• स्क्रीन रीडर प्रवेश
  • A-AA+
  • NotificationWeb

    Title should not be more than 100 characters.


    0

Asset Publisher

गंगापुर धरण

गंगापुर धरण हे भारतातील, महाराष्ट्रातील नाशिक मधील गोदावरी नदीवरील धरण आहे. हे महाराष्ट्रातील सर्वात जुन्या धरणांपैकी एक आहे जे नाशिक शहराला पाणीपुरवठा करते. संध्याकाळी इथे अनेक स्थलांतर करणारे पक्षी दिसतात. 

जिल्हा/प्रदेश    
नाशिक जिल्हा, महाराष्ट्र, भारत 

इतिहास     
गंगापुर तालुका आणि जिल्हा नाशिक जवळ गोदावरी नदीवर धरण बांधण्याचा प्रकल्प मुंबई सरकारने १९४९ साली मंजुर केला. धरणाची संचय क्षमता ५.५ टीएमसी आहे. हे धरण मातीचे आहे म्हणजेच मातीच्या थरांनी बांधलेले आहे. धरणाची ऊंची ३६.५९ मीटर आणि धरणाची लांबी ३९०२ मीटर आहे. 
धरणाच्या परिसरात पूर्व ऐतिहासिक दगडाची साधने सापडल्याची नोंद आहे. 

भूगोल     
डोंगरांनी वेढलेल्या गोदावरी नदीच्या पत्रावर गंगापुर धरण बांधलेले आहे आणि या परिसरातील इतर धरणे म्हणजे गौतमी आणि कश्यपी. हे धरण नाशिकच्या वायव्येला १६ किमी वर आहे. 

वातावरण/हवामान    
हवामान उष्ण आणि कोरडे असते कमाल तापमान ३२ अंश से. आणि किमान तापमान १४ अंश से. असते. या जागेचे सरासरी पर्जन्यमान १२००-१५०० मिमी इतके आहे. 

काय काय करू शकता      
●धरणाजवळ एक सुंदर आणि आकर्षक बाग आहे जिथे तुम्ही आपल्या कुटुंबं समवेत निवांत वेळ घालवू शकता, नदीच्या आनंदमयी, नयनरम्य दृश्याचा आनंद घेऊ शकता. 
●धरणात एक सुंदर बोटक्लब आहे आणि येथे जलक्रीडांची व्यवस्था एमटीडीसी करते. 
●धरण ही ग्रह तारे पाहण्याकरिता एक विलक्षण जागा आहे आणि इथे उंचा ठिकाणी उभे राहून कोणीही चंद्रोदय देखील पाहू शकतो. नयनरम्य वातावरण सहलीसाठी अनेक पर्यटक आणि स्थंनिकांना आकर्षित करते.  
●नाशिक बाजार हा खरेदीसाठी प्रसिद्ध आहे आणि खरेदी करणार्‍यांसाठी एक उत्तम ठिकाण आहे. हस्तकला, चांदीच्या वस्तु, स्मृति चिन्हांपासून, प्राचीन तांब्याच्या अवशेष इत्यादि आणि पितळीच्या मूर्ति आणि वस्तूंचे वैविध्य मिळू शकते. 

