• A-AA+
  • NotificationWeb

    Title should not be more than 100 characters.


    0

WeatherBannerWeb

Asset Publisher

डहाणू

डहाणू हे महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात वसलेले एक किनारी शहर आहे. हे ठिकाण त्याच्या लांब किनारपट्टीसाठी ओळखले जाते. मुंबईतील पर्यटकांसाठी एक लोकप्रिय आणि जवळचे ठिकाण आहे.

जिल्हा/विभाग जिल्हा

पालघर जिल्हा, महाराष्ट्र, भारत

ऐतिहासिक माहिती

हा किनारा बहुतेक पर्यटकांना माहित नसल्यामुळे, हे ठिकाण खुप सुंदर व स्वच्छ आहे. सुट्टीच्या खेरीज आठवड्याच्या इतर दिवसांमध्ये फार कमी पर्यटक डहाणूला भेट देतात. व्यस्त वेळापत्रकातून निर्मळ शांततेसाठी डहाणू हे सर्वोत्तम ठिकाण आहे. मुंबई जवळ असलेल्या ठिकाणांपैकी विश्रांतीसाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे.

भौगोलिक माहिती

डहाणू हे निळ्या अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरील डहाणू खाडीच्या उत्तरेस महाराष्ट्राच्या कोकण भागातील किनारपट्टीचे ठिकाण आहे. हे मुंबईच्या उत्तरेस १४३ किलोमीटर आणि दमणच्या दक्षिणेस १२० किमी अंतरावर आहे.

हवामान

या प्रदेशातील मुख्य ऋतू म्हणजे पावसाळा. कोकण किनारपट्टीत मुख्यतः जास्त पाऊस (सुमारे २५०० मिमी ते ४५०० मिमी) अनुभवायला मिळतो आणि हवामान दमट आणि उबदार असते. पावसाळ्यात तापमान ३० अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.

उन्हाळा गरम आणि दमट असतो आणि तापमान ४० अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.

इथे हिवाळ्यात तुलनेने सौम्य हवामान (सुमारे २८ अंश सेल्सिअस) असते आणि हवामान थंड आणि कोरडे असते.

करण्यासारख्या गोष्टी 

समुद्रकिनाऱ्याची शांतता त्याच्या सौंदर्यात अधिक भर घालते. सूर्यास्ताच्या वेळी काळ्या आणि पांढऱ्या वाळूवर चालणे पर्यटकांना एक सुंदर अनुभव देते. समुद्रकिनारी नुसतेच बसून ही समुद्राचे सौंदर्य न्याहाळता येते. पोहणे, सूर्यस्नान करणे, उंटस्वारी, घोडागाडी चालवणे, मोटरस्वारी इत्यादी गोष्टी डहाणूच्या किनाऱ्यावर उपलब्ध आहेत.

जवळची पर्यटनस्थळे

डहाणूसह खालील पर्यटन स्थळांना भेट देण्याची योजना आपण करू शकता

  • बोर्डी समुद्रकिनारा: डहाणू समुद्र किनाऱ्याच्या उत्तरेस १४.७ किलोमीटर अंतरावर पालघरमधील एक शांत आणि स्वच्छ समुद्रकिनारा. बेटावर आणि त्याच्या आसपास बरेच आकर्षण आणि मनोरंजन आहे. शेती आणि आसपासच्या परिसरासाठी प्रसिध्द आहे ज्यात अनेक मंदिरे आणि लेण्या आहेत, तुम्हाला शांततामय वेळ घालवायचा असेल तर हे ठिकाण उत्तम!
  • डहाणू किल्ला: डहाणू किनाऱ्याच्या दक्षिणेस २.१ किमी अंतरावर असलेला हा किल्ला १६ व्या शतकात पोर्तुगीजांनी बांधला होता आणि त्याचा उपयोग छत्रपती शिवाजी महाराजांनीही केला होता.
  • महालक्ष्मी मंदिर: डहाणूच्या पूर्वेला ५.6 किमी अंतरावर, महालक्ष्मी आदिवासींची `कुलदेवी` आहे, त्यामुळे सणाच्या काळात आदिवासी त्यांचे पारंपारिक नृत्य “तारपा” च्या तालावर फेर धरतात. दरवर्षी हनुमान जयंतीपासून १५ दिवस महालक्ष्मी यात्रा आयोजित केली जाते.
  • आगर किनारा: डहाणू समुद्र किनाऱ्याच्या उत्तरेस १.१ किलोमीटर अंतरावर, स्वच्छ आणि शांत समुद्रकिनारा.
  • बहरोट लेणी: डहाणू समुद्रकिनाऱ्याच्या ईशान्येस ३०.१ किमी अंतरावर आहेत. इराणचा शहा अताश बेहरामसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांच्या शौर्याला आठवणींना या गुहा जपून ठेवतात. हि लेणी रमणीय आणि आकर्षक आहेत.
  • अस्वली धरण: डहाणूपासून २१.८ किलोमीटर अंतरावर असलेले हे धरण त्याच्या नयनरम्य परिसरासाठी प्रसिद्ध आहे. पावसाळ्याच्या काळात अनेक लोक या निसर्गरम्य सौंदर्याचे दर्शन घेण्यासाठी भेट देतात.

