• स्क्रीन रीडर प्रवेश
  • A-AA+
  • NotificationWeb

    Title should not be more than 100 characters.


    0

Asset Publisher

गिरगाव चौपाटी

 गिरगाव चौपाटी ज्याला बॉम्बे चौपाटी म्हणूनही ओळखले जाते हा भारताच्या मुंबई शहरातील एक समुद्रकिनारा आहे. हा किनारा मुंबई शहराच्या समांतर आहे आणि किनाऱ्यासोबत समांतर असणाऱ्या आर्ट डेको इमारतींनी त्याला सजवलेले आहे. समुद्रकिनारा अंदाजे ५ किमी लांब आहे आणि त्याच्या शेजारीच मरीन ड्राइव्ह आहे जिथे गाडी चालवताना समुद्राच्या दृश्याचा आनंद घेता येतो. मरिन ड्राईव्हला क्वीन्स नेकलेस म्हणूनही ओळखले जाते कारण रात्रीच्या वेळी मरिन ड्राईव्हला उंचावरुन पाहिले असता रस्त्यावरील दिवे गळ्यातील मोत्यांच्या माळेसारखे दिसतात.

जिल्हा/विभाग        

मुंबई, महाराष्ट्र, भारत.

ऐतिहासिक माहिती 

हा समुद्रकिनारा गणेश विसर्जन समारंभासाठी लोकप्रिय आहे, हजारो लोक अरबी समुद्रात गणपतीच्या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी येतात. या ठिकाणी दरवर्षी नवरात्रीच्या १० व्या दिवशी 'राम लीला' चा खेळ होतो आणि रावणाचा प्रतीकात्मक पुतळा जाळला जातो.

भौगोलिक माहिती

गिरगाव, ज्याला गिरगाम असेही म्हणतात, त्याचे नाव संस्कृत शब्द गिरी आणि ग्राम, ज्याचा अर्थ अनुक्रमे डोंगर आणि गाव आहे. गिरगाव हे मलबार आणि कंबाला या जुळ्या डोंगरांवर वसलेले गाव आहे. गिरगाम चौपाटी, बँडस्टँड आणि खारेघाट कॉलनी पर्यंत हे डोंगर पसरलेले आहेत.

हवामान       

या प्रदेशातील मुख्य ऋतू म्हणजे पावसाळा. कोकण किनारपट्टीत मुख्यतः जास्त पाऊस (सुमारे २५०० मिमी ते ४५०० मिमी) अनुभवायला मिळतो आणि हवामान दमट आणि उबदार असते. पावसाळ्यात तापमान ३० अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.

उन्हाळा गरम आणि दमट असतो आणि तापमान ४० अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.

इथे हिवाळ्यात तुलनेने सौम्य हवामान (सुमारे २८ अंश सेल्सिअस) असते आणि हवामान थंड आणि कोरडे असते.

करण्यासारख्या गोष्टी        

समुद्रकिनार्यावर पर्यटकांसाठी अनेक करमणूकिच्या गोष्टी आहेत ज्यात फेरी व्हील, मेरी-गो-राउंड आणि मुलांसाठी बंदूक शूटिंग गॅलरी समाविष्ट आहेत. घोडा आणि उंट सवारी देखील आहे. अनेक पर्यटक चौपाटीवर त्यांच्या कामाच्या व्यस्त दिवसानंतर बसण्यासाठी आणि आराम करण्यासाठी जातात. वाऱ्याचा आनंद घेण्यासाठी आणि अरबी समुद्रात सूर्य मावळताना पाहण्यासाठी हे एक अद्भुत ठिकाण आहे.

जवळची पर्यटनस्थळे        

गिरगाव चौपाटीहून जुहू समुद्रकिनाऱ्यासह खालील पर्यटन स्थळांना भेट देण्याची योजना आपण करू शकता.

●        इस्कॉन मंदिर: याला हरे राम हरे कृष्ण मंदिर असेही म्हणतात. या सुंदर संगमरवरी संरचनेत प्रार्थना आणि उपदेशासाठी असंख्य हॉल आहेत.

