केळवे - DOT-Maharashtra Tourism
Breadcrumb
Asset Publisher
केळवे
केळवे हे महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील पालघर तालुक्यात वसलेले एक किनारपट्टीचे शहर आहे. हे ठिकाण त्याच्या लांब किनारपट्टीसाठी ओळखले जाते. हे मुंबईतील पर्यटकांसाठी शनिवार रविवारची सुट्टी घालविण्याचे एक लोकप्रिय ठिकाण आहे.
जिल्हा/विभाग
पालघर जिल्हा, महाराष्ट्र, भारत
ऐतिहासिक माहिती
केळवे हे अज्ञात असलेल्या पर्यटन स्थळांपैकी एक आहे आणि. हे ठिकाण पर्यटन स्थळ म्हणून विकसित झालेले नसल्यामुळे आठवड्याच्या दिवसांमध्ये खूप कमी पर्यटक या ठिकाणी भेट देतात. जर तुम्हाला तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून थोडी शांतता हवी असेल तर हे भेट देण्याचे सर्वोत्तम ठिकाण आहे. मुंबई आसपासच्या ठिकाणापैकी विश्रांतीसाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे आणि सकाळी लवकर आणि सूर्यास्ताच्या वेळी ते अधिक आनंददायी असते. झाडांच्या पानांची सळसळ आणि आणि समुद्राच्या लाटांची लय ऐकू येते. शनिवार व रविवार दरम्यान या ठिकाणाला मुंबईकर भेट देतात.
भौगोलिक माहिती
केळवे हे निळ्या अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरील फुटकी खाडी आणि केळवे खाडी दरम्यान महाराष्ट्राच्या कोकण भागात स्थित एक किनारपट्टी ठिकाण आहे. हे मुंबईच्या उत्तरेस १०४ किलोमीटर आणि दमणच्या दक्षिणेस १२० किलोमीटर अंतरावर आहे. समुद्र किनाऱ्यावर सुरूची (कॅसुरीना) झाडे आहेत.
हवामान
या प्रदेशातील मुख्य ऋतू म्हणजे पावसाळा. कोकण किनारपट्टीत मुख्यतः जास्त पाऊस (सुमारे २५०० मिमी ते ४५०० मिमी) अनुभवायला मिळतो आणि हवामान दमट आणि उबदार असते. पावसाळ्यात तापमान ३० अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.
उन्हाळा गरम आणि दमट असतो आणि तापमान ४० अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.
इथे हिवाळ्यात तुलनेने सौम्य हवामान (सुमारे २८ अंश सेल्सिअस) असते आणि हवामान थंड आणि कोरडे असते.
करण्यासारख्या गोष्टी
- समुद्रकिनाऱ्याची शांतता त्याच्या सौंदर्यात भर घालते. सूर्यास्ताच्या वेळी सोनेरी वाळूत चालणे पर्यटकांना एक सुंदर अनुभव देते.
- समुद्रकिनारी नुसतेच बसून समुद्राचे सौंदर्य न्याहाळता येते.
- पोहणे, सूर्यस्नान करणे, उंटस्वारी, घोडेगाडी चालवणे, मोटरस्वारी, नौकाविहार इत्यादी पर्याय इथे उपलब्ध आहेत.
जवळची पर्यटनस्थळे
केळवे सोबत खालील पर्यटन स्थळांना भेट देण्याची योजना आपण करू शकता
- शितलादेवी मंदिर: केळवे समुद्रकिनाऱ्याच्या पूर्वेला ०.४ किलोमीटर अंतरावर आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी जीर्णोद्धार केलेले हे प्राचीन मंदिर आहे.
- केळवे किल्ला: केळवे किनाऱ्याच्या दक्षिणेस २.२ किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला १६ व्या शतकादरम्यान पोर्तुगीजांनी बांधला होता आणि त्याचा छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरही केला होता.
- केळवा धरण: केळवेपासून ११.८ किलोमीटर अंतरावर असलेले हे धरण त्याच्या शांत परिसरासाठी प्रसिद्ध आहे. पावसाळ्याच्या काळात अनेक लोक या निसर्गरम्य सौंदर्याचे साक्षीदार म्हणून भेट देतात.
