• स्क्रीन रीडर प्रवेश
  • A-AA+
  • NotificationWeb

    Title should not be more than 100 characters.


    0

Asset Publisher

जुहू

भारतातील महाराष्ट्रातील मुंबईचे उपनगर जुहू हे पश्चिम समुद्र किनारपट्टीवर आहे. जुहू हे मुंबई शहरातील अत्यंत श्रीमंत भागातील एक आहे. तेथे सिनेसृष्टीतील अनेक कलाकार राहतात.

जिल्हा/प्रांत  

मुंबई उपनगर, महाराष्ट्र, भारत 

इतिहास

१९ व्या शतकात जुहू हे एक बेट होते. तो एक समुद्र सपाटी वर आलेला वाळूचा अरुंद आणि साधारण २ मीटर उंच असा पट्टा होता. तो सालसेटच्या पश्चिमेला होता.

नंतर तो दुरुस्त करून मुंबईच्या प्रमुख भूमीला जोडला गेला. येथे भारताचं पहिला नागरी उड्डाण विमानतळ १८२८ मध्ये स्थापन केला गेला. वार्षिक गणेश विसर्जन समारंभासाठी हा समुद्र किनारा लोकप्रिय आहे. या विशाल मिरवणुकीत गणेश देवाच्या विविध आकारातील मूर्ति घेऊन हजारो भक्त त्यांचे समुद्रात विसर्जन करण्यासाठी सामील होतात.

भूगोल         

महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर मालाड खाडी आणि मिठी नदीच्या मध्ये अरबी समुद्राच्या किनार्‍यावर आहे. त्याच्या उत्तरेला वर्सोवा किनारा आहे.

         

हवामान       

या भागातील हवामान सामन्यात: पावसाळी असते.

कोकण पट्ट्यातच पाऊस जास्त असतो, साधारण २५०० मिमी ते ४५०० मिमी) आणि हवामान उबदार दमट असते. मौसमामध्ये तापमान ३० अंश से. पर्यन्त जाते.

उन्हाळा उष्ण आणि दमट असतो. त्यावेळी तापमान ४० अंश से पर्यन्त असते.

हिवाळ्यातील हवामान तुलनेने मध्यम असते.

( २८ अंश से पर्यन्त सुमारे ) हा मौसम थंड आणि कोरडा असते.

         

करण्याजोग्या गोष्टी  

जलक्रीडा उपक्रमांसाठी जुहू किनारा प्रसिद्धा आहे जसे की बनाना बोट राईड्स, जेट स्कीइंग, पॅरॅसेलिंग, बंपर बोट, फ्लाय फिशिंग राईड्स इत्यादी. 

किनार्‍याच्या उत्तर टोकाला गांधी ग्राम आहे. येथे मुले बास्केट बॉल, असे खेळ खेळू शकतात. जुहू बीचवर घोडेस्वारी, उंटसवारी अशा उत्सुकतापूर्ण गोष्टीही उपलब्ध आहेत. येथे येणारे लोक जॉगिंग, दोरीच्या उड्या, सायकलिंग, योगा, इत्यादि  गोष्टीही करतात.  

नजीकची पर्यटन स्थळे      

●        इस्कोन मंदिर : यालाच हरे राम, हरे कृष्ण मंदिरही म्हणतात. ही सुंदर संगमरवरी रचना आहे.  यांत प्रवचने आणि प्रार्थनेसाठी अनेक सभागृहे आहेत.

●        चित्र नगरी : ही जागा जुहू किनार्यापासून १४. २ किमी अंतरावर आहे. मुंबईतील गोरेगावच्या पूर्वभागत ही आहे. ह्या ठिकाणालाच दादासाहेब फाळके चित्रनगरी असेही म्हणतात. सिंनेसृष्टीतील अनेक चित्रपटांचे चित्रीकरण करताना येथील स्टुडिओ, साधने, रंगमंच, रेकॉर्डिंग रूम्स ही वापरण्यात येतात.

●        श्री. सिद्धिविनायक मंदिर : हे गणेश मंदिर प्रभादेवी भागात असून जुहू किनार्याच्या दक्षिणेला १६ किमी अंतरावर आहे. मुंबईतील संपन्न देवळांपैकी हे एक आहे. साधारणत: १८ व्या शतकात हे बांधले गेले.

●        पवई तलाव : जुहू किनार्यापासून १५ किमी अंतरावर हा तलाव आहे. ब्रिटीशांनी बांधलेले हे कृत्रिम तळे आहे. बदके, खंड्या पक्षी,आणि फल्कन पक्षी नेहमी येथे येतात.

●        संजय गांधी राष्ट्रीय उद्यान :  हे शांत असे राष्ट्रीय उद्यान जुहू किनार्यापासून साधारणत: १९ किमी अंतरावर आहे. विशेष लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे ते मुंबईकरांचे वीक एंड घालवण्याचे ठिकाण आहे. या उद्यानात अनेक महत्वपूर्ण प्राणी, पक्षी, फुलपाखरे आहेत.

पर्यटन स्थळी कसे जावे, (रेल्वे, विमान, बस)

  • अंतर आणि वेळ यासह  रस्त्याने आणि रेल्वेने जुहुला जाता येते यासाठी बेस्ट बसेस आणि टॅक्सीही मिळतात.
  • जवळचे विमानतळ – छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ मुंबई – ५५ किमी अंतरावर.
  • जवळचे रेल्वे स्टेशन – विलेपार्ले २. ९ किमी अंतरावर.

खास खाद्य पदार्थ आणि हॉटेल     

येथे स्थानिक खाद्याची दुकाने आणि स्थानिक पदार्थही मिळतात उदा. पाणीपुरी, भेलपुरी, पावभाजी, त्याच बरोबर दक्षिणात्य आणि चायनीज पदार्थही उपलब्ध आहेत.

हॉटेल हॉस्पिटल, पोस्ट ऑफिस, पोलिस स्टेशन यांच्या सुविधा

  • जुहू किनार्या भोवती अनेक हॉटेल्स आहेत.
  • किनार्या जवळच हॉस्पिटल्स आहेत.
  • नजीकचे पोस्ट ऑफिस १. ६ किमी वर आहे.
  • तरतोड पोलिस स्टेशन ०. ७५ किमी वर आहे.

         

एमटीडीसी चे जवळचे रिसॉर्ट       

खारघर येथे एमटीडीसी चे रिसॉर्ट आहे.

भेट देण्याचे नियम आणि भेट देण्यास उत्तम महिना

या जागी वर्षभर जाता येते. ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा कालावधी जुहू बीचवर जाण्यास योग्य आहे. मुंबईच्या मुसळधार पावसाळयामुळे त्यावेळी तेथे मोठी भरती येते. म्हणून यावेळी जाणे धोकादायक असते. उन्हाळा खूप गरम असतो म्हणून सकाळी लवकर किंवा संध्याकाळी जाणे चांगले.

या भागात बोलल्या जाणार्‍या भाषा         

इंग्रजी, हिन्दी, मराठी