• A-AA+
  • NotificationWeb

    Title should not be more than 100 characters.


    0

Asset Publisher

जायकवाडी पक्षी अभयारण्य

जायकवाडी पक्षी अभयारण्य औरंगाबादमध्ये आहे. अभयारण्यात नाथसागर तलाव व सभोवतालचे क्षेत्र जलचर वनस्पती आणि प्राण्यांनी समृद्ध बनले आहे. १२४ हेक्टरमध्ये पसरलेले 'संत ज्ञानेश्वर उद्यान' कर्नाटकातील प्रसिद्ध 'वृंदावन गार्डन', 'हरियाणा' चे 'पिंजोर गार्डन' आणि काश्मीरचे 'शालीमार गार्डन' च्या धर्तीवर उभारलेले आहे. हे ठिकाण पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. उद्यानात विविध प्रजातींची झाडे पहावयास मिळतात. 'नाथसागर तलाव' १९७६ मध्ये बांधण्यात आले, ज्यात सुमारे ४५-किलोमीटर लांब किनारपट्टी असलेल्या उथळ बशी प्रकाराच्या जलाशयांसह ६ बेटांचा समावेश आहे.

जिल्हे/प्रदेश     
तहसिल: पैठण, जिल्हा: औरंगाबाद, राज्य: महाराष्ट्र.

इतिहास    
जायकवाडी पक्षी अभयारण्य पक्ष्यांच्या असंख्य प्रजातींचे घर आहे. अभयारण्य हे पक्षी प्रेमींचे नंदनवन आहे जे असंख्य रहिवासी आणि स्थलांतरित पक्ष्यांना आकर्षित करते.
पक्षी अभयारण्यातील नाथसागर तलावाच्या सान्निध्यात अभयारण्यातील जलचर आणि प्राणिमात्रांची भर पडते. जलीय वनस्पतींमध्ये स्पायरोग्यरा, हायड्रिला, चारा, पोटामोगेटन आणि वॅलिस्नेरिया इत्यादी प्रजातींचा समावेश आहे. अभयारण्याच्या आसपासच्या नाथसागर तलावामध्ये माशांच्या ५० पेक्षा जास्त प्रजाती आढळतात.
वनस्पती: जलीय वनस्पतींमध्ये प्रामुख्याने चारा, स्पायरोगिरा, हायड्रिला, पोटामोगेटन, वॅलिस्नेरिया इत्यादींचा समावेश होतो.
प्राणी: या भागात निवासी आणि स्थलांतरित पक्ष्यांच्या अनेक प्रजाती आकर्षित झाल्या आहेत. या अभयारण्यात पक्ष्यांच्या २०० पेक्षा जास्त प्रजाती आहेत, ज्यात स्थलांतरित पक्ष्यांच्या ७०+ प्रजातींचा समावेश आहे. क्रेन, फ्लेमिंगो, पिनटेल, विजन, शोवेलर, डक, पोचर्ड्स, टील्स, गॉड विट, शॉसेस आणि ग्लॉसी आयबिस हे येथे आढळणारे काही स्थलांतरित पक्षी आहेत.

भूगोल     
अभयारण्य उथळ पाण्यात विविध आकारांच्या बेटांमध्ये पसरलेले आहे, ज्यात मुरूम व झाडे आहेत; हे स्थलांतरित पक्ष्यांसाठी एक चांगला निवारा उपलब्ध करते. आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण असलेल्या जायकवाडी धरण महाराष्ट्रातील औरंगाबादपासून सुमारे ५२ किलोमीटर अंतरावर आहे.

हवामान/वातावरण     
जून-सप्टेंबर दरम्यान येथे दरवर्षी सरासरी पाऊस ५०० मिमी असतो. उन्हाळ्यात तापमान ४५ अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते, तर हिवाळ्यात किमान तापमान ९ अंश सेल्सिअस असते.

करावयाच्या गोष्टी    
पहाटे पक्षी निरीक्षण हे येथील पर्यटकांसाठीचे सर्वात मोठे आकर्षण आहे.

जवळचे पर्यटन स्थळ    
पैठण जैन तीर्थ: पैठण गाव अभयारण्याजवळ आहे. हे गाव एक सुप्रसिद्ध प्राचीन दिगंबर जैन क्षेत्र आहे, म्हणजे चमत्कारांचे तीर्थक्षेत्र. हे मंदिर २० व्या जैन तीर्थंकर मुनीसुव्रत यांचे आहे.
पैठण गाव रेशीम साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. साडी विणण्याची प्रक्रिया पाहणे हे त्या ठिकाणाचे आकर्षण आहे.

रेल्वे, हवाई, रस्त्याने (रेल्वे, उड्डाण, बस) द्वारे पर्यटन स्थळास अंतर आणि आवश्यक वेळ लक्षात घेऊन प्रवास कसा करावा    
•    हवाई मार्गाने: औरंगाबाद विमानतळ अभयारण्यापासून ५८ किमी अंतरावर आहे.
•    रेल्वे: औरंगाबाद रेल्वे स्टेशन अभयारण्यापासून ४९ किमी दूर आहे.
•    रस्त्याने: पैठण बस स्टँड अभयारण्यापासून २.५ किमी अंतरावर आहे.
•    औरंगाबादहून पैठणसाठी नियमित अंतराने सुटणाऱ्या अनेक राज्य परिवहन बसेस व याव्यतिरिक्त, कार आणि टॅक्सी देखील सहज उपलब्ध आहेत.

विशेष खाद्यपदार्थ आणि हॉटेल    
धरणातले गोड्या पाण्यातील आणि बॅकवॉटरचे मासे सामान्यतः सर्व हॉटेल्समध्ये मिळतात.

जवळचे एमटीडीसी रिझॉर्ट     
औरंगाबादमधील एमटीडीसी अजिंठा पर्यटक रिसॉर्ट फर्दापूर हे जवळचे एमटीडीसी रिसॉर्ट आहे. हे अभयारण्यापासून सुमारे ६० किमी अंतरावर आहे.

स्थळास भेटीचे नियम आणि वेळ, भेटण्यासाठीचा सर्वोत्तम महिना    
वेळ: सकाळी ०८:०० ते सायंकाळी ०५:००
प्रवेश शुल्क नाही
या अभयारण्याला भेट देण्याचा उत्तम काळ ऑक्टोबर ते मार्च दरम्यान असतो जेव्हा हिवाळ्यातील तापमान दिवस आनंददायी बनवते, या महिन्यांत पक्षी अभयारण्यात येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांना शोधण्यासाठी योग्य काळ आहे.

परिसरात बोलली जाणारी भाषा    
मराठी, हिंदी, इंग्रजी.