• स्क्रीन रीडर प्रवेश
  • A-AA+
  • NotificationWeb

    Title should not be more than 100 characters.


    0

Asset Publisher

गणेशपुरी उन्हाळे (गरम पाण्याचा झरा

पर्यटन स्थळे/ जागा यांची नावे आणि स्थळांचे थोडक्यात ३-४ ओळींमध्ये वर्णन 
भारतातील महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात गणेशपुरी उन्हाळे (गरम पाण्याचा झरा ) आहे. ही जागा नैसर्गिक गरम पाण्याच्या झर्‍याकरिता प्रसिद्ध आहे. या झर्‍याभोवती कुंड बांधण्यात आली आणि हिंदू धर्मीयांमध्ये याला खूप महत्व आहे.  हे पानी त्वचा रोग बारे करते असे मानले जाते आणि पर्यटक याकरीताच यात आंघोळ करतात. 

जिल्हा/प्रदेश    
भिवंडी तालुका , ठाणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत.  

इतिहास     
1936मध्ये वाज्रेश्वरीहुन येथे आलेल्या स्वामी नित्यानंद यांनी या गरम पाण्याचे झरे विकसित केले. हे झरे आणि त्यांची वैशिष्ठ्ये शोधल्यानंतर त्यांनी त्यांचा विकास केला आणि गावकर्‍यांमध्ये त्याबद्दल आणि त्याच्या पवित्रतेबद्दल जागरूकता पसरवली. निसर्गाचा हा चमत्कार अनुभवण्यासाठी राज्याच्या विविध भागतून लोक येतात. 

भूगोल     
हा गरम पाण्याचा झरा तानसा नदीच्या पात्रा जवळ आहे. पाण्याचे तापमान 52 अंश सेल्सियस आहे. काळ्या ज्वालामुखीच्या खडकातून वितळलेल्या गोलाकार छिद्रातून असे झरे फुटतात, गणेशपुरी मध्ये गरम पाण्याचे झरे निर्माण होण्याचे हे कारण आहे. 

वातावरण/हवामान     
या ठिकाणी हवामान उष्ण आणि दमट असून भरपुर पाऊस पडतो, कोकण पट्ट्यात 2500 मिमी ते 4500 मिमी पर्यन्त पाऊस पडतो. या हंगामात तापमान 30 अंश सेल्सियस पर्यन्त पोचते. 
उन्हाळे उष्ण आणि दमट असतात आणि तापमान 40 अंश सेल्सियस पर्यन्त पोचते. 
हिवाळ्यात तुलनेने सौम्य हवामान असते ( सुमारे 28 अंश सेल्सियस) आणि वातावरण थंड आणि कोरडे राहते. 

काय काय करू शकता      
वसंत ऋतु मध्ये गरम पाण्यात आंघोळ करता येते. स्थानिक लोकांच्या म्हणण्या नुसार गरम पाण्याच्या झर्‍यामध्ये अनेक रोग बरे करण्याचे सामर्थ्य असल्याचे म्हटले जाते. विशेषत: पावसाळ्यात एक किंवा दोन दिवसांसाठी भेट देण्यासारखे ठिकाण आहे. याठिकाणी अनेक आश्रम आणि मंदिरे देखील आहेत. धार्मिक व्यक्तिला भेट देणे योग्य आहे. 

जवळची पर्यटन स्थळे      
❖वाज्रेश्वरी मंदिर : गणशपुरी गरम पाण्याचे झरे आणि वाज्रेश्वरी यातील अंतर 3.1 किमी आहे. श्री वज्रेश्वरी योगिनी देवी मंदिर हे हे हिंदू मंदिर देवी वाज्रेश्वरीला समर्पित आहे. या मंदिराने लगतच्या भागातील अनेक पर्यटकांना आकर्षित केले आहे.   
❖रिसॉर्ट आणि अम्युजमेंट पार्क : नजीकच्या परिसरात अनेक रिसॉर्ट आणि अम्युजमेंट पार्क आहेत जी शनिवार व रविवार च्या सुट्टीसाठी चांगली आहे. 
या पर्यटन स्थळावर रेल्वे, हवाई, रस्ता ( ट्रेन, विमान, बस) मार्गे कसे जायचे, अंतर आणि लागणार्‍या वेळासह     रस्त्याने : गणेशपुरी गरम पाण्याचा झरे हे रस्त्याला जोडलेले आहेत. मुंबई 71.3 किमी ( 1 तास 42 मिनिटे )पश्चिम द्रुतगती मार्गाने , पुणे 193.7 किमी ( 4 तास 4 मिनिटे) मुंबई पुणे महामार्गाने  राज्य परिवहन मंडळ, खाजगी गाड्या, आणि लक्झरी बस हे सर्व या शहरांपासून उपलब्ध आहेत. 

रेल्वेने : जवळचे रेल्वे स्टेशन हे 16.92 किमी वरचे वैतरणा रेल्वे स्टेशन आहे आणि अजून काही जसे ठाणे,कल्याण मध्य रेल्वेवरचे आणि वसई रोड, विरार पश्चिम रेल्वे वरची स्थानके जवळ आहे. 

हवाई मार्गाने : जवळचे विमानतळ 60 किमी वरचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई  

विशेष अन्नपदार्थ वैशिष्ट्य आणि हॉटेल     
गणेशपुरी महामार्गाने चांगल्यापैकी जोडलेला आहे आणि अनेक उपहारगृहा आणि ढाबे अनेकविध खाद्यपदार्थ उपलब्ध करतात ज्यात आगरी,कोळी, महाराष्ट्रियन पदार्थ आहेत. 

जवळील राहण्याच्या व्यवस्था आणि हॉटेल/हॉस्पिटल/पोस्ट ऑफिस/पोलिस स्टेशन     
अनेक हॉटेल आणि उपहारगृहे गणेशपुरी येथे उपलब्ध आहेत. 
जवळचे हॉस्पिटल 21 किमी वर आहे. 
जवळचे पोस्ट ऑफिस 2.6 किमी वर आहे. 
जवळचे पोलिस स्टेशन 180 मीटर्स वर उपलब्ध आहे. 
जवळच्या एमटीडीसी रिसॉर्टचा तपशील     
  
पर्यटन मार्गदर्शक माहिती 
    
भेट देण्याचे नियम आणि वेळ 
भेट देण्यासाठी उत्तम महिना 

    
गणेशपुरी गरम पाण्याच्या झर्‍यांना भेट देण्यासाठी उत्तम कालावधी म्हणजे पावसाळा आणि हिवाळा हंगाम म्हणजेच जुन ते फेब्रुवारी 


या भागात बोलली जाणारी भाषा     
.इंग्रजी, हिन्दी, मराठी.