जायकवाडी धरण - DOT-Maharashtra Tourism
Breadcrumb
Asset Publisher
जायकवाडी धरण
जायकवाडी धरण हे भारतातील महाराष्ट्रातील, औरंगाबाद जिल्हातील, पैठण तालुक्यातील गोदावरी नदीवरचे धरण आहे. महाराष्ट्र राज्यातील हे एक सर्वात मोठा सिंचन प्रकल्प आहे. या धारणाभोवती पक्षी अभयारण्य आहे.
जिल्हा/प्रदेश
औरंगाबाद जिल्हा, महाराष्ट्र, भारत.
इतिहास
दुष्काळग्रस्त मराठवाड्याची सिंचांनाची गरज पूर्ण करण्यासाठी हे धरण बांधण्यात आले होते. मूळ योजना हैदराबाद राज्याच्या कारकिर्दीत बीड जिल्हातील जायकवाडी गावाजवळ तयार करण्यात आली होती. यासाठीचा प्रकल्प प्रस्ताव १९६४ पर्यन्त पूर्ण झाला. १८ ऑक्टोबर १९६५ रोजी भारताचे पंतप्रधान लाल बहाद्दुर शास्त्री यांनी धरणाची पायाभरणी केली आणि याचे उत्घाटन त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे हस्ते झाले. हा एक बहूद्देशीय प्रकल्प आहे. जायकवाडी हे आशियातील सर्वात मोठे मातीचे धरण मानले जाते. त्याची ऊंची अंदाजे ४१.३० मीटर आहे ,तर हे ९.९९८ किमी ( जवळपास १० किमी) लांब असून याची संचय क्षमता २९०९ एमसीएम ( दश लक्ष घन मीटर) आहे.
भूगोल
जायकवाडी हे महाराष्ट्राच्या औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात आहे, जे औरंगाबादच्या दक्षिणेला आणि अहमदनगरच्या ईशान्येला आहे.
वातावरण/हवामान
या प्रदेशातील वातावरण उष्ण आणि कोरडे असते. हिवाळा आणि पावसाळ्यापेक्षा येथील उन्हाळे ४०.५ अंश सेल्सियस तापमानसह तीव्र आहेत,
हिवाळा त्यामानाने सौम्य असतो, आणि सरासरी तापमान २८ अंश ते ३० अंश सेल्सियस मध्ये असते.
पावसाळा हा अतिशय तीव्र हंगामी बदल असणारा असतो, आणि इथले सरासरी पर्जन्यमान हे सुमारे ७२६ मिमी एवढे असते.
काय काय करू शकता
पर्यटक नाथसागर जलाशयाला भेट देऊ शकतात जो जायकवाडी धरणामुळे बनला आहे. पर्यटक जवळपास तयार केलेल्या ज्ञानसागर उद्यानाला भेट देऊ शकतात.
पर्यटन स्थळे/ जागा यांची नावे आणि स्थळांचे थोडक्यात ३-४ ओळींमध्ये वर्णन
●जायकवाडी पक्षी अभयारण्य : - भारताच्या, महाराष्ट्र राज्यातील, औरंगाबाद जिल्ह्यातील, पैठण तालुक्यातील जायकवडी गावाजवळ जायकवादी पक्षी अभयारण्य आहे. पक्षी अभयारण्य विविध आकारांच्या बेटांवर आहे. धरण भागात विविध स्थलांतरित पक्ष्यांचे वास्तव्य आहे, यातील काही पक्षी आंतरराष्ट्रीय स्थलांतरित पक्षी मानले जातात.
●संत ज्ञानेश्वर उद्यान :- संत ज्ञानेश्वर उद्यान हे महाराष्ट्रातील एक उद्यान आहे जे म्हैसूरच्या वृंदावन गार्डन सारखे आहे. राज्य सरकारने १९७० सालच्या दरम्यान जायकवाडी धरणाचा जलाशय असलेल्या नाथसागरच्या जवळ तयार केले. रांगेबिरंगी फुलांचे बेड, विशाल लॉन आणि सांगीतिक कारंजे यांनी पर्यटकांना आकर्षित केले. यात लहान मुलांसाठी खेळण्याचे वेगळे क्षेत्र आहे, जलतरण तलाव आणि बोट राईड देखील आहेत.
●बिबी का मकबरा :- बिबी का मकबरा ( “ पत्नीचे थडगे ) हे भारतातील,महाराष्ट्रातील औरंगाबाद याठिकाणी असलेले थडगे आहे . १६६० मध्ये मुघल बादशाह औरंगजेबाने तिची पत्नी दिलास बांनो बेगम हिच्या स्मरणार्थ बांधले. बादशाही मशिदीच्या आधी औरंगजेबाने बांधलेली दुसरी सर्वात मोठी रचना ही बिबी का मकबरा मनाली जाते.
●अजंठा लेणी :- अजंठ्यातील बौद्ध लेणी ही अंदाजे ३० दगडात कोरलेली बौद्ध लेणी स्मारके आहेत जी भारतातील महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे इ.सा पूर्व दुसर्या शतकं पासून इसवी सन ४८० पर्यन्त आहेत . या लेण्यांमध्ये दगडात कोरलेली शिल्पे आणि चित्रे आहेत. जी प्राचीन भारतीय कलेची पहिली संरक्षित उदाहरणे मनाली जातात, विशेषत: भावना दर्शवणारी अभिव्यक्तींनी भरलेली चित्रे.
