• स्क्रीन रीडर प्रवेश
  • A-AA+
  • NotificationWeb

    Title should not be more than 100 characters.


    0

Asset Publisher

कंधार किल्ला

३-४ ओळींमध्ये पर्यटकांचे गंतव्यस्थान / ठिकाणाचे नाव आणि ठिकाणाविषयीचे थोडक्यात वर्णन

कंधार किल्ला डोंगरांनी वेढलेला मन्याड नदीच्या काठावर वसलेला आहे. कंधार, पूर्वी हे ठिकाण कंधरपूर म्हणून ओळखले जायचे. इतिहासाचा उल्लेख पहिला तर हे दहाव्या शतकात राष्ट्रकूट राजवंशाची दुसरी राजधानी होती.

जिल्हे/प्रदेश

नांदेड जिल्हा, महाराष्ट्र, भारत

इतिहास

कंधार शहर हे संपूर्ण डोंगरांनी वेढलेले आहे. राष्ट्रकूट काळापासून ते हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मांचा समावेश असलेल्या बहुसांस्कृतिक वस्तीसाठी हे उल्लेखनीय स्थान मानले जाते. पूर्वीच्या काळात, कंधारला 'कंधारपूर' म्हणून ओळखले जात असे. कंधार आणि परिसराचा जिल्हा असंख्य राजवंश आणि राज्यांनी सांभाळला आहे, ज्यात राष्ट्रकूट, वारंगलचे काकतीय, देवगिरीचे यादव, दिल्ली सल्तनत, बहामनी साम्राज्य, अहमदनगरचे निजामशाह आणि शेवटी हैदराबादचे निजाम ह्यांची इतिहासात नोंद आहे.

या किल्ल्याचे बांधकाम राष्ट्रकूट राजा तिसरा कृष्ण याने दहाव्या शतकात सुरू केले होते आणि हा संपूर्ण किल्ला मन्याड नदीच्या काठावर उभारला होता. नंतरच्या काळातील सर्व राजवंशांनी किल्ल्यामध्ये त्यांची रचना जोडली आणि १८४० पर्यंत ते सातत्याने किल्ल्याच्या बांधकामात भर पडत राहिली.

किल्ल्यातील सर्वात मजबूत बांधकाम म्हणजे यादव काळापासून चालत आलेला वारसा आहे. किल्ल्याच्या प्राथमिक दरवाजावर मुहम्मद तुघलक (१३२५-१३५१) ची पर्शियन खोदकाम आढळतात.  तेराव्या शतकानंतर बहामनी सुलतान काही काळ कंधारचा कारभारी राहिला.किल्ल्याला एक अनोखी बहुस्तरीय संरक्षण व्यवस्था होती जी शतकांपासून किल्ल्याला सुरक्षित ठेवत होती.

कंधार किल्ल्याची स्वतःची एक आख्यायिका आहे जी ह्या किल्ल्याला महाभारताशी जोडते. कंधारचे पूर्वीचे नाव पंचालपुरी असून पांडवांचा द्रौपदीबरोबर विवाह याच स्थळी झाला अशी आख्यायिका आहे.कंधार जवळच्या दरीला अन्यथा पांडवदरा म्हणतात. कंधार किल्ल्याची व्यापलेली गावे पुरातत्व अवशेषांनी समृद्ध आहेत. परिसरात सापडलेल्या विविध कलाकृती आजहि किल्ल्यात ठेवलेल्या आहेत. यामध्ये भगवान गणेश, जैन देवता इत्यादींच्या प्रतिमांचा समावेश आहे सर्वात महत्वाचे म्हणजे क्षेत्रपाल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका संरक्षक देवाच्या विशाल प्रतिमेचे उर्वरित भाग इथे आहेत, जे संभाव्यतः ६० फूट उंच होते..

भूगोल

कंधार किल्ला डेक्कन प्रदेशात मन्याद नदीच्या काठावर स्तिथ एक भुईकोट किल्ला आहे.

हवामान/हवामान

इथलं उन्हाळी वातावरण, हिवाळा आणि पावसाळ्या पेक्षा अधिक तीव्र असतो, ज्याचे तापमान ४०. ५ अंश सेल्सिअस पर्यंत असते.

हिवाळा सौम्य असतो आणि सरासरी तापमान २८-३० अंश सेल्सिअस पर्यंत बदलते.

मान्सून मौसमात अत्यंत हंगामी फरक असतो आणि इथे वार्षिक पाऊस सुमारे ७२६ मिमी पडतो.

करण्याच्या गोष्टी

गडावर भेट देण्याची इतर काही ठिकाणे:

१- लाल महाल

२- दरबार महल

३- कारंज्यांसह एक सुंदर जल स्तोत्र.

४- अरबी आणि फारसी शिलालेख

५- मशीद-ई-ईके-खाना

जवळचे पर्यटन स्थळ

१- जगत्तुंग सागर (३. २ किमी)

२- सुनेगाव तलाव (१५. ६ किमी)

३- देवपूर धरण (४३. ८ किमी)

४- आसना नदी (४६. ७ किमी)

अंतर आणि आवश्यक वेळेसह रेल्वे, हवाई, रस्ता (ट्रेन, फ्लाइट, बस) ने पर्यटनस्थळी कसे जायचे

हवाई मार्गाने: नांदेड विमानतळ सर्वात जवळचे आहे जे (४९ किमी) अनंतरवर आहे.

रेल्वेने: नांदेड-वाघाळा रेल्वे स्थानक (४५ किमी) अंतरावर आहे.

रस्त्याने: रेल्वे स्थानकावरून लोकल बस उपलब्ध आहेत

खास खाद्यपदार्थ आणि हॉटेल

हे ठिकाण निरनिरळ्या व्यंजनांचा बाबतीत इतके लोकप्रिय होण्याचे कारण म्हणजे हे शहर हिंदू, शीख, मुस्लिम, जैन आणि बौद्ध अशा 5 वेगवेगळ्या समुदायांच्या वसले आहे. त्याचे काही प्रसिद्ध पदार्थ:

टिहरी, बिर्याणी, शेक्स

मिष्टान्न: इमर्ती (जलेबी सारखी गोड)

निवास सुविधा जवळपास आणि हॉटेल/ हॉस्पिटल/ पोस्ट ऑफिस/ पोलिस स्टेशन

कंधार येथे अनेक स्थानिक रेस्टॉरंट्स उपलब्ध आहेत.

कंधार येथे अनेक उत्तम हॉटेल्स ची सुविधा उपलब्ध आहे.

जवळचे पोस्ट ऑफिस: कंधार पोस्ट ऑफिस.

ग्रामीण रुग्णालय, कंधार (१. ५ किमी )

जवळचे पोलीस स्टेशन: कंधार पोलीस स्टेशन (१. ४ किमी)

भेट देण्याचा नियम आणि वेळ, भेट देण्यासाठी सर्वोत्तम महिना

कंधारला भेट देण्यासाठी सर्वोत्तम महिने सप्टेंबर - फेब्रुवारी हे योग्य हवामानासह मानले जातात.

कंधारचे सर्वात उष्ण आणि वादळी वातावरण असलेले महिने म्हणजे एप्रिल, मे आणि जून आहेत.

परिसरात बोलली जाणारी भाषा

इंग्रजी, हिंदी आणि मराठी.