• A-AA+
  • NotificationWeb

    Title should not be more than 100 characters.


    0

WeatherBannerWeb

Asset Publisher

About काशिद

काशिद हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर आहे. कोकण विभागातील सर्वात सुरक्षित समुद्रकिनाऱ्यांपैकी एक. इथे पांढरी वाळू असलेला सुंदर समुद्रकिनारा आणि पर्यटकांना सर्वाधिक आकर्षित करणारी सुरूची झाडे आहेत.

जिल्हा/विभाग :

रायगड जिल्हा, महाराष्ट्र, भारत.

इतिहास  :

काशिद हे महाराष्ट्राच्या कोकण भागातली एक किनारपट्टी आहे जिच्या एका बाजूला सह्याद्री पर्वत आणि दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र आहे.

भूगोल :

काशिद हे महाराष्ट्राच्या कोकण भागात स्थित एक किनारपट्टी ठिकाण आहे ज्याच्या पूर्वेला सह्याद्री पर्वत आणि पश्चिमेस अरबी समुद्र आहे. हे अलिबाग शहराच्या दक्षिणेस ३२ किमी, मुंबईपासून १२६ किमी आणि पुण्यापासून १७८ किमी दूर आहे.

हवामान :

या प्रदेशातील मुख्य ऋतू म्हणजे पावसाळा. कोकण किनारपट्टीत मुख्यतः जास्त पाऊस (सुमारे २५०० मिमी ते ४५०० मिमी) अनुभवायला मिळतो आणि हवामान दमट आणि उबदार असते. पावसाळ्यात तापमान ३० अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.

उन्हाळा गरम आणि दमट असतो आणि तापमान ४० अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.

इथे हिवाळ्यात तुलनेने सौम्य हवामान (सुमारे २८ अंश सेल्सिअस) असते आणि हवामान थंड आणि कोरडे असते.
 

करण्यासारख्या गोष्टी  :

काशिद हे पॅरासेलिंग, बनाना बोट राईड्स, जेट-स्कीइंग, सर्फिंग इत्यादी जल क्रीडांसाठी प्रसिद्ध आहे. घोडा, बग्गी आणि उंटांच्या सावरीचा आनंद इथे लुटता येतो. हे ठिकाण कॅम्पिंग तसेच मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे.

जवळची पर्यटनस्थळे :

काशिदसह खालील पर्यटन स्थळांना भेट देण्याची योजना आपण करू शकता.

मुरुड जंजिरा किल्ला: सिद्दींचे १७ व्या शतकातील बंदर.
फणसाड पक्षी अभयारण्य: रेवदंडा-मुरुड रस्त्यामार्गे काशीदपासून १२.६ किलोमीटर अंतरावर आहे.
रेवदंडा किनारा आणि किल्ला: काशीदच्या उत्तरेस १५ किमी अंतरावर वसलेले हे ठिकाण पोर्तुगीज किल्ला आणि समुद्र किनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे.
कोरलाई किल्ला: काशीद समुद्रकिनाऱ्याच्या उत्तरेस १२ किमी अंतरावर आहे. पोर्तुगीजांनी बांधलेल्या प्रचंड किल्ल्यांपैकी हा एक जिथे सात हजार घोडे सामावू शकतात. 
दत्त मंदिर: काशिदपासून १८ किमी अंतरावर एका टेकडीच्या शिखरावर हे मंदिर आहे. इथे रस्त्याने जाता येते पण काही पर्यटक ट्रेकिंगला प्राधान्य देतात. या टेकडीवरून सूर्यास्ताचे दृश्य विलोभनीय दिसते. 
 

रेल्वेने, विमानाने आणि रस्त्याने (ट्रेन, विमान, बस) तसेच ठराविक वेळेत पर्यटन स्थळावर कसे पोहोचावे :

काशिदला रस्ते, रेल्वे तसेच जलमार्गाने जाता येते. हे राष्ट्रीय महामार्ग ६६ (NH 66), मुंबई गोवा महामार्गाशी जोडलेले आहे. राज्य परिवहनाच्या बसेस आणि कॅब मुंबईपासून काशिद पर्यंत उपलब्ध आहेत.

गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा या फेरी देखील उपलब्ध आहेत. मांडवा येथून काशीदला लोकल वाहतूक उपलब्ध आहे.

जवळचे विमानतळ: छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ मुंबई १३४ किमी

जवळचे रेल्वे स्टेशन: रोहा ५१ किमी
 

खाद्य वैशिष्ट्य आणि हॉटेल्स :

महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात असल्याने समुद्री अन्न पदार्थ (सी-फुड) हे येथील वैशिष्ट्य आहे. तथापि, पर्यटकांनी सर्वाधिक भेट दिलेल्या पर्यटन स्थळांपैकी एक आहे, शिवाय ते मुंबई आणि गोव्याशी जोडलेले आहे, येथील रेस्टॉरंट्समध्ये विविध प्रकारच्या पाककृती उपलब्ध असतात. 

जवळच्या निवास सुविधा आणि हॉटेल/ हॉस्पिटल/ पोस्ट ऑफिस/पोलीस स्टेशन  :

काशिदच्या आसपास अनेक हॉटेल्स आणि होमस्टे उपलब्ध आहेत.

सर्वात जवळची रुग्णालये अलिबागमध्ये आहेत.

जवळचे पोस्ट ऑफिस माझगाव येथे ९.१ किमी अंतरावर आहे.

जवळचे पोलीस स्टेशन रेवदंडा येथे ९.१ किमी अंतरावर आहे.
 

जवळपासचे एमटीडीसी रिसॉर्ट :

एमटीडीसी कॉटेज, फार्महाउस आणि रिसॉर्ट अलिबागमध्ये उपलब्ध आहेत

पर्यटनासाठीचे नियम आणि वेळ, पर्यटनासाठी योग्य काळ  :

हे ठिकाण पर्यटनासाठी वर्षभर उपलब्ध आहे. या ठिकाणास भेट देण्याची उत्तम वेळ ऑक्टोबर ते मार्च पर्यंत आहे. 

जून ते ऑक्टोबर पर्यंत इथे भरपूर पाऊस असतो आणि उन्हाळा गरम आणि दमट असतो.

पर्यटकांनी समुद्रात प्रवेश करण्यापूर्वी भरती आणि ओहोटीच्या वेळ तपासून मगच समुद्रात जावे.

पावसाळ्यात समुद्राला येणारी भरती धोकादायक असू शकते म्हणून याकाळात समुद्रात जाणे टाळले पाहिजे.
 

या ठिकाणी बोलल्या जाणाऱ्या भाषा :

इंग्रजी, हिंदी, मराठी, उर्दू


Tour Package

Hotel Image
Blue Diamond Short Break Bustling Metropolis

2N 1Day

Book by:

MTDC Blue Diamond

Where to Stay

No Hotels available!


Tourist Guides

No info available