कलमांडवी धबधबा: आकर्षक कलमांडवी धबधबा डहाणू समुद्र किनाऱ्यापासून सुमारे ७७.३ किमी अंतरावर आहे. हा धबधबा १०० मीटर खोल आहे. धबधब्याचा खडकाळ परिसर ट्रेकिंग, रॉक क्लाइंबिंग आणि रॅपेलिंग सारख्या साहसी खेळांसाठी योग्य ठिकाण आहे.

रेल्वेने, विमानाने आणि रस्त्याने (ट्रेन, विमान, बस) तसेच ठराविक वेळेत पर्यटन स्थळावर कसे पोहोचावे

डहाणूला रस्त्याने आणि रेल्वेने जाता येते. हे राष्ट्रीय महामार्ग ४८ (NH 48), जव्हार-डहाणू महामार्गाशी जोडलेले आहे. हे मुंबईपासून १४३ किलोमीटर अंतरावर आहे, या ठिकाणी जाण्यासाठी कार भाड्याने घेता येऊ शकते. 

जवळचे विमानतळ: छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ मुंबई १३० किमी.

जवळचे रेल्वे स्टेशन: डहाणू रोड ३.६ किमी.

खाद्य वैशिष्ट्य आणि हॉटेल्स

डहाणू महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात असल्याने मासे (सी-फुड) हे येथील वैशिष्ट्य आहे. शनिवार व रविवार दरम्यान सर्वाधिक भेट दिलेल्या पर्यटन स्थळांपैकी डहाणू एक आहे आणि मुंबईशी जोडलेले असल्याने येथील रेस्टॉरंट्स विविध प्रकारच्या पाककृती उबलब्ध करून देतात.

जवळच्या निवास सुविधा आणि हॉटेल/ हॉस्पिटल/ पोस्ट ऑफिस/पोलीस स्टेशन

  • डहाणूमध्ये खुप हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स उपलब्ध आहेत. घरगुती मुक्काम (होम-स्टे) पर्याय देखील उपलब्ध आहेत.
  • डहाणूमध्ये बरीच रुग्णालये आहेत.
  • पोस्ट ऑफिस समुद्र किनाऱ्यापासून १.४ किमी अंतरावर आहे.
  • डहाणू समुद्रकिनाऱ्या लगतच कोस्टल पोलीस स्टेशन आहे.

जवळपासचे एमटीडीसी रिसॉर्ट

सर्वात जवळचे एमटीडीसी (MTDC) सलग्न  रिसॉर्ट केळवा बीचवर आहे.

पर्यटनासाठीचे नियम आणि वेळ, पर्यटनासाठी योग्य काळ

  • हे ठिकाण पर्यटनासाठी वर्षभर उपलब्ध आहे. या ठिकाणास भेट देण्याची उत्तम वेळ ऑक्टोबर ते मार्च पर्यंत आहे.
  • पाऊस जून ते ऑक्टोबर पर्यंत असतो आणि उन्हाळा गरम आणि दमट असतो.
  • हिवाळा इतर किनारपट्ट्यांच्या तुलनेत जास्त थंड असतो.
  • पर्यटकांनी समुद्रात प्रवेश करण्यापूर्वी भरती आणि ओहोटीच्या वेळ तपासून मगच समुद्रात जावे.
  • पावसाळ्यात समुद्राला येणारी भरती धोकादायक असू शकते म्हणून याकाळात समुद्रात जाणे टाळले पाहिजे.

या ठिकाणी बोलल्या जाणाऱ्या भाषा

मराठी, हिंदी, इंग्रजी