• A-AA+
  • NotificationWeb

    Title should not be more than 100 characters.


    0

WeatherBannerWeb

Asset Publisher

गणपतीपुळे मंदिर

गणपतीपुळे हे महाराष्ट्राच्या कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील कोकणच्या पश्चिम किनाऱ्यावर प्रसिद्ध गणेश मंदिर आहे.
जिल्हा/विभाग

रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र, भारत.

ऐतिहासिक माहिती    
गणपतीपुळे हे एक छोटेसे गाव आहे जे गणेशाच्या प्रसिद्ध मंदिरासाठी ओळखले जाते. सुमारे ४०० वर्षांपूर्वी खडकांमधून वाहणाऱ्या एका छोट्या ओढ्याजवळ एक लहान मंदिर बांधले गेले. मंदिराची सध्याची रचना अलीकडच्या काळातली आहे आणि परिसरात जुन्या मंदिराचे कोणतेही ठसे नाहीत. गणेशाची मूर्ती 'स्वयंभू' (स्वयं-उद्भवलेली) आहे. असा विश्वास आहे की शिवाजी महाराजांच्या अधिकाऱ्यांनी मंदिराला विविध अनुदान दिले होते. अगदी पेशवे नानासाहेब आणि पेशवीन रमाबाईंनीही मंदिराच्या बांधकामासाठी अनुदान दिले होते. गणपतीपुळे मंदिर हे कोकणातील सर्वात पूजले गेलेले मंदिर आहे.
लांब समुद्रकिनाऱ्यासाठी हे गाव ओळखले जाते. मंदिर समुद्रकिनारी आहे. मंदिराच्या मागे, एक लहान टेकडी आहे जी मुख्य देवतेशी (गणेशाशी) संबंधित आहे. इथे भक्त मंदिरासह डोंगरालाही प्रदक्षिणा घालणे पसंत करतात.

भौगोलिक माहिती    
गणपतीपुळे मंदिर समुद्र किनाऱ्यावर बांधले गेले असल्यामुळे त्यामध्ये वेगळेपण आहे. मंदिराच्या आध्यात्मिकतेसह समुद्रावर आरामदायी क्षण अनुभवता येतो. गणपतीपुळे मंदिराकडे जाण्याचा मार्ग पश्चिम घाटातून जातो. त्यामुळे मंदिराच्या दिशेने जाताना पश्चिम घाटातील हिरव्यागार सौंदर्याचा आनंद लुटता येतो.

हवामान    
या भागातील प्रमुख ऋतू म्हणजे पाऊस, कोकण किनार पट्ट्यात जास्त पाऊस (सुमारे २५०० मिमी ते ४५०० मिमी) अनुभवायला मिळतो आणि हवामान दमट आणि उबदार असते. पावसाळ्यात तापमान ३० अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.
उन्हाळा फार गरम आणि दमट असतो आणि तापमान ४० अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.
कोकणात हिवाळ्यात तुलनेने सौम्य हवामान (सुमारे २८ अंश सेल्सिअस) असते आणि हवामान थंड आणि कोरडे असते.

करण्यासारख्या गोष्टी      
गणपतीपुळे येथील समुद्रकिनारा पाहण्यासारखा आहे. एमटीडीसी पर्यटकांसाठी गणपतीपुळ्यात अनेक वॉटर स्पोर्ट्स आयोजित करते. 'कोकणच्या संस्कृती'वर आधारित गावात एक खासगी संग्रहालय आहे.

जवळची पर्यटनस्थळे     
•    कवी केशवसूत स्मारक (मराठीतील एका प्रख्यात कवीचे जन्मस्थान) गणपतीपुळ्यातील सर्वात जवळचे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. स्मारक गणपतीपुळे मंदिर परिसर पासून सुमारे ३ किमी अंतरावर आहे.
•    जयगड किल्ला (१ किमी) शास्त्री नदीवर स्थित सर्वात जवळचा किल्ला आहे.
•    शिव मंदिर (२३ किमी) आणि जयगडजवळ जय विनायक मंदिर (१५ किमी).
•    मालगुंडमधील ओंकारेश्वर मंदिर हे गणपतीपुळ्यातील प्रसिद्ध मंदिर आहे. हे गणपतीपुळेपासून सुमारे २८ किमी दूर आहे.

रेल्वेने, विमानाने आणि रस्त्याने (ट्रेन, विमान, बस) तसेच ठराविक वेळेत पर्यटन स्थळावर कसे पोहोचावे     
•    रस्त्याने - मुंबई ३७५ किलोमीटर आहे. पुणे ३३१ किमी आहे, आणि रत्नागिरी हे सर्वात जवळचे शहर आहे जे ४५ किमी दूर आहे. अनेक खाजगी आणि सरकारी वाहतूक संचालित बसेस थेट गणपतीपुळ्यासाठी उपलब्ध आहेत.
•    रेल्वेने - जवळचे रेल्वे स्टेशन रत्नागिरी रेल्वे स्टेशन आहे. (३० किमी)
•    हवाई मार्गाने - मुंबई विमानतळ हे सर्वात जवळचे विमानतळ आहे. (३३० किमी)

खाद्य वैशिष्ट्य आणि हॉटेल्स    
मोदक, गणपतीचा आवडता पदार्थ आहे. किनारपट्टीवर असल्याने, गणपतीपुळे येथे विविध प्रकारचे सी-फुड उपलब्ध आहे. सोल-कढी नावाचे कोकम पेय देखील प्रसिद्ध आहे. आंबा, काजू, जांभळ, नारळ इत्यादी फळांच्या अनेक प्रकारांचा आस्वाद घेता येतो. पारंपारिक महाराष्ट्रीय पदार्थ देखील उपलब्ध आहेत, ज्यांचे एक अद्वितीय वैशिष्ट्य आहे जे चाखून पहिलेच पाहिजे.

जवळच्या निवास सुविधा आणि हॉटेल/ हॉस्पिटल/ पोस्ट ऑफिस/पोलीस स्टेशन    
MTDC हॉटेल (बीच आणि सी-साईड रिसॉर्ट) आणि कॉन्फरन्स सेंटर हे जवळचे हॉटेल आहे. हॉटेल जेवण आणि निवासाची सोय करते.

पर्यटनासाठीचे नियम आणि वेळ, पर्यटनासाठी योग्य काळ      
गणपतीपुळे मंदिर सकाळी ५.०० वाजता उघडते आणि रात्री ९.०० वाजता बंद होते. प्रार्थना किंवा आरती दिवसातून तीन वेळा सकाळी ५.०० दुपारी १२.०० आणि संध्याकाळी ७.०० वाजता केली जाते.
गणपतीपुळेला भेट देण्याचा सर्वोत्तम महिना म्हणजे ऑक्टोबर ते मार्च.

या ठिकाणी बोलल्या जाणाऱ्या भाषा     
इंग्रजी, हिंदी, मराठी.