चैत्यभूमी - DOT-Maharashtra Tourism
Breadcrumb
Asset Publisher
चैत्यभूमी
'चैत्यभूमी' हे मुंबईत वसलेले डॉ भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच प्रख्यात आणि आदरणीय बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आहे.डॉ. आंबेडकरांसह भगवान बुद्धांची उपस्थिती लोकांच्या भक्ती आणि निष्ठेचे अनोखे मिश्रण दर्शवते.
जिल्हा/विभाग
दादर, मुंबई, महाराष्ट्र, भारत.
ऐतिहासिक माहिती
निसर्गरम्य दादर किनाऱ्यावर, एक प्रमुख व्यक्तीचे स्मारक आहे ज्याला भेट देणे आवश्यक आहे. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार, अर्थतज्ज्ञ, वकील, तत्त्वज्ञ आणि अत्यंत महत्त्वाचे म्हणजे समाजसुधारक होते.
दादर (मुंबई) येथे स्थित चैत्यभूमी स्मारकाचे उद्घाटन डिसेंबर १९७१ मध्ये त्यांच्या १५ व्या पुण्यतिथीला झाले. प्रत्येक वर्षी ६ डिसेंबर रोजी, स्मारकात त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाच्या विविध भागातून अनुयायांचे समूह मोठ्या संख्येने आलेले दिसतात.
सध्याची इमारत दोन मजली आहे. हे स्तूपच्या शैलीत आहे, ज्यामध्ये बाबासाहेब बौद्ध धर्म स्वीकारत आहेत. त्यांच्या अस्थी, चैत्यभूमीचा मुख्य अवशेष, तळमजल्यावर एका लहान खोलीत आहे. आंबेडकर आणि भगवान बुद्धाची शिल्पे आणि चित्रे, फुलांनी आणि हारांनी सदासर्वकाळ सुशोभित केलेली असतात. दुसरा मजला पांढरा गोलाकार आकाराचा घुमट आहे ज्याच्यावर संगमरवरी प्रतिकात्मक छत्री आहे आणि भिक्खुसाठी (बौद्ध भिक्षु) विश्रांतीची जागा आहे. हा हॉल चौकोनी आकाराच्या रेलिंगने वेढलेला आहे. स्मारकाच्या आश्चर्यकारक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे स्तूपच्या उत्तर आणि दक्षिणेस तोरणा गेटवेचे स्थान, जनावरे, फुले आणि लोकांच्या प्रतिकांनी सुशोभित केलेले, तसेच बौद्ध शिकवणीचे प्रतीक दर्शविणारे शीर्षस्थानी धर्मचक्र आहे. स्मारकात अशोक स्तंभाची प्रतिकृती आहे.
भौगोलिक माहिती
चैत्यभूमी दादर (मुंबई) मध्ये दादर चौपाटीजवळ आहे.
हवामान
या भागातील प्रमुख ऋतू म्हणजे पाऊस, कोकण किनार पट्ट्यात जास्त पाऊस (सुमारे २५०० मिमी ते ४५०० मिमी) अनुभवायला मिळतो आणि हवामान दमट आणि उबदार असते. पावसाळ्यात तापमान ३० अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.
उन्हाळा फार गरम आणि दमट असतो आणि तापमान ४० अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.
कोकणात हिवाळ्यात तुलनेने सौम्य हवामान (सुमारे २८ अंश सेल्सिअस) असते आणि हवामान थंड आणि कोरडे असते.
करण्यासारख्या गोष्टी
डॉ आंबेडकरांच्या स्मारकाला आदरांजली देण्याव्यतिरिक्त, इतरही गोष्टी करू शकता.
स्मरणिका दुकाने आंबेडकर आणि भगवान बुद्धांची कथा दर्शविणारी दिनदर्शिका विकतात.
भगवान बुद्ध आणि डॉ आंबेडकर यांच्या छोट्या मूर्ती विकणारी दुकाने.
जर एखादी व्यक्ती ६ डिसेंबरला भेट देत असेल तर तो/ती संपूर्ण वातावरणाचा आनंद घेऊ शकेल.
जवळपासची स्थानिक बाजारपेठ खरेदीदारांसाठी पर्वणीच!
जवळची पर्यटनस्थळे
चैत्यभूमी अनेक प्रमुख ठिकाणांनी व्यापलेली आहे:
दादर चौपाटी - चैत्यभूमीपासून २ मिनिटे चालणे.
श्री सिद्धिविनायक मंदिर - चैत्यभूमीपासून २.२ किमी.
छत्रपती शिवाजी महाराज उद्यान - चैत्यभूमीपासून १.२ किमी.
हाजी अली दर्गा- चैत्यभूमीपासून ७.४ किमी.
बँडस्टँड - चैत्यभूमीपासून ६.१ किमी.
रेल्वेने, विमानाने आणि रस्त्याने (ट्रेन, विमान, बस) तसेच ठराविक वेळेत पर्यटन स्थळावर कसे पोहोचावे
जवळचे रेल्वे स्टेशन: दादर रेल्वे स्टेशन २.४ किमी अंतरावर, जवळचे विमानतळ: छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ, मुंबई, १०.३ किमी.
चैत्यभूमी रस्त्याने चांगल्या प्रकारे जोडलेले आहे. स्थानिक वाहतूक, तसेच खाजगी वाहतूक सहज उपलब्ध आहे.
खाद्य वैशिष्ट्य आणि हॉटेल्स
अस्सल महाराष्ट्रीय खाद्यपदार्थ, तोंडला पाणी आणणरे मुंबईचे स्ट्रीट फूड तसेच विदेशी जेवण पदार्थ (पिझ्झा, चायनीज इत्यादी) परवडणाऱ्या किमतीत सहज उपलब्ध आहे.
जवळच्या निवास सुविधा आणि हॉटेल/ हॉस्पिटल/ पोस्ट ऑफिस/पोलीस स्टेशन
उत्तम सेवा पुरवणाऱ्या प्रत्येकाच्या खिशाला परवडणाऱ्या निवास सुविधा मुबलक आहेत. इतर मूलभूत गरजा आणि आपत्कालीन सेवा जवळच आहेत.
पर्यटनासाठीचे नियम आणि वेळ, पर्यटनासाठी योग्य काळ
चैत्यभूमी दिवसभर पर्यटकांसाठी खुली आहे.
या ठिकाणी बोलल्या जाणाऱ्या भाषा
इंग्रजी, हिंदी, मराठी.
Gallery
How to get there

By Road
चैत्यभूमी रस्त्याने जोडलेली आहे. स्थानिक वाहतूक, तसेच खाजगी वाहतूक सहज उपलब्ध आहे.

By Rail
जवळचे रेल्वे स्टेशन: दादर रेल्वे स्टेशन 2.4 किमी अंतरावर,

By Air
जवळचे विमानतळ: छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ, मुंबई, 10.3 किमी.
Near by Attractions
Tour Package
Where to Stay
No Hotels available!
Tour Operators
MobileNo :
Mail ID :
Tourist Guides
No info available
Subscription
आमचा पत्ता
पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र
१५ मजला, नरिमन भवन,
नरिमन पॉइंट, मुंबई ४०००२१
diot@maharashtratourism.gov.in
०२२-६९१०७६००
द्रुत दुवे
QR कोड वापरून मोबाइल अॅप डाउनलोड करा

Android

iOS