• A-AA+
  • NotificationWeb

    Title should not be more than 100 characters.


    0

WeatherBannerWeb

Banner Heading

Asset Publisher

हरिहरेश्वर समुद्रकिनारा (रायगड)

हरिहरेश्वर हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यात भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर आहे. हा किनारा खडकाळ आणि वालुकामय असा आहे. हे ठिकाण दिवेआगर आणि श्रीवर्धन समुद्रकिनारी आहे. समुद्रकिनाऱ्याला लागून असलेल्या शिव मंदिरासाठी ओळखले जाते आणि अनेक शिव-उपासक याला महत्त्वाचे तीर्थस्थळ मानतात. 

जिल्हा/विभाग :

रायगड जिल्हा, महाराष्ट्र, भारत.

इतिहास  :

हरिहरेश्वर हे महाराष्ट्रातील कोकण विभागातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात एक गाव आहे. ठिकाण स्वच्छ आणि वालुकामय समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. तसेच, शिव आणि काळभैरव मंदिरासाठी सर्वात लोकप्रिय आहे. भगवान शंकराला समर्पित मंदिरामुळे हे ठिकाण दक्षिण काशी म्हणूनही ओळखले जाते. हा समुद्रकिनारा बऱ्याच पर्यटकांना माहीत नसल्यामुळे, त्याचे स्वच्छ आणि निर्मळ स्वरूप अबाधित आहे. काळभैरव जयंती उत्सवासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे.

भूगोल :

हरिहरेश्वर हे महाराष्ट्राच्या कोकण भागातील एक किनारपट्टी आहे जीच्या एका बाजूला सह्याद्री पर्वत आणि दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र आहे. हे अलिबाग शहराच्या दक्षिणेस ८१ किमी, मुंबईपासून १९२ किमी दूर आणि पुण्यापासून १७५ किमी दूर आहे.

हवामान :

या प्रदेशातील मुख्य ऋतू म्हणजे पावसाळा. कोकण किनारपट्टीत मुख्यतः जास्त पाऊस (सुमारे २५०० मिमी ते ४५०० मिमी) अनुभवायला मिळतो आणि हवामान दमट आणि उबदार असते. पावसाळ्यात तापमान ३० अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.

उन्हाळा गरम आणि दमट असतो आणि तापमान ४० अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.

इथे हिवाळ्यात तुलनेने सौम्य हवामान (सुमारे २८ अंश सेल्सिअस) असते आणि हवामान थंड आणि कोरडे असते.
 

करण्यासारख्या गोष्टी  :

हरिहरेश्वर... नारळ, सुरू (कॅसुरीना) आणि सुपारीच्या झाडांनी झाकलेल्या आणि फार मानवी हस्तक्षेप न झालेल्या किनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथील समुद्रकिनारे रुंद आणि शांत आहेत. हे किनारे मनाला शांती आणि सूर्यास्ताची चित्तथरारक दृश्ये अनुभवायला देतात. शनिवार व रविवारच्या सुट्टीसाठी तसेच पिकनिकसाठी हे एक लोकप्रिय ठिकाण आहे.

जवळची पर्यटनस्थळे  :

हरिहरेश्वरसह खालील पर्यटन स्थळांना भेट देण्याची योजना आपण करू शकता.

वेळास किनारा : हरिहरेश्वरच्या दक्षिणेला १२ किमी अंतरावर आहे, जो कासव महोत्सवासाठी प्रसिद्ध आहे.
श्रीवर्धन: हरिहरेश्वरच्या उत्तरेस १९ किमी अंतरावर आहे, या ठिकाणी सुंदर, लांब आणि स्वच्छ समुद्रकिनारा आहे.
दिवेआगर: हरिहरेश्वर समुद्रकिनाऱ्याच्या उत्तरेस ३७ किमी अंतरावर स्थित हे ठिकाण त्याच्या प्राचीन, स्वच्छ आणि शांत समुद्रकिनाऱ्यासाठी ओळखले जाते.
कोंडविल समुद्रकिनारा: हरिहरेश्वरच्या उत्तरेस २६ किमी अंतरावर आहे.
बागमंडला: हरिहरेश्वरच्या आग्नेयेस ६ किमी अंतरावर आहे. जंगल जेट्टी राईडसाठी प्रसिद्ध.
 

