• स्क्रीन रीडर प्रवेश
  • A-AA+
  • NotificationWeb

    Title should not be more than 100 characters.


    0

Asset Publisher

गोसेखुर्द धरण

गोसेखुर्द धरण महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील पौनी जवळ वेदगंगा नदीवर आहे. हा प्रकल्प मध्य भारतामधील एक मोठा प्रकल्प मानला जातो. वर्षभर नदीमध्ये सिंचनाचे पाणी नियंत्रित करण्यासाठी धरणाला ३३ स्लीपवे गेट्स आहेत. 

जिल्हा/प्रदेश    
भंडारा जिल्हा, महाराष्ट्र,भारत 

इतिहास     
या धरणाचा हेतु या भागातील सिंचन सुधारणे हा होता. हे मातीने तयार केलेलं धरण आहे. धरणाचा पाया २३ ऑक्टोबर १९८४ रोजी श्रीमती.इंदिरा गांधी यांनी घातला. धरणाची ऊंची ९२ मीटर आणि ६५३ मीटर लांब आहे. हे धरण बांधताना जवळपास २५० गावे स्थलांतरित करण्यात आले.   

भूगोल     
वैनगंगा नदीवर भंडारच्या दक्षिणेस आणि नागपुरच्या नैऋत्येस धरण बांधण्यात आले. सर्वात कमी पाया असलेल्या धराणांची ऊंची २२.५ मीटर आहे. 

वातावरण/हवामान    
हा प्रदेश मुख्यत: वर्षभर कोरडा असतो आणि उन्हाळा प्रचंड असतो. उन्हाळयात तापमान सुमारे ३०-४० अंश सेल्सियस असते.  
येथे हिवाळ्यात तापमान १० अंश सेल्सियस इतका खाली येते. 
या प्रदेशातील वार्षिक पर्जन्यमान सुमारे १०६४.१ मिमी असते. 

काय काय करू शकता      
गोसेखुर्द धरणाचा देखावा नयनरम्य आहे. एक किंवा दोन दिवसाच्या सहलीसाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे. या ठिकाणाजवळ रेस्तौरंट्स आहेत जी उत्तम सावजी खाद्य पदार्थ देतात. जवळच्या रेतौरंट्स मध्ये ताजे मासे, कोळंबी, इत्यादींचा आनंद घेता येतो. 
पर्यटन स्थळे/ जागा यांची नावे आणि स्थळांचे थोडक्यात३-४ ओळींमध्ये वर्णन 
●कोका वन्यजीव अभयारण्य : कोकाला काही वरहसपूर्वी म्हणजे २०१३ मध्ये अभयारण्य म्हणून मंजुरी मिळाली. हे पार्क गोसेखुर्द धारणापासुन अवघ्या ५८ किमी अंतरावर आहे.   गौर्स आणि सांभर  सारखे शाकहारी प्राणी या अरण्यात आहेत. अभयारण्य हे प्राण्यांसाठी स्वर्ग मानले जाते. हे ठिकाण खरोखरच निसर्गाची अमूल्य भेट आहे आणि हे एक नयनरम्य निसर्ग, त्यांचे विहंगम सौंदर्य आणि शुद्धा व ताजी हवा देते. 

●स्वामिनारायण मंदिर : गोसेखुर्द धारणापासुन स्वामी नारायण मंदिराचे अंतर सुमारे ९0 किमी आहे. हे सध्याच्या काळातील सर्वात सुंदर बांधलेल्या आश्चर्यपैकी एक आहे. गुलाबी वाळूच्या दगडावर सुंदर नागमोडी कोरीवकामाने मंदिराच्या भिंती सजवल्या आहेत, कलात्मकता आणि खूप उच्च दर्जाचे सर्जनशीलात आहे. आधुनिक काळात अशा प्रकारचे प्रभुत्व क्वचितच पाहायला मिळते. स्वामिनारायण मंदिर हे दगडाच्या कलाकुसरीच्या सर्वात उत्तम स्वरूपाचे उत्तम उदाहरण आहे, जर तुम्ही जगाच्या या भागात प्रवास करत असाल तर भेट देण्याजोगे ठिकाण आहे. 

