• स्क्रीन रीडर प्रवेश
 • A-AA+
 • NotificationWeb

  Title should not be more than 100 characters.


  0

Asset Publisher

जव्हार

जव्हार हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागात पालघर जिल्ह्यातील एक शहर आणि नगरपरिषद आहे. जव्हार त्याच्या सुखद आणि विहंगम वातावरणासाठी आणि प्राचीन सांस्कृतिक वारशासाठी ओळखले जाते. जव्हार महाराष्ट्र राज्यातील सर्वात जुन्या नगरपरिषदांपैकी एक आहे.

जिल्हा/क्षेत्र

पालघर जिल्हा, महाराष्ट्र, भारत

इतिहास

जव्हार राज्याची स्थापना राजा जयाबा मुकणे यांनी १३४३ मध्ये केली आणि जव्हार ला राजधानी केले. गेल्या ६०० वर्षांच्या इतिहासात या राज्याने अनेक चढउतार बघितले. १९४७  मध्ये स्वातंत्र्यप्राप्ती नंतर हे राज्य भारतीय गणराज्यात विलीन झाले.ब्रिटीश राज्य असताना जव्हार बॉम्बे प्रेसिडेन्सी चा भाग होता आणि त्याला ९ तोफांची सलामी होती.  राजधानी असून देखील जव्हार नेहमीच उपेक्षित राहिले याचे कारण होते कमी उत्पन्न| राजा पतंग शाह चतुर्थ यांच्या कारकीर्दीत जव्हारमध्ये मोठी सुधारणा झाली. १९४७ मध्ये भारतीय संघराज्याशी औपचारिक एकत्रीकरणापूर्वी राजा पतंग शाह पाचवा (यशवंत राव) मुकणे जव्हारचे शेवटचे नेते होते.

भूगोल

जव्हार हा पर्णपाती हिरव्या वनस्पतींनी वेढलेला असतो. याची सरासरी उंची  ४४७ मीटर (१४६६ फूट) आहे. हे रस्तामार्गे नाशिकपासून सुमारे  ८० KM आणि मुंबईहून  १४५ KM आहे.

हवामान
या प्रदेशात पावसाळा हा प्रमुख ऋतू आहे.  कोकण पट्ट्यात उच्च पर्जन्यमान (सुमारे  २५०० मिमी ते  ४५०० मिमी) असते आणि येथील हवामान दमट आणि उबदार असते. या काळात तापमान  ३० अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.
उन्हाळा या भागात खूप जास्त गरम आणि दमट असतो, जेव्हां  तापमान ४०  डिग्री सेल्सियस पर्यंत पोहोचते.हिवाळ्यात तुलनेने सौम्य हवामान असते (सुमारे  २८ डिग्री सेल्सियस) आणि हवामान थंड आणि कोरडे असते.

येथे काय करावे  

पर्यटक निसर्गरम्य सौंदर्य पाहण्यासाठी  येथे भेट देऊ शकतात,. भूपतगड किल्ला, जय विलास पैलेस, हनुमान पॉईंट आणि सूर्यास्त बिंदू जव्हारमधील सर्वात जास्त लोकप्रिय निसर्गरम्य ठिकाणे  आहेत.

