• A-AA+
  • NotificationWeb

    Title should not be more than 100 characters.


    0

WeatherBannerWeb

Asset Publisher

About चवदार तळे

पर्यटन स्थळे/ जागा यांची नावे आणि स्थळांचे थोडक्यात 3-4 ओळींमध्ये वर्णन 
चवदार तळे हे ब्रिटिश काळापासून सामाजिक क्रांतिकारी महत्व असलेले महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक ठिकाण आहे. महाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी  खालच्या जातीतील लोकांना निषीदधा असलेल्या या तळ्यातील पाणी पिऊन  प्रसिद्धा सत्याग्रह केला होता. 

जिल्हा/प्रदेश    
रायगड जिल्हा, महाराष्ट्र, भारत.  

इतिहास     
20 मार्च 1927 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या सत्याग्रहासाठी चवदार तळे जगात प्रसिद्ध आहे. तलावाची लांबी  100 मीटर, रुंदी 100 मीटर     आणि खोली 5.5 मीटर आहे.  

भूगोल      
महाड कोकण विभागातील रायगड जिल्ह्याच्या दक्षिण टोकावर वसलेले आहे. महाड सह्याद्रि पर्वताने वेढलेले आहे. सावित्री नदी महाबळेश्वर मधील सावित्री पॉइंट पासून उगम पावते आणि महाड मधून वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळते. हे शहर समुद्रसपाटीपासून 59 फुट किंवा 18 मीटर उंचीवर आहे. हापूस आंबा आणि नारळाच्या झाडांच्या वाढीसाठी उपयोगी हवामान महाडमध्ये आहे.  

वातावरण/हवामान    
या ठिकाणी हवामान उष्ण आणि दमट असून भरपुर पाऊस पडतो, कोकण पट्ट्यात 2500 मिमी ते 4500 मिमी पर्यन्त पाऊस पडतो. या हंगामात तापमान 30 अंश सेल्सियस पर्यन्त पोचते. 
उन्हाळे उष्ण आणि दमट असतात आणि तापमान 40 अंश सेल्सियस पर्यन्त पोचते. 
हिवाळ्यात तुलनेने सौम्य हवामान असते ( सुमारे 28 अंश सेल्सियस) आणि वातावरण थंड आणि कोरडे राहते. 

काय काय करू शकता      
चवदार तळे सत्याग्रह हा इतिहासाचा एक सुप्रसिद्ध भाग आहे आणि तो साजरा करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लाखो अनुयायी आणि पर्यटक दरवर्षी मार्च 20 रोजी या ठिकाणी येतात. या तळ्याजवळ एक सुंदर बहूउद्देशीय  सभागृह देखील आहे जेथे विविध पुस्तके तसेच महत्वाच्या ऐतिहासिक घंटनांची तैलचित्रे बघायला मिळतील.  

जवळची पर्यटनाची स्थळे      
●रायगड किल्ला :- चवदार तळ्याच्या उत्तरेला 24.4 किमी वर हा किल्ला आहे, 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत हा किल्ला बांधण्यात आला होता. हा किल्ला स्वराज्याची राजधानी होती. या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक या किल्ल्यवर झाला. 

●लिंगणा किल्ला :- हा चवदार तळ्याच्या पश्चिमेला 32 किमी वर आहे, सिद्धि पासून कोकणचा बचाव करण्यासाठी 1648 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी लिंगणा किल्ला बांधला होता. याचा आकार शिवलिंगाशी साधर्म्य साधणारा आहे, त्यामुळे याचे नाव लिंगाणा असे ठेवले. रायगड आणि तोरणा किल्ल्याचा परिसरातील सर्वात  उंच किल्ल्यांपैकी एक आहे. 

●मांडले धबधबा :- मांडले धबधबा चवदार तळ्यापासून उत्तरेला 11.5 किमी अंतरावर आहे.   याच्या जागेमुळे हा शांत वातावरण निर्माण करतो. या ठिकाणी वातावरण थंड आणि ताजी हवा आहे. हा एका लहान खडकाच्या मागिल बाजूस आहे आणि त्यामुळे नयनरम्य दृश्य तयार होते. याच्या पायथ्याशी एक लहान तलाव तयार झाला आहे, हा तलाव आंघोळ करण्यासाठी किंवा पोहण्यासाठी लहान आहे. 