●गांधीसागर तलाव : गांधीसागर तलाव गोसेखुर्द धारणापासुन ९४.३ किमी अंतरावर आहे. नयनरम्य आयताकृती आकाराचा गांधीसागर तलाव आता दगडी भिंती आणि लोखंडी रेलिंग ने बंद आहे. तलावाच्या मध्यभागी एक लहान बेट देखील दिसेल ज्यामध्ये भगवान शिव यांना समर्पित आकर्षक मंदिर आहे. या तलावात नौकाविहाराचा आनंद घेता येतो, विशेषत: संध्याकाळी उशिरा आणि पहाटेच्या अंधारात आणि आजूबाजूच्या दिव्यांच्या प्रकाशात हे ठिकाण अधिक प्रेक्षणीय दिसते. 

●खिंडसी तलाव : गोसेखुर्द धरणापासून खिंडसी तलावाचे आंतर सुमारे ९१ की.मी आहे. मोहक आणि विशाल तलाव चारीही बाजुनी घनदाट जंगलांनी वेढलेले आहे. अनेक वर्षांपासून विदर्भातील लोकांचे हे सर्वाधिक पसंतीचे पर्यटन स्थळ आहे. मोटरबोट, पेडल बोट, रोइंग बोट, वॉटर स्कूटर, इत्यादि विविध पर्याय उपलब्ध आहेत , म्हणून पर्यटक खिंडसी तलावामध्ये बोटिंगचा आनंद घेऊ शकतात. साहस प्रेमींसाठी जंगल ट्रेक देखील उपलब्ध आहे. याठिकाणी मुलांसाठी अॅडव्हेंचर पार्क देखील आहे. 

या पर्यटन स्थळावर रेल्वे, हवाई, रस्ता ( ट्रेन, विमान, बस) मार्गे कसे जायचे, अंतर आणि लागणार्‍या वेळासह     

रस्त्याने : गोसेखुर्द हे रस्त्याने जोडलेले आहे.  मुंबई ८५७ किमी ( 18 तास २१ मिनिटे ),चंद्रपुर १४८ किमी (३ तास २० मिनिटे ), नागपुर ९४.४ किमी (२ तास १० मिनिट ) या शहरांपासून राज्य परिवहन मंडळाच्या बस, खाजगी गाड्या आणि लक्झरी उपलब्ध आहेत. 

रेल्वे : जवळचे रेल्वे स्टेशन हे ९५.१ किमी ( २ तास १५ मिनिटे ) वरील नागपुर रेल्वे स्टेशन आहे. 

हवाई मार्ग : गोसेखुर्द धरणापासून जवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे 108 किमी ( 2 तास 41 मिनिटे इतक्या अंतरावर आहे.   

विशेष अन्नपदार्थ वैशिष्ट्य आणि हॉटेल     
कांदेपोहे हे इथले वैशिष्ठ्य आहे. जे चिरलेला कांदा, कापलेला बटाटा आणि पोहे, यात मसाले आणि हर्ब्स मिसळून करतात. जे किसलेला खोबरे, शेंगदाणे, याने सजवतात. 
रेस्तौरंट्स आणि फूड जोइंट्स विदर्भाचे वैशिष्ठ्य असलेला मत्स्याहार, सावजी अन्न पदार्थ देतात. 
जवळील राहण्याच्या व्यवस्था आणि हॉटेल/हॉस्पिटल/पोस्ट ऑफिस/पोलिस स्टेशन     
गोसेखुर्द धरणाजवळ खूप थोडी हॉटेल्स आणि रेसोर्ट्स आहेत. 

३० किमी च्या परिसरात चांगली हॉटेल्स मिळू शकतात. 
जवळचे हॉस्पिटल ११ किमी वर आहे. 
जवळचे पोस्ट ऑफिस पौनी येथे आहे जे ११.८ किमी अंतरावर आहे. 
जवळचे पोलिस स्टेशन पौनी येथे आहे जे ११.५ किमी अंतरावर आहे. 

जवळच्या एमटीडीसी रिसॉर्टचा तपशील     
एमटीडीसी  चे रेसोट्स गोसे खुर्द धरणाजवळ उपलब्ध आहे. 
  
पर्यटन मार्गदर्शक माहिती 
    
भेट देण्याचे नियम आणि वेळ 
भेट देण्यासाठी उत्तम महिना 

पावसाळा हा इथे भेट द्यायला उत्तम ऋतु आहे. इथल्या खूप जास्त तापमाना मुळे उन्हाळ्यात इथे येणं टाळावे. 

या भागात बोलली जाणारी भाषा     
इंग्रजी, हिन्दी, मराठी.