●        मरीन ड्राइव्ह: ३ किमी लांबीचा हा समुद्रमुखी विहार नरिमन पॉइंटला आणि मलबार हिलला जोडतो. वाटेत गिरगाव चौपाटी येते. मरीन ड्राइव्ह अरबी समुद्राचे भव्य दृश्य प्रदान करते.

●        तारापोरवाला मत्स्यालय - तारापोरवाला मत्स्यालय भारतातील सर्वात जुने मासे मत्स्यालय आहे. मत्स्यालय गिरगाव चौपाटीपासून १.४ किमी दूर आहे. लांब काचेच्या पेट्यांमध्ये सागरी आणि गोड्या पाण्यातील माशांच्या ४०० पेक्षा जास्त प्रजाती इथे पहावयास मिळतात.

●        हँगिंग गार्डन्स - हँगिंग गार्डन हे गिरगावजवळ एक विस्तीर्ण हिरवागार बगीचा आहे. हा गिरगाव चौपाटीपासून सुमारे ४ किमी दूर आहे आणि योग, ध्यान आणि व्यायामासाठी हे एक उत्तम जागा आहे.

●        श्री सिद्धिविनायक मंदिर: हे पवित्र स्थान गिरगाव चौपाटीच्या ११.९ किमी उत्तरेस प्रभादेवी परिसरात आहे, आणि हे मुंबईतील सर्वात श्रीमंत मंदिर आहे, जे अंदाजे १८ व्या शतकात बांधले गेले होते आणि जे गणपतीला समर्पित आहे.

रेल्वेने, विमानाने आणि रस्त्याने (ट्रेन, विमान, बस) तसेच ठराविक वेळेत पर्यटन स्थळावर कसे पोहोचावे      

गिरगाव चौपाटीला रस्ते आणि रेल्वेने जाता येते. या ठिकाणी बेस्ट बस, तसेच टॅक्सी उपलब्ध आहेत.

जवळचे विमानतळ: छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ मुंबई २३.६ किमी.

जवळचे रेल्वे स्टेशन: चर्नी रोड २.२ किमी.

खाद्य वैशिष्ट्य आणि हॉटेल्स        

पानिपुरी, भेळपुरी, वडापाव, पावभाजी आणि स्थानिक पदार्थांचे, फराळाचे अनेक स्टॉल्स येथे आहेत. यासह, दक्षिण भारतीय, तसेच चायनीजचे स्टॉल्स देखील उपलब्ध आहेत.

जवळच्या निवास सुविधा आणि हॉटेल/ हॉस्पिटल/ पोस्ट ऑफिस/पोलीस स्टेशन   

  • गिरगाव चौपाटीच्या आसपास असंख्य हॉटेल्स उपलब्ध आहेत.
  • चौपाटीच्या परिसरात रुग्णालये आहेत.
  • सर्वात जवळचे पोस्ट ऑफिस १.२ किलोमीटर अंतरावर आहे.
  • गिरगाव चौपाटीवरच पोलीस चौकी आहे.

पर्यटनासाठीचे नियम आणि वेळ, पर्यटनासाठी योग्य काळ 

  • हे ठिकाण पर्यटनासाठी वर्षभर उपलब्ध आहे. या ठिकाणास भेट देण्याची उत्तम वेळ ऑक्टोबर ते मार्च पर्यंत आहे.
  • जून ते ऑक्टोबर पर्यंत इथे भरपूर पाऊस असतो आणि उन्हाळा गरम आणि दमट असतो.
  • पर्यटकांनी समुद्रात प्रवेश करण्यापूर्वी भरती आणि ओहोटीच्या वेळ तपासून मगच समुद्रात जावे.
  • पावसाळ्यात समुद्राला येणारी भरती धोकादायक असू शकते म्हणून याकाळात समुद्रात जाणे टाळले पाहिजे.

या ठिकाणी बोलल्या जाणाऱ्या भाषा       

मराठी, हिंदी, इंग्रजी