- दंडा खाडी पूल: केळवे समुद्रकिनाऱ्यापासून २ किमी अंतरावर आहे. पर्यटक येथे बसून समुद्राच्या सुंदर दृश्याचा आनंद घेता यावा यासाठी इथे येतात.
- आशापुरी आणि शिवमंदिर: केळवे समुद्रकिनाऱ्यापासून १२ किमी दूर स्थित हे मंदिर समुद्रात आहे आणि आशापुरी देवी गुहेत वसलेली आहे.
रेल्वेने, विमानाने आणि रस्त्याने (ट्रेन, विमान, बस) तसेच ठराविक वेळेत पर्यटन स्थळावर कसे पोहोचावे
- केळवे रस्ते आणि रेल्वेने जाता येते. राष्ट्रीय महामार्ग ८ (NH 8), मुंबई अहमदाबाद महामार्गाशी जोडलेले आहे. हे मुंबईपासून १०४ किमी अंतरावर आहे, या ठिकाणी जाण्यासाठी कार भाड्याने घेता येते.
- जवळचे विमानतळ: छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ मुंबई १४५ किमी
- जवळचे रेल्वे स्टेशन: पालघर १४.४ किमी
खाद्य वैशिष्ट्य आणि हॉटेल्स
महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात असल्याने समुद्री पदार्थ (सी-फुड) आणि पारशी पदार्थ हे येथील वैशिष्ट्य आहे. तथापि, हे सर्वात भेट दिलेल्या पर्यटन स्थळांपैकी एक आहे आणि मुंबईशी जोडलेले आहे, येथील रेस्टॉरंट्स विविध प्रकारच्या पाककृती देतात.
जवळच्या निवास सुविधा आणि हॉटेल/ हॉस्पिटल/ पोस्ट ऑफिस/पोलीस स्टेशन
- केळवे मध्ये अनेक हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स उपलब्ध आहेत. निवास व न्याहरी सारखे उत्तम पर्याय देखील इथे उपलब्ध आहेत
- रुग्णालये मनोरमध्ये, जी केळवेपासून ११ किलोमीटर अंतरावर आहेत.
- पोस्ट ऑफिस समुद्रकिनाऱ्यापासून १.५ किमी अंतरावर आहे.
- जवळचे पोलीस स्टेशन समुद्रकिनाऱ्यापासून ०.५ किमी अंतरावर आहे.
जवळपासचे एमटीडीसी रिसॉर्ट
एमटीडीसी (MTDC) रिसॉर्ट केळवा बीच वर उपलब्ध नाही.
पर्यटनासाठीचे नियम आणि वेळ, पर्यटनासाठी योग्य काळ
- हे ठिकाण पर्यटनासाठी वर्षभर उपलब्ध आहे. या ठिकाणास भेट देण्याची उत्तम वेळ ऑक्टोबर ते मार्च पर्यंत आहे.
- जून ते ऑक्टोबर पर्यंत इथे भरपूर पाऊस असतो आणि उन्हाळा गरम आणि दमट असतो.
- पर्यटकांनी समुद्रात प्रवेश करण्यापूर्वी भरती आणि ओहोटीच्या वेळ तपासून मगच समुद्रात जावे.
- पावसाळ्यात समुद्राला येणारी भरती धोकादायक असू शकते म्हणून याकाळात समुद्रात जाणे टाळले पाहिजे.
या ठिकाणी बोलल्या जाणाऱ्या भाषा
इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती
Gallery
How to get there

By Road
Kelwe is accessible by road and rail. It is connected to the NH 8, Mumbai Ahmedabad highway. It is situated 104 KM away from Mumbai, one can hire cars to reach this place.

By Rail
Nearest Railway Station: Palghar 14.4 KM

By Air
Nearest Airport: Chhatrapati Shivaji Maharaj Airport Mumbai 145 KM
Near by Attractions
Tour Package
Where to Stay
Tour Operators
MobileNo :
Mail ID :
Tourist Guides
No info available
Subscription
आमचा पत्ता
पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र
१५ मजला, नरिमन भवन,
नरिमन पॉइंट, मुंबई ४०००२१
connect.dot-mh@gov.in
०२२-६९१०७६००
द्रुत दुवे
QR कोड वापरून मोबाइल अॅप डाउनलोड करा

Android

iOS