पर्यटन स्थळे/ जागा यांची नावे आणि स्थळांचे थोडक्यात ३-४ ओळींमध्ये वर्णन 
●पांडव लेणी : गंगापुर धारणापासून पांडव लेणी पर्यंतचे अंतर सुमारे १९ किमी आहे. पांडव  लेणे हे असे एक ठिकाण आहे जे महाराष्ट्रातील नाशिक मध्ये आहे. ही बौद्धा काळातील २४ लेण्यांची साखळी आहे. हे एक अतिशय अज्ञात सौंदर्या आहे ज्याला भेट दिली पाहिजे. 
●अंजणेरी : गंगापुर पासून अंजणेरीचे अंतर ३३.७ किमी आहे, सुमारे ४७ मिनिटांचा मार्ग. अंजणेरी हे नाशिक शहरा जवळील एक आवडते आकर्षण आहे. हे भगवान हनुमानाचे जन्मस्थान असल्याचे मानले जाते. अजणेरी डोंगरातला ट्रेक हा श्वास रोखणारा गावचा पॅनोरामा दाखवणारा आहे. या टीआरके मध्ये आपण सुंदर फुलांनी झाकलेली हिरवीगार जमीन पाहु  शकतो. हिवाळा आणि पावसाळा या ठिकाणी यायला उत्तम ऋतु आहेत.  
●मुक्तिधाम : गंगापुर धरणापासून २३.९ किमी अंतरावर आहे. मुक्तिधाम हे भारतातील महत्वाच्या हिंदू  तीर्थक्षेत्रांचे दर्शन घडवणारे एक अद्वितीय मंदिर आहे. मकराना , राजस्थान येथून शुद्ध संगमरवर आणून बांधलेले हे मंदिर नाशिक शहरांमधील प्रमुख आकर्षणांपैकी एक आहे. या अद्भुत मंदिराच्या आत तुम्हाला भगवद गीता या पवित्र ग्रंथातील सर्व १८ अध्याय दिसतील. जे बारा ज्योतीलिंगांच्या प्रतिकृतीसह भिंतीवर कोरलेले आहेत. 
●सुला वाईनयार्ड्स : द्राक्षे आणि वाईनचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन असल्यामुळे नाशिक ‘ भारताची वाइन राजधानी ‘ म्हणून प्रसिद्ध आहे. कोणी सुला द्राक्ष बागांना मार्गदर्शन दौरा करू शकतो जिथे वाईन उत्पादनाची प्रक्रिया पाहता येते. दरवर्षी जानेवारी दरम्यान, सुळा फेस्टचे आयोजन या ठिकाणी केले जाते जिथे आंतरराष्ट्रीय संगीत बॅंड या ठिकाणी सादरीकरण करतात.   


या पर्यटन स्थळावर रेल्वे, हवाई, रस्ता ( ट्रेन, विमान, बस) मार्गे कसे जायचे, अंतर आणि लागणार्‍या वेळासह     

गंगापुर धरण रस्त्याने जोडलेले आहे. राज्यपरिवाहन मंडळाच्या बस,खाजगी गाड्या आणि लक्झरी बस मुंबई १७६.२ किमी ( ३ तास ४२ मिनिटे), पुणे २२७.६ किमी ( ४ तास ४९ मिनिटे), औरंगाबाद २१२.७ किमी ( ४ तास १९ मिनिटे ) पासून नाशिक पर्यन्त उपलब्धा आहेत आणि नाशिकपासून गांगपूरला सिटी बस उपलब्ध आहेत. 
रेल्वे मार्ग : जवळचे रेल्वे स्टेशन २५४ किमी (४५ मिनिटे) वरचे नाशिक रोड रेल्वे स्टेशन  आहे. 
हवाई मार्ग : ओझार विमानतळ, नाशिक ३३.४ किमी ( ५० मिनिटे )


विशेष अन्नपदार्थ वैशिष्ट्य आणि हॉटेल   

नाशिक हे तिच्या स्ट्रीट फुड साठी प्रसिद्ध आहे. चिवडा आणि मिसळ हे नाशिक मधले सगळ्यात लोकप्रिय पदार्थ आहेत. इथे अनेक उपहारगृहे आणि रस्त्यावरील गाड्या आहेत जिथे वैविध्यपूर्ण खाद्य पदार्थ दिले जातात. 

जवळील राहण्याच्या व्यवस्था आणि हॉटेल/हॉस्पिटल/पोस्ट ऑफिस/पोलिस स्टेशन     

गणगपूर धरणाजवळ अनेक हॉटेल्स आणि रेसोर्ट्स उपलब्धआहेत. 
हॉस्पिटल्स अगदी जवळ आहेत. 


जवळचे पोस्ट ऑफिस धरणापासून ३ किमी अंतरावर आहे. 
जवळचे पोलिस स्टेशन १०.७ किमी वर आहे. 

जवळच्या एमटीडीसी रिसॉर्टचा तपशील     

एमटीडीसी रिसॉर्ट गंगापुर धरणाजवळ आहे. 
  
पर्यटन मार्गदर्शक माहिती 


भेट देण्याचे नियम आणि वेळ 
भेट देण्यासाठी उत्तम महिना
 
धरणाच्या इथे प्रवेश करण्यासाठी मेयरची परवानगी घ्यावी लागते. 
इथे येण्याचा उत्तम कालावधी हा पावसाळा ऋतु हा आहे 

या भागात बोलली जाणारी भाषा     
.इंग्रजी, हिन्दी, मराठी.