● अलिबागचा समुद्रकिनारा:- हा चवदार तळ्याच्या पश्चिमेला 108 किमी वर आहे. लंबसडक सरल असलेला हा किनारा लांबवर चालण्यासाठी योग्य आहे. वाळूचा पोत टणक आहे आणि याचा रंग काळा आहे. गोव्यातल्या संस्कृती आणि जलक्रीडा इत्यादी उपक्रमामध्ये साम्य असल्यामुळे हे ‘ मिनी गोवा’ म्हणून लोकप्रिय आहे. 

●अक्षी समुद्रकिनारा :- हा चवदार तळ्याच्या पश्चिमेला 113 किमी अंतरावर आहे  आणि अलिबाग पासून सुमारे 5 किमी अंतरावर आहे. हा पांढर्‍या वाळूचा समुद्रकिनारा आहे ज्यावर असंख्य पाईनची झाडे आहेत. विविध प्रकारचे पक्षी बघण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक या समुद्रकिनार्‍याला भेट देतात आणि त्याच बरोबर विविध वनस्पती  आणि प्राणी बघायला मिळतात. 

●जगदीश्वर मंदिर :- चवदार तळ्याच्या उत्तरेला 170 किमी अंतरावर हे मंदिर आहे, हे मंदिर ग्तर मराठा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत बांधलेले आहे,  रायगडवरील हे महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे जिथे भेट दिली पाहिजे. हे मदिर हे हिंदू मुस्लिम ऐक्याचे चित्रण आहे,  यात संस्कृतीं आणि स्थापत्यकला यांचा सुंदर मिलाप दिसुन येतो. 
या पर्यटन स्थळावर रेल्वे, हवाई, रस्ता ( ट्रेन, विमान, बस) मार्गे कसे जायचे, अंतर आणि लागणार्‍या वेळासह     रायगड किल्ला एनएच 66 महामार्गाला जोडलेला आहे, खाजगी आणि लक्झरी बस मुंबई 162 किमी ( 4 तास 17 मिनिटे ), पुणे 143 किमी ( 3 तास 51 मिनिटे ), कोल्हापूर 247 किमी ( 5 तास 18 मिनिटे ) या शहरांपासून उपलब्ध आहेत. 
जवळचे विमानतळ :- पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ 169 किमी ( 4 तास 21 मिनिटे). 
जवळचे रेल्वे स्टेशन :- माणगाव 29.1 किमी (45 मिनिटे ) 

विशेष अन्नपदार्थ वैशिष्ट्य आणि हॉटेल     
हे मुंबई गोवा हायवेला जोडलेले असल्यामुळे इथे अनेक प्रकारचे पदार्थ मिळतात  , महाराष्ट्रीयन जेवण हे इथले वैशिष्ठ्य आहे. 

जवळील राहण्याच्या व्यवस्था आणि हॉटेल/हॉस्पिटल/पोस्ट ऑफिस/पोलिस स्टेशन     
अनेक हॉटेल्स आणि उपहारगृह महाडजवळ उपलब्ध आहेत. 
महाडच्या परिसरात हॉस्पिटल्स आहेत.  
जवळचे पोलिस स्टेशन 1.1 किमी वर आहे. 
पोस्ट ऑफिस 300 मीटर्स वर आहे. 

जवळच्या एमटीडीसी रिसॉर्टचा तपशील     
एमटीडीसी रिसॉर्ट अलिबाग येथे आहे. 
  
पर्यटन मार्गदर्शक माहिती 
    
भेट देण्याचे नियम आणि वेळ 
भेट देण्यासाठी उत्तम महिना 

या तळ्याला  भेट देण्याचा योग्य कालावधी नोव्हेंबर ते मार्च आहे कारण इथे हिवाळा तीव्र नसतो. हिवाळ्यात वातावरण सुखद असते आणि ट्रॅकिंग आणि रोपवे च आनंद घेता येतो. रायगडावर उन्हाळा तीव्र असतो त्यामुळे तो कालावधी टाळावा. 

या भागात बोलली जाणारी भाषा     
इंग्रजी, हिन्दी, मराठी.  
 


Tour Package

Hotel Image
Blue Diamond Short Break Bustling Metropolis

2N 1Day

Book by:

MTDC Blue Diamond

Where to Stay

No Hotels available!


Tourist Guides

No info available