रेल्वेने, विमानाने आणि रस्त्याने (ट्रेन, विमान, बस) तसेच ठराविक वेळेत पर्यटन स्थळावर कसे पोहोचावे :

हरिहरेश्वरला रस्ते आणि रेल्वेने प्रवेश करता येतो. हे राष्ट्रीय महामार्ग ६६ (NH 66), मुंबई गोवा महामार्गाशी जोडलेले आहे. महाराष्ट्र राज्य परिवहनच्या बसेस मुंबई, पुणे आणि श्रीवर्धन ते हरिहरेश्वर पर्यंत उपलब्ध आहेत.

जवळचे विमानतळ: छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ मुंबई १८९ किमी.

जवळचे रेल्वे स्टेशन: माणगाव ४८ किमी.
 

खाद्य वैशिष्ट्य आणि हॉटेल्स  :

किनारपट्टी भागावर असल्याने सीफूड हे येथील वैशिष्ट्य आहे. सी-फुड पदार्थांबरोबरच हे ठिकाण "उकडीचे मोदक" यासाठी प्रसिद्ध आहे.

जवळच्या निवास सुविधा आणि हॉटेल/ हॉस्पिटल/ पोस्ट ऑफिस/पोलीस स्टेशन  :

हरिहरेश्वरला अनेक निवास पर्याय हॉटेल्स, रिसॉर्ट्स, तसेच होमस्टे या स्वरूपात उपलब्ध आहेत.

हरिहरेश्वरपासून शासकीय रुग्णालय ३३ किलोमीटर अंतरावर आहे.

सर्वात जवळचे पोस्ट ऑफिस बागमंडला जवळ ३.६ किलोमीटर अंतरावर आहे.

हरिहरेश्वर पोलीस स्टेशन मंदिरापासून ०.९ किलोमीटर अंतरावर आहे.
 

जवळपासचे एमटीडीसी रिसॉर्ट  :

हरिहरेश्वरमध्ये एमटीडीसी (MTDC) रिसॉर्ट उपलब्ध आहे.

पर्यटनासाठीचे नियम आणि वेळ, पर्यटनासाठी योग्य काळ  :

हे ठिकाण पर्यटनासाठी वर्षभर उपलब्ध आहे. मात्र भेट देण्याची उत्तम वेळ ऑक्टोबर ते मार्च पर्यंत आहे. 

पाऊस जून ते ऑक्टोबर पर्यंत असतो आणि उन्हाळा गरम आणि दमट असतो.

पर्यटकांनी समुद्रात प्रवेश करण्यापूर्वी भरती आणि ओहोटीच्या वेळ तपासून मगच समुद्रात जावे.

पावसाळ्यात समुद्राला येणारी भरती धोकादायक असू शकते म्हणून याकाळात समुद्रात जाणे टाळले पाहिजे.
 

या ठिकाणी बोलल्या जाणाऱ्या भाषा :

इंग्रजी, हिंदी, मराठी, कोकणी


Tour Package

Hotel Image
Blue Diamond Short Break Bustling Metropolis

2N 1Day

Book by:

MTDC Blue Diamond

Where to Stay

Responsive Image
हरिहरेश्वर

MTDC हॉलिडे रिसॉर्ट श्रीवर्धन (महाराष्ट्र, भारत) जवळ हरिहरेश्वर येथे आहे जे मुंबईपासून 230 किमी अंतरावर मुंबईपासून सुमारे 5 तासांच्या अंतरावर आणि पुण्यापासून सुमारे 151 किमी अंतरावर आहे (5 तास).

Visit Us

Tourist Guides

Responsive Image
लवंगिया नोशिर होशांग

ID : 200029

Mobile No. 9820602389

Pin - 440009

Responsive Image
प्रजापती मोहित राजेंद्र

ID : 200029

Mobile No. 9702777820

Pin - 440009

Responsive Image
नारन्नवर पूजा सुरेश

ID : 200029

Mobile No. 9833461135

Pin - 440009

Responsive Image
कावसर इम्रान बशीर

ID : 200029

Mobile No. 9320601919

Pin - 440009