●एलोरा लेणी :- एलोरा हे यूनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे जे भारताच्या, महाराष्ट्राच्या औरंगाबाद जिल्ह्यात आहे. हे जगातील सर्वात मोठ्या हिंदू मंदिराच्या गुंफा रचनांपैकी एक आहे असे मानले जाते. यात मुख्यात: हिंदू आणि जैन स्मारके आहेत ज्यात आकर्षक काम आहे जे इसवी सन ६००-१००० च्या काळापर्यंत आहे . एकाच महाकाय खडकमधील सर्वात मोठे उत्खनन गुहा क्रमांक १६ मध्ये पहिले जाऊ शकते हा आकार भगवान शिवाचे प्रतिनिधित्व करतो.
●घृष्णेश्वर मंदिर :- घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर, ज्याला कधी कधी घुश्मेश्वर मंदिर असेही म्हणतात , हे भगवान शिव यांना समर्पित पवित्र ठिकाणांपैकी एक आहे ज्याचे संदर्भ शिवा पुराण सारख्या पुराणिक कथांमध्ये आढळुन येतात घृष्णेश्वर शब्दाचा अर्थ करुणेचा स्वामी असा आहे . एलोरा लेण्याजवळ हे मंदिर आहे.
●दौलताबाद किल्ला :- दौलताबाद किल्ला ज्याला देवागिरी किंवा देवगिरि म्हणूनही ओळखले जाते, हा भारतातील महाराष्ट्रातील औरंगाबाद येथील दौलताबाद (देवगिरि ) गावात असलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे. १२ व्या शतकतील स्थापत्यकलेचा सुंदर नमुना बांधण्यात आला आहे. याने यादव राजवंशाची राजधानी म्हणून काम केले आहे (९ वे शतक ते १४ वे शतक ) हे महाराष्ट्राच्या सात आश्चर्यांपैकी म्हणून प्रसिद्ध आहे. सुमारे २०० मीटर उंचीच्या शंकुच्या आकाराच्या टेकडीवर हा किल्ला उभा आहे.
या पर्यटन स्थळावर रेल्वे, हवाई, रस्ता ( ट्रेन, विमान, बस) मार्गे कसे जायचे, अंतर आणि लागणार्या वेळासह जायकवाडी धरण हे रस्त्याने जोडलेले आहे. अहमदनगर ८८ किमी ( २ तास ९ मिनिट), सोलापूर २७२ किमी (४ तास ४५ मिनिट), बीड ८७ किमी ( १ तास ४७ मिनिट ) या शहरातून राज्य परिवहन मंडळ, खाजगी गाड्या आणि लक्झरी बस उपलब्ध आहेत.
जवळचे विमानतळ :- ५८ किमी ( १ तास ३६ मिनिटे ) वरील औरंगाबाद विमानतळ.
(१ तास १३ मिनिट)
जवळचे रेल्वे स्टेशन : ५९ किमी ( १ तास १३ मिनिटे) वरील औरंगाबाद रेल्वे स्टेशन
विशेष अन्नपदार्थ वैशिष्ट्य आणि हॉटेल
औरंगाबादी जेवण मुघली किंवा हैद्राबादी सारखे आहे ज्यात त्याच्या सुवासिक पुलाव आणि बिर्याणीसह पाक कृती आहेत. या शहराचे असे वैशिष्ठ्य महानवे अशी मांसाहारी डिश म्हणजे नान – खलिया ( नान –क्वालिया )आहे. हे मटन आणि विविध प्रकारच्या मसाल्यांचे मिश्रण आहे.
जवळील राहण्याच्या व्यवस्था आणि हॉटेल/हॉस्पिटल/पोस्ट ऑफिस/पोलिस स्टेशन
जायकवाडी धरणाजवळ विविधा हॉटेल्स उपलब्ध आहेत.
अनेक हॉस्पिटल्स जायकवाडी धारणा पासून १.५ किमी च्या आसपास आहेत.
जायकवाडी धरणच्या जवळ पोस्ट ऑफिस ३.२ किमी वर आहे.
जायकवाडी धरणाच्या जवळ २.८ किमी वर पोलिस स्टेशन उपलब्ध आहे.
जवळच्या एमटीडीसी रिसॉर्टचा तपशील
एमटीडीसी रिसॉर्ट हे औरंगाबाद शहरा मध्ये आहे.
पर्यटन मार्गदर्शक माहिती
भेट देण्याचे नियम आणि वेळ
भेट देण्यासाठी उत्तम महिना
इथे भेट देण्याचा आदर्श काळ हा ऑक्टोबर तो मार्च हा आहे.
या भागात बोलली जाणारी भाषा
इंग्रजी, हिन्दी, मराठी.
Gallery
How to get there

By Road
जायकवाडी धरण हे रस्त्याने जोडलेले आहे. अहमदनगर ८८ किमी ( २ तास ९ मिनिट), सोलापूर २७२ किमी (४ तास ४५ मिनिट), बीड ८७ किमी ( १ तास ४७ मिनिट ) या शहरातून राज्य परिवहन मंडळ, खाजगी गाड्या आणि लक्झरी बस उपलब्ध आहेत.

By Rail
औरंगाबाद विमानतळ ५८ किमी (१ तास ३६ मि)

By Air
औरंगाबाद रेल्वे स्टेशन ५९ किमी (१ तास १३ मि)
Near by Attractions
Tour Package
Where to Stay
Tour Operators
MobileNo :
Mail ID :
Tourist Guides
No info available
Subscription
आमचा पत्ता
पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र
१५ मजला, नरिमन भवन,
नरिमन पॉइंट, मुंबई ४०००२१
connect.dot-mh@gov.in
०२२-६९१०७६००
द्रुत दुवे
QR कोड वापरून मोबाइल अॅप डाउनलोड करा

Android

iOS