गंगापूर बोट क्लब - DOT-Maharashtra Tourism
Breadcrumb
Asset Publisher
गंगापूर बोट क्लब
नाशिक शहरा लगत बाहेर गंगापूर धरण आहे. तिथे गंगापूर बोट क्लब आहे. एमटीडीसी कडून सादर बोट क्लब चालविला जातो आणि त्याची व्यवस्था पहिली जाते. यात सर्व प्रकारच्या जलक्रीडा उपलब्ध आहेत.
जिल्हा/प्रांत
नाशिक जिल्हा, महाराष्ट्र, भारत
इतिहास
गंगापूर धरण हे मातीचे आशियातील सगळ्यात लांब धरण आहे. १९६५ मध्ये हे धरण बांधले गेले. यात दगडाऐवजी मातीचे थर घट्ट बसवले आहेत. पाणी पुरवठा हेच या धरणाचे उदिष्ट होते. २००९ आणि २०१४ मध्ये येथील बोट क्लबची कल्पना मांडली गेली शेवटी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २२ डिसेंबर २०२० मध्ये नौकाविहार चालू झाला.
भूगोल
गंगापूर धरण गोदावरी नदीवर बांधले आहे. हे धरण टेकड्या आणि इतर धारणांनी वेढलेले आहे. त्याच्या नजीक गौतमी आणि कश्यपी नदींवरील धरणे आहेत. सदर धरण नाशिक शहरांच्या वायव्येस १६ किमी वर आहे
हवामान
या परिसराचे वार्षिक तापमान साधारण २४. १ अंश से. असते.
या प्रदेशात थंडी कडक्याची असते. या काळात तापमान १२ अंश से. पर्यन्त उतरते.
उन्हाळ्यात ऊन प्रखर असते. या प्रदेशात थंडीपेक्षा उन्हाळ्यातच पाऊस पडतो. उन्हाळ्यात तापमान ३० अंश से. पर्यन्त जाते.
वार्षिक पर्जन्यमान सरासरी ११३४ मिमी असते.
करण्याजोग्या गोष्टी
मुले, तरुण, वृद्ध, अशा सर्व वयोगटातील लोकांसाठी उपलब्ध करण्यासाठी बोट क्लब कडे खूप काही आहे. जलक्रिडेचे अनेक प्रकार तिथे आहेत. जसे की बनाना ट्यूब, बंपर, जेट स्किंईंग, ड्रॅगन बोटिंग आणि कायाकिंग.
यात आणखी म्हणजे स्पीड बोट मधून तलाव ओलांडणे, तसेच पार्टीसाठी पडावही उपलब्ध आहेत.
आणखी सांगायचे म्हणजे बोट क्लब मध्ये जवळच्या कॅफे मधील नाश्ता करत आणि सरबत चाखत सूर्यास्ताची मजाही घेता येते.
नजीकची पर्यटन स्थळे
गंगापूर बोटकल्ब बरोबरच खलील पर्यटन स्थळे पाहण्याचे नियोजनही करता येते.:
● सोमेश्वर: हे गंगापूर बोट क्लब पासून 8 किमी अंतरावर आहे. हे एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. गोदावरीच्या तीरावरील सुंदर वनराईत सोमेश्वर शिवमंदिर आहे.
● बालाजी मंदिर आणि धबधबा – हे धरणापासून ६ किमी अंतरावर आहे. हे सुंदर रचना असलेले बालाजी देवाचे मंदिर आहे. दिवाळीमध्ये हजारो पणत्यानी हे सुशोभित केले जाते. देवळाजवळच सोमेश्वर धबधबा आहे. पावसाळ्यात आणि नंतरही पाहावा असाच आहे.
● सुला वाईनयार्ड: भारताची वाईन राजधानी म्हणून नाशिक प्रसिद्ध आहे. येथे द्राक्ष आणि वाईनचे मोठ्याप्रमाणावर उत्पादन घेतले जाते. सुला वाईनयार्डचा दौरा मार्गदर्शकासह केला तर वाईनच्या उत्पादनाची प्रक्रिया पाहायला मिळते. येथे दरवर्षी जानेवारी मध्ये सुला महोत्सव आयोजित केला जातो. संगीतातील प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय बॅन्ड्स येथे वाजवले जातात. बोट क्लब पासून हे ८ किमी अंतरावर आहे.
● सोमा वाईनयार्ड्स: सुला वाईन्स प्रमाणेच सोमा वाईन्स हे एक वाईन बनवण्याचे केंद्र आहे. गंगापूर धारणापासून हे ५ किमी अंतरावर आहे. या जागी चांगली रेस्टौरेंट्स आणि दुकाने आहेत.
● त्र्यंबकेश्वर मंदिर: महाराष्ट्रात नाशिक पासून २८ किमी अंतरावर त्र्यंबकेश्वर मंदिर आहे. त्याच्या जवळ ब्रम्हगिरी नावाचा डोंगर आहे जिथे गोदावरी नदीचे उगमस्थान आहे. हे एक धार्मिक स्थान आहे. हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.
पर्यटन स्थळी कसे जावे, (रेल्वे, विमान, बस)
- अंतर आणि वेळ यासह प्रवासाच्या सर्व प्रकारच्या मार्गानी नाशिकला जाता येते.
- सडकेने: - नाशिक मध्ये रस्त्याचे चांगले जाळे आहे. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मुंबई पासून १६७ किमी (४ तास) अंतरावर आहे. पुण्याहून २१२ किमी (५ तास २० मिनिटे) अंतरावर आहे. नाशिकपासून बोटक्लब सुमारे १६ किमी वर आहे. तेथे खाजगी वाहनाने किंवा सिटी बसने जाता येते. सिटी बसची सोय थोडी विरळ असल्याने खाजगी वाहनाने जाणे योग्य असा सल्ला देण्यात येतो.
- हवाई मार्ग: ओझरचा विमानतळ हे येथील जवळचे विमानतळ आहे जे नाशिकपासून १५ किमी वर आहे. छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ मुंबई हे १६६ किमी (४ तास) दूर आहे.
- रेल्वे स्टेशन: नाशिक रोड हे जवळचे रेल्वे स्टेशन ८. ४ किमी (२० मिनिटे) दूर आहे.
खास खाद्य पदार्थ आणि हॉटेल
महाराष्ट्रियन खाद्य पदार्थांसाठी नाशिक प्रसिद्ध आहे. इथे सर्वत्र रस्त्याच्या कडेच्या टपरीतल्या मिसळपाव आणि वडापाव हे विशेष पदार्थ येथे सर्वत्र मिळतात. नाशिक चिवड्यासाठीही प्रसिद्ध आहे.
हॉटेल हॉस्पिटल, पोस्ट ऑफिस, पोलिस स्टेशन यांच्या सुविधा
- धरणाच्या परिसरात शेतघरे आणि रिसॉर्टस उपलब्ध आहेत.
- बोटकल्ब पासून ८ ते १० किमी अंतरावर हॉस्पिटल्स आहेत.
- बोट कलब पासून ३ किमी वर जवळचे पोस्ट ऑफिस आहे
- १० किमी अंतरावर आनंदवली येथे जवळचे पोलिस स्टेशन आहे.
एमटीडीसी चे जवळचे रिसॉर्ट
एमटीडीसी चे ग्रेप पार्क रिसॉर्ट धरणाच्या बोटक्लबच्या जवळ आहे.
भेट देण्याचे नियम आणि भेट देण्यास उत्तम महिना
सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यन्त बारा महीने नौकानयन करता येते. कायाकिंग साठी मात्र पोहता येणे आवश्यक आहे.
कोणाला सूर्यास्त पहायाचा असेल तर त्यासाठी संध्याकाळी ६ ते ७ मध्ये सर्व संरक्षक साधनांसह क्रुजची सोयही आहे. पर्यटक वर्षभर इथे येऊ शकतात. परंतु सप्टेंबर ते मार्च हा कालावधी अधिक चांगला आहे.
या भागात बोलल्या जाणार्या भाषा
इंग्रजी, हिन्दी, मराठी
Gallery
How to get there

