• स्क्रीन रीडर प्रवेश
  • A-AA+
  • NotificationWeb

    Title should not be more than 100 characters.


    0

Asset Publisher

इगतपुरी

इगतपुरी भारताच्या पश्चिम घाटात महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात आहे. इगतपुरी हे एक हिल स्टेशन आणि   विपश्यना इंटरनॅशनल अकॅडमीसाठी ओळखले जाणारे एक शहर आहे, जेथे विपश्यना नामक प्राचीन ध्यानपद्धती शिकवली जाते. पावसाळ्यात महाराष्ट्रात भेट देण्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे.


जिल्हा/प्रदेश
नाशिक जिल्हा, महाराष्ट्र, भारत

भूगोल
हे ठिकाण पश्चिम घाटात आहे.  हे हिल स्टेशन व्यस्त मुंबई-आग्रा NH-३ महामार्गावर नाशिकपासून फक्त ४५ किमी आणि मुंबईपासून १३० किमी अंतरावर आहे. इगतपुरी समुद्रसपाटीपासून सुमारे १९६८.५ फूट उंचीवर आहे. कसारापासून याचे अंतर २० किमी आहे.

हवामान     
•    नाशिकचे सरासरी वार्षिक तापमान २४.१ अंश सेल्सिअस आहे.
•    या भागात हिवाळा प्रचंड असतो आणि तापमान १२ अंश सेल्सिअस इतके कमी होते.
•    उन्हाळ्यात सूर्य खूप कडक तापतो. नाशिकमध्ये हिवाळ्यापेक्षा उन्हाळ्यात जास्त पाऊस पडतो. उन्हाळ्यात तापमान ३० अंश सेल्सिअसच्या वर जाते.
•    येथे सरासरी वार्षिक पाऊस सुमारे ११३४ मिमी होतो.

येथे काय करावे      
इगतपुरीमध्ये करण्यासारख्या गोष्टी:कळसूबाई शिखर, त्रिंगलवाडी किल्ला, विपश्यना सेंटर, भातसा नदी खोरे, कैमल खोरे, घंटादेवी मंदिर, कुलंगगड, बितनगड ट्रेक, संधान खोरे, वैतरणा धरण, अमृतेश्वर मंदिर, दारणा धरण, धम्मगिरी, तळेगाव सरोवर, साहसिक खेळ, पक्षीनिरीक्षण, वगैरे

जवळची पर्यटन स्थळे     
इगतपुरी बरोबरच खालील पर्यटन स्थळांना भेट देण्याची योजना करू शकता:
•    लोणावळा (१८० किमी )
लोणावळा हे अप्रतिम सौंदर्य आणि नेत्रदीपक निसर्गचित्रांसाठी प्रसिद्ध आहे. सरोवर, ओढे, बाग आणि हिरवळ, या ठिकाणी सर्व प्रकारची आकर्षणे आहेत. ज्यात मुख्य आहेत, कुणे फॉल्स, टायगर पॉइंट, लोहागढ किल्ला, भजा लेणी, नागफणी, कार्ला लेणी आणि पवना तलाव.
•    खंडाळा (१७७ किमी.)
खंडाळा प्रकृती प्रेमींसाठी स्वर्ग आहे.येथे पर्यटकांसाठी बऱ्याच ट्रेकिंग ट्रेल्स आहेत. 
येथील मुख्य आकर्षण स्थळे आहेत: राजमाची किल्ला, भुशी तलाव, वाळवण धारण, शूटिंग पॉइंट आणि रिवर्सिंग स्टेशन
•    ठाणे ((९८.८ किमी )
ठाणे मुंबईला लागून असलेले मोठे शहर आहे. याला ‘तळ्यांचे शहर’ असे म्हणतात कारण येथे लहान मोठी ३० पेक्षा जास्त तळी आहेत. यापैकी हिरव्यागार वृक्षांनी नटलेले उपवन तळे मुख्य आहे जे एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. येथील अन्य आकर्षण आहेत एल्विस बटरफ्लाय गार्डन, सरगम वाटर पार्क, वर्धमान फँटसी अम्यूजमेंट पार्क, तानसा धरण, ओवळेकर वाडी बटरफ्लाय गार्डन.
•    अलिबाग (१८५ किमी )
अलिबाग समुद्रकिनारे, किल्ले आणि मंदिरे असलेले एक नयनरम्य स्थळ आहे. येथील प्रमुख आकर्षण आहेत, कनकेश्वर देवस्थान मंदिर, अलिबाग बीच, आणि कोलाबा किल्ला. अलिबाग वाटर स्पोर्ट्स साठी देखील खूप लोकप्रिय आहे.
•    कर्जत (१२६ किमी )
येथे खडकात खोदकाम करून बांधलेली मंदिरे आणि किल्ले आहेत. उंच डोंगराने वेढलेले हे उत्तम हिरवळ असलेले एक उत्कृष्ट स्थळ आहे. येथील प्रमुख आकर्षणे आहेत, उल्हास नदीत व्हाईट वाटर राफ्टींग, हाईकिंग, माउंटन क्लाइम्बिंग,बेकरे धबधब्यात रेपलिंग, आणि कोंडाणे गुंफा.
•    मुंबई (१२१ किमी ) 
महाराष्ट्राची राजधानी असलेले मुंबई शहर पश्चिम किनाऱ्यावरील मोठे बंदर आहे.मुंबई येथे युनेस्को ने जाहीर केलेली तीन वारसा स्थळे आहेत. येथील मुख्य आकर्षण आहेत, गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव,ताज महाल पॅलेस, कान्हेरी गुंफा, ग्लोबल विपश्यना पैगोडा, आणि बरेच काही.
•    भीमाशंकर (१८५ किमी )
भीमाशंकर एक मोठे धार्मिक स्थळ आहे. हे पवित्र १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.
•    नाशिक (४६.२ किमी )
नाशिक महाराष्ट्रातील चौथ्या क्रमांकाचे शहर आहे. येथे विश्व प्रसिद्ध कुंभ मेळा प्रत्येक १२ वर्षांनी भरतो. हे हिंदूंचे एक प्रमुख तीर्थस्थळ आहे.येथील प्रमुख आकर्षण स्थळे आहेत, त्र्यंबकेश्वर शिव मंदिर, सीता गुफा, कपिलेश्वर मंदिर, सोमेश्वर मंदिर.
•    शिर्डी (१२१ किमी )
शिर्डी प्रसिद्ध संत श्री साईबाबा यांचे निवास स्थान आहे. येथील प्रमुख आकर्षण स्थळे आहेत,शिर्डी साईबाबा समाधि मंदिर, साईतीर्थ थीम पार्क, शनी शिंगणापूर, लेंडी बाग, खंडोबा मंदिर, अब्दुल बाबा कुटी, दीक्षित वाडा म्यूजियम, गुरूस्थान, द्वारका माई, वेट एन जॉय वाटर पार्क.
•    पनवेल (१२५ किमी )
पनवेल महाराष्ट्र राज्यात नवी मुंबई मधील रायगड जिल्ह्यातील शहर आहे. येथील प्रमुख आकर्षण स्थळे आहेत, कर्नाळा किल्ला, स्मार्ट ईको पार्क, गाडेश्वर धारण, ओरीयन मॉल, श्री स्वामी समर्थ. धार्मिक स्थळे, आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके ऑडीटोरीयम आणि बरेच काही.

