• स्क्रीन रीडर प्रवेश
  • A-AA+
  • NotificationWeb

    Title should not be more than 100 characters.


    0

Asset Publisher

देवकुंड धबधबा

भारतातील महाराष्ट्र राज्यातील रावेत येथे भिरा जवळ देवकुंड धबधबा आहे.  हा धबधब्याचा प्रकार आहे ज्यात खाली खडकाळ पृष्ठभागावर मोठ्या प्रमाणात पाणी साचते. लहान सहलीसाठी हे लोकप्रिय ठिकाण आहे. काही लोक या जागेला देवांचे आंघोळ करण्याचे ठिकाण मानतात. 

 जिल्हा/प्रदेश    
रायगड जिल्हा, महाराष्ट्र, भारत.  

 इतिहास     
असे मानले जाते की देवकुंड हा तीन धबधब्यांचा संगम आहे आणि असे म्हंटले जाते की कुंडलिका नदीचा उगम या ठिकाणी झाला आहे. पावसाळ्यात सर्वच धबधबे उत्तम असतात. पावसाळ्यात हे दृश्य उत्तम दिसते कारण , धबधब्या जवळची सुंदर हिरवळ याच काळात दिसू शकते. 

भूगोल     
देवकुंड धबधबा भारतात भिरा, रोहा, रायगड येथे कुंडलिका नदीवर आहे. देवकुंड धबधब्याची ऊंची २७०० फुट आहे. हा सह्याद्रीच्या पर्वतरंगांनी वेढलेला आहे आणि भिराच्या दक्षिणेला आणि मुळाशी धरणाच्या पश्चिमेला आहे. याच्या पुरवेल आपुणे आहे, उत्तरेला लोणावळा आहे, पश्चिमेला कोलाड आणि दक्षिणेला महाड आहे. 

वातावरण/हवामान    
या ठिकाणी हवामान उष्ण आणि दमट असून भरपुर पाऊस पडतो, कोकण पट्ट्यात २५०० मिमी ते ४५०० मिमी पर्यन्त पाऊस पडतो. या हंगामात तापमान ३० अंश सेल्सियस पर्यन्त पोचते. 
उन्हाळे उष्ण आणि दमट असतात आणि तापमान ४० अंश सेल्सियस पर्यन्त पोचते. 
हिवाळ्यात तुलनेने सौम्य हवामान असते ( सुमारे २८ अंश सेल्सियस) आणि वातावरण थंड आणि कोरडे राहते. 

 काय काय करू शकता     
घनगड किल्ला, देवकुंड धबधबा, भिरा धरण यासारख्या मनोरंजक ठिकाणांना पर्यटक भेट देऊ शकतात. पर्यटक भिरा जलाशयजवळ कॅम्प करू शकतात. 
भिरा- देवकुंड ट्रेक – देवकुंड धबधब्यापर्यंत पोचण्याचा सर्वात लोकप्रिय आणि शक्यतो एकमेव मार्ग म्हणजे भिरा गावापासून ४.५ किमी चा ट्रेक. या ठिकाणी ट्रेकिंग आणि फोटोग्राफिसाठी योग्य जागा आहेत. 