By Road
नाशिक हे रस्त्यांचे चांगले जाळे पुरवते, ते मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मुंबईपासून 167 किमी (4 तास) अंतरावर आहे. पुण्यापासून 212 KM (5 तास 20 मि) अंतरावर आहे. नाशिकपासून बोट क्लब 16 किमी अंतरावर आहे. खाजगी वाहने किंवा सिटी बसने पोहोचता येते. बसेसची वारंवारता कमी असल्याने खाजगी वाहनांचा वापर करणे योग्य आहे.

By Rail
सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन नाशिक रोड येथे ८.४ किमी (२० मि) अंतरावर आहे.

By Air
सर्वात जवळचे विमानतळ ओझर विमानतळ आहे आणि ते नाशिक, छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ मुंबईपासून १५ किमी अंतरावर आहे, १६६ किमी (४ तास)
Near by Attractions
Gangapur Dam
Tour Package
Where to Stay
एमटीडीसीचे ग्रेप पार्क रिसॉर्ट
एमटीडीसीचे ग्रेप पार्क रिसॉर्ट धरणाच्या बाजूला बोट क्लबजवळ आहे
Visit UsTour Operators
MobileNo :
Mail ID :
Tourist Guides
No info available
Subscription
आमचा पत्ता
पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र
१५ मजला, नरिमन भवन,
नरिमन पॉइंट, मुंबई ४०००२१
connect.dot-mh@gov.in
०२२-६९१०७६००
द्रुत दुवे
QR कोड वापरून मोबाइल अॅप डाउनलोड करा

Android

iOS