शिल्प आणि मुर्ती सापडल्या होत्या, त्या आश्रमात ठेवल्या आहेत आणि पर्यटक तिथे भेट देऊ शकतात.  

●केळझर गणपती मंदिर : केळझर गणपती  मंदिर वर्ध्यापासून नागपुरला जाताना सुमारे २६ किमी अंतरावर आहे. हे मंदिर एका टेकडीवर आहे आणि बोर व्याघ्र प्रकल्प आणि पक्षी अभयारण्याजवळील जंगले आणि डोंगर या जागेला निसर्गसौंदर्य प्राप्त करून देतात. पौराणिक दृष्टीनेही या ठिकाणाला खूप महत्व आहे आणि त्याचा उल्लेख महाभारतातही केला गेला आहे. 

प्रवास कसा कराल     
मुंबई ७५८ किमी ( १५ तास २४ मिनिटे), पुणे ६६२ किमी ( १३ तास ३३ मिनते), नागपुर ७२ किमी ( १ तास ३२ मिनिटे ), अकोला २३४ किमी ( ५ तास १ मिनिटे ), अमरावती १२५ इमी ( १४ तास ७ मिनिटे) अशा शहरांमधुन नियमित बस उपलब्ध आहेत.  हिंगी (हिंगणी ) हे जवळचे बस स्थानक ५ किमी अंतरावर आहे. मुंबई, पुणे,  नागपुर येथून राज्य परिवहन मंडळाच्या बसने वर्धा येथे सहज जाता येते. 

जवळचे विमानतळ : 
नागपुर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ ६५ किमी ( १ तास २० मिनिटे) अंतरावर. 

जवळचे रेल्वे स्टेशन 
हे ३५ किमी ( ५० मिनिटे) अंतरावर वर्धा येथे आहे. 

विशेष अन्नपदार्थ वैशिष्ट्य आणि हॉटेल     
या शहराची वैशिष्ट्यपूर्ण प्रादेशिक पाककृती प्रमुख्याने भात आणि चपाती जशी की भाकरी, पोळी किंवा घडीची पोळी अशी आहे. उपमा, वडा पाव, चिवडा, पोहा हे काही महत्वाचे पदार्थ आहेत. वर्ध्यामध्ये मिळणार्‍या काही प्रसिद्ध मिठाई आणि गोड पदार्थ पुराण पोळी, मोदक, गुळाची पोळी, गुलाब जाम, जिलबी, लाडु, श्रीखंड. 

जवळील राहण्याच्या व्यवस्था आणि हॉटेल/हॉस्पिटल/पोस्ट ऑफिस/पोलिस स्टेशन     
बोर धरणाजवळ अनेक हॉटेल आणि रिसॉर्टस आहेत. 
बोर धारणा जवळ जवळपास ३१ किमी ( ४४ मिनिटे) हॉस्पिटल्स आहेत. 
जवळचे पोस्ट ऑफिस सुमारे ५ किमी ( १० मिनिटे) वर आहे. 
जवळचे पोलिस स्टेशन १६.५ किमी ( २८ मिनिटे) अंतरावर आहे. 

जवळच्या एमटीडीसी रिसॉर्टचा तपशील     
एमटीडीसी चे रिसॉर्ट बोर धरणाजवळ ( वर्धा ) येथे उपलब्ध आहे. 
  
पर्यटन मार्गदर्शक माहिती 
    
भेट देण्याचे नियम आणि वेळ 
भेट देण्यासाठी उत्तम महिना 

बोर धरण हे उत्तमपिकनिक स्पॉट आहे . येथे येण्याचा उत्तम कालावधी म्हणजे पावसाळा आणि हिवाळा. बोर धरण व्याघ्र प्रकल्पाने वेढेलेले आहे. वर्षाच्या कोणत्याही महिन्यात अभयारण्याला भेट देता येते परंतु एप्रिल टे मे  हे महीने बोर वन्यजीव अभयारण्याला भेट देण्याचा आदर्श काळ आहे. 

या भागात बोलली जाणारी भाषा     
इंग्रजी, हिन्दी, मराठी