जवळची पर्यटन स्थळे     
●कर्नाळा किल्ला आणि अभयारण्य :- कर्नाळा किल्ला ( याला फिनेल हिल देखील म्हणले जाते) हा रायगड जिल्ह्यातील एक डोंगरी किल्ला आहे, महाराष्ट्रातील पनवेल शहरा पासून सुमारे १० किमी अंतरावर आहे. सध्या हे कर्नाळा पक्षी अभयारण्यात एक संरक्षित ठिकाण आहे. या किल्ल्याची ऊंची ४३९ मी (१४४० फुट)  आहे. हा किल्ला हायकिंग आणि पर्यटनासाठी लोकप्रिय आहे. देवकुंड धबधबा आणि कर्नाळा किल्ल्यातील अंतर २ तास १९ मिनिटे (९६.३१ किमी) आहे.  
●रायगड किल्ला :- रायगड किल्ला भारतातील महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील महाड येथे एका डोंगरावर आहे. हा दक्खन पठारावरील सर्वात कठीण किल्ल्यांपैकी एक आहे. रायगड रोपवे एक हवाई ट्रामवे, ४०० मीटर उंचीपर्यंत आणि ७५० मीटर लांबी पर्यन्त पोचते आणि पर्यटक फक्त चार मिनिटात जमिनीवरून किल्ल्यावर पोचू शकतो. 
●नागाव समुद्रकिनारा :- नागाव हे भारतात महाराष्ट्रात उत्तर कोकण भगत अरबी समुद्राच्या किनार्‍यावरील एक शहर आहे जे त्याच्या समुद्रकिनर्‍यांसाठी लोकप्रिय आहे. हे अलिबाग पासून ९ किमी आणि मुबाई पासून ११४ किमी अंतरावर आहे. नागाव समुद्रकिनारा प्रामुख्याने स्वच्छता आणि जलक्रीडा यामुळे प्रसिद्ध आहे. 
●काशीद समुद्रकिनारा:- कशिद हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोंकण भागतील मुरुड तालुक्यातील अरबी समुद्राच्या किनार्‍यालागत एक गाव आहे जे त्याच्या स्वच्छ समुद्रकींनार्‍यांसाठी लोकप्रिय आहे. इथे एक सुंदर आणि प्राचीन समुद्र किनारा आहे जो शांतता आणि निसर्गरम्य सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे.  


या पर्यटन स्थळावर रेल्वे, हवाई, रस्ता ( ट्रेन, विमान, बस) मार्गे कसे जायचे, अंतर आणि लागणार्‍या वेळासह     देवकुंड धबधबा हा रस्त्याला जोडलेला आहे, तो एनएच ६६ या मुंबई गोवा महामार्गाशी जोडलेला आहे, वाकणमधून देवकुंडला जाता येते, पुण्यहुन  ताम्हीणी घाटातून  हे १०४ किमी (३ तास ३५ मिनिटे) अंतरावर आहे . 
जवळचे विमानतळ :- पुणे विमानतळ ११२ किमी ( ३ तास ५0 मिनिटे )
जवळचे रेल्वे स्टेशन :- कोलद २८.७ किमी ( ५0 मिनिटे ) 


विशेष अन्नपदार्थ वैशिष्ट्य आणि हॉटेल     
येथे फारशी उपहारगृहे उपलब्ध नाहीत. त्यामुळे पर्यटकांनी स्वतचे अन्न स्व:sओबात आणावे . काही हॉटेल्स परिसरात आहेत जी आगाऊ ऑर्डर दिल्यावर जेवण देतात. 

जवळील राहण्याच्या व्यवस्था आणि हॉटेल/हॉस्पिटल/पोस्ट ऑफिस/पोलिस स्टेशन     
हॉटेल्स, कॉटेज, होमस्टे, आणि नदीकाठी कॅम्प लावणे अशी निवासी व्यवस्था उपलब्ध आहे . 
कोलाडच्या जवळपास असंख्य हॉस्पिटल्स आहेत. 
जवळचे पोस्ट ऑफिस १ किमी अंतरावर आहे . 
जवळचे पोलिस सटीओण १.४ किमी अंतरावर आहे 

 जवळच्या एमटीडीसी रिसॉर्टचा तपशील     
 कारला येथे एमटीडीसी चे रिसॉर्ट आहे जे देवकुंड पासून ९0 किमी वर आहे.
       
पर्यटन मार्गदर्शक माहिती 
    
भेट देण्यासाठी उत्तम महिना 
सप्टेंबर संपताना आणि ऑक्टोबर ते एप्रिल हा देवकुंड धबधब्याला भेट देण्यासाठी उत्तम कालावधी आहे . कारण हे महीने पावसाळयानंतर लगेच आहेत , या काळात वातावरण सुखद असतं . पावसाळ्यात डोंगराच्या नैसर्गिक परिस्थितीमुळे पाण्याची पातळी अचानक वाढत असल्याने, धबधबा सुरक्षित नसतो. काही अपघात आधी घडले आहेत. त्यामुळे जेव्हा अति पाऊस असतो तेव्हा पर्यटकांना सल्ला आहे कि त्यानि धबधब्यात जाऊ नये. 

या भागात बोलली जाणारी भाषा     
इंग्रजी, हिन्दी, मराठी.