जवळची पर्यटन स्थळ

 • काल मांडवी धबधबा: - काल मांडवी धबधबा सुमारे १०० मीटर उंचीचा आहे आणि तो केवळ पावसाळ्यातच नाही तर पूर्ण वर्षभर वाहतो, . पण धबधब्याचे सर्वात निसर्गरम्य दृश्य पावसाळ्यात असतात. कल मांडवी हा  आपटाळे गावानजीक असलेला धबधबा आहे. जव्हार ते कळमंडी हे अंतर जव्हार-झाप रस्त्याने अंदाजे ५-६ किलोमीटर आहे.
 • खड -खड धरण: - हे जव्हार शहराजवळील प्रमुख धरणांपैकी एक आहे. धरणाचे अतिरिक्त पाणी प्रचंड खडकांमधून वाहते (धरणाच्या थोडे पुढे) जे धबधब्याच्या स्वरूपात दिसते.
 • सनसेट पॉइंट: - शहराच्या मध्यभागापासून पश्चिमेकडे सुमारे ०.५ किमी अंतरावर सनसेट पॉईंट नावाचे  प्रेमिकांचे आवडते स्थळ आहे. सूर्यास्त बिंदूच्या सभोवताल  धनुष्याकार दरी आहे, म्हणूनच  पूर्वी  हे ठिकाण  धनुकमल म्हणून ओळखले जात असे. सूर्यास्ताच्या वेळी, जव्हारपासून जवळजवळ  ६० किलोमीटर अंतरावर असलेला डहाणूजवळचा   महालक्ष्मीचा पर्वत दिसतो.
 • जय विलास पॅलेस- जय विलास पॅलेस- जव्हार येथील ऐतिहासिक महत्त्वाचे स्थळ आहे.नवक्लासिकल शैलीतील ही इमारत राजा यशवंत राव मुकणे यांनी बांधली.सुंदर गुलाबी रंगाच्या दगडाने बांधलेली ही इमारत एकाटेकडी च्या शिखरा वर आहे आणि ही इमारत स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.  या इमारतीवर  पश्चिमी आणि भारतीय कलांचा प्रभाव स्पष्ट दिसतो. या इमारतीचा आंतरिक सज्जेत मुकणे राजघराण्याच्या उच्च सांस्कृतिक राहणीमानाचा प्रत्यय येतो. या महालाच्या आजूबाजूला घनदाट जंगल आणि हिरवळ आहे. याचा उत्कृष्ट  स्थापत्यकलेमुळे आणि सौंदर्यामुळेया इमारतीत अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांचे छायांकन झाले आहे.
 • शिरपामाळ: शिरपामाळ ही एक ऐतिहासिक महत्त्वाचे ठिकाण आहे. सुरत विजया साठी जाताना छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी मुक्काम केला होता. या जागे चे सौंदर्यीकरण एडवोकेट मुकणे, अध्यक्ष, जव्हार नगर  पालिकायांनी     १९९५ मध्ये केले.
 • गंभीरगड: डहाणू, पालघर जिल्हा या ठिकाणापासून  ५८ किमी. अंतरावर गंभीरगड किल्ला आहे. हा पालघर जिल्ह्यातील त्यातल्या त्यात कमी महत्त्वाचा किल्ला आहे. आता याचे फक्त अवशेष उरले असून याचे पुनर्निर्माण करण्याची गरज आहे. या किल्ल्याची उंची  २२५२ फुट आहे.

गावात वसलेला आहे. हा मुंबईजवळील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक आहे. हा धबधबा लेंडी नदी आहे आणि हा ३०० फूट उंचीवरून खाली कोसळतो.दाभोसा धबधबा कायाकिंग, ट्रेकिंग, व्हॅली क्रॉसिंग  अश्या साहसिक खेळांसाठी आणि मासेमारीसाठी एक उत्तम ठिकाण आहे.


विशेष खाद्य आणि हॉटेल

पालघर व्यंजनांचे वैशिष्ट्पूर्ण खाद्य आहे. याचे वेगळेपण स्थानिक भाजी उत्पादनातून आहे.  येथे दुर्मिळ माशांचे लोणचे आणि चटण्या खाद्य महोत्सवात उपलब्ध होतात. येथे विविध प्रकारचे पदार्थ मिळतात. त्यापैकी काही आहेत- पानमोडी (सावेली) जे किसलेली काकडी, गूळ आणि तांदळाचे पीठ यांचे वाफवलेले मिश्रण असते. . इंडेल- वसईच्या ख्रिश्चन लोकांचे एक विशेष पद्धती ने  मॅरीनेट केलेले  चिकन. येथील रेस्टॉरंट्स मध्ये  विविध प्रकारचे पदार्थ मिळतात, उदाहरणार्थ आंबिल- जे आंबविलेल्या ज्वारीच्या पिठापासून बनलेले असते.   उबड हंडी विशेष पानात गुंडाळलेले मॅरीनेटेड चिकन जे शिजवण्यासाठी  मातीच्या  भांड्यात  ठेवले जाते. आणि त्यावर निखारे ठेवले जातात.  पैसली- मॅरीनेटेड माशांचे तुकडे पळसाच्या पानांमध्ये गुंडाळले जातात आणि आगीत भाजले जातात.

जवळ उपलब्ध असलेली राहण्याची ठिकाणे, आणि हॉटेल, हॉस्पिटल, पोस्ट ऑफिस/ पोलीस स्टेशन 

जव्हार येथे बरीच हॉटेल्स उपलब्ध आहेत.

जवळ उपलब्ध असलेले पोस्ट ऑफिस  १.१ किमी. (५ मिनिटे) लांब आहे.

जवळ उपलब्ध असलेले पोलीस स्टेशन  ऑफिस ०.९  किमी. (३ मिनिटे) लांब आहे.

क्षेत्राला भेट देण्याचे नियम आणि वेळ, भेट देण्याचा सर्वोत्तम महिना

जव्हारला भेट देण्याचा उत्तम काळ म्हणजे हिवाळा अर्थात  ऑक्टोबर ते फेब्रुवारी महिने आहे ,जेव्हा हवामान थंड आणि कमी दमट असते.

जुलै आणि सप्टेंबरमध्ये मुसळधार पाऊस पडतो, त्यामुळे या काळात

पर्यटकांनी जाणे टाळावे.

क्षेत्रात बोलल्या जाणाऱ्या भाषा

इंग्लिश, हिंदी,मराठी