पर्यटन स्थळाला रेल्वे, हवाई, रस्ता (ट्रेन, उड्डाण, बस) द्वारे कसे जावे (अंतर आणि वेळेसह)    
इगतपुरी ला रस्तामार्गे जाता येते. ते NH३ महामार्गाला जोडलेले आहे. राज्य परिवहन, खाजगी आणि लग्झरी बसेस खालील शहरांमध्ये उपलब्ध आहेत.
•    कसारा ते इगतपुरी: २० किमी. (३१ मिनिटे)
•    मुंबई ते  इगतपुरी: १२१ किमी (२ तास ३७ मिनिटे)
•    नाशिक  ते  इगतपुरी: ४७ किमी (५८ मिनिटे)
•    शिर्डी ते  इगतपुरी: १२६ किमी (२ तास)
•    सर्वात जवळचे विमानतळ:छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ ११९ किमी (२ तास २८ मिनिटे).
•    सर्वात जवळचे रेल्वे स्थानक: इगतपुरी १ किमी. (५ मिनिटे)
•    कसारा २० किमी (३० मिनिटे)


विशेष खाद्य आणि हॉटेल    
इगतपुरीचे स्थानिक खाद्य महाराष्ट्रीयन खाद्य पदार्थ आहेत, पण त्यात दक्षिण आणि उत्तर भारतीय खाद्यपदार्थांचे मिश्रण आहे. इडली-डोसा पासून पराठे आणि तंदुरी पर्यंत सर्व काही येथे मिळू शकते. वडा पाव ही इथली खासियत आहे. येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देत असल्याने येथील रेस्टॉरंट्स विविध प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध करून देतात.

जवळ उपलब्ध असलेली राहण्याची ठिकाणे, आणि हॉटेल, हॉस्पिटल, पोस्ट ऑफिस/ पोलीस स्टेशन      
इगतपुरी येथे बरीच रिसॉर्ट्स आणि हॉटेल्स उपलब्ध आहेत.
•    पाटील हॉस्पिटल (०.५ किमी )
•    लोहमार्ग पोलीस स्टेशन (१ किमी )
•    इगतपुरी पोस्ट ऑफिस (०.३ किमी )

एमटीडीसी रिसॉर्टची माहिती    
एमटीडीसी स्वीकृत मेघधनुष पार्क (३.१ किमी)

क्षेत्राला भेट देण्याचे नियम आणि वेळ, भेट देण्याचा सर्वोत्तम महिना    
•    डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीचे हवामान थंड आणि आल्हाददायक असते.
•    जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये मध्यम हवामान असते पण मुख्यतः ढगाळ वातावरण आणि मुसळधार पाऊस पडतो.
•    मार्च, एप्रिल आणि मे हे अत्यंत गरम महिने असतात.

क्षेत्रात बोलल्या जाणाऱ्या भाषा
इंग्रजी, हिंदी, मराठी