• स्क्रीन रीडर प्रवेश
  • A-AA+
  • NotificationWeb

    Title should not be more than 100 characters.


    0

Asset Publisher

खिंडसी तलाव

नागपुर जिल्हात रामटेक शहाराजवळ खिंडसी हा तलाव आहे. हा मध्य भारतातील सगळ्यात मोठे बोटिंग केंद्र आणि करमणुकीचे उद्यान म्हणून ओळखला जातो. असंख्य पर्यटक तलावाला भेट देतात. इथे अनेक उपक्रम चालतात जसे की बोटिंग, जलक्रीडा इत्यादि आणि इथे एक रिसॉर्ट देखील आहे. 

जिल्हा/प्रदेश    
नागपुर जिल्हा , महाराष्ट्र , भारत.  

इतिहास     
.रामटेक सिंचन प्रकल्प स्थानिक पातळीवर आणि “खिंडसी तलाव” म्हणून प्रसिद्धा आहे. त्याचे अधिकृत नाव “रामटेक डी ०१११०३” असे आहे. ब्रिटिश सरकारने १९२३ साली सिंचनाच गरज पूर्ण करण्यासाठी रामटेक धरण बांधले होते. हे महाराष्ट्रातील रामटेक तालुक्यातील सुर नदीवरील धरण आहे. हे धरण हे मातीचे धरण आहे.  

भूगोल     
खिंडसी हा चारीही बाजूंनी घनदाट जंगलांनी वेढलेला विस्तीर्ण आणि विशाल तलाव आहे, तो रामटेक पासून  सुमारे ३.५ किमी वर आणि नागपूरपासून ५३ किमी अंतरावर आहे. हा पेंच राष्ट्रीय अभयारण्याच्या दक्षिणेस आहे. 

वातावरण/हवामान 
हा प्रदेश बर्‍याच अंशी वर्षभर कोरडा असतो, आणि उन्हाळा तीव्र असतो. उन्हाळ्यातील तापमान हे सुमारे ३०-४० अंश सेल्सियस पर्यन्त असते. 
हिवाळ्यात तापमान १० अंश सेल्सियस पर्यन्त उतरते. 
या भागातील वार्षिक पर्जन्यमान हे सुमारे १०६४.१ मिमी एवढे असते. 

काय काय करू शकता      
पर्यटक तलावाशी सूर्यास्त पाहू शकतात. संत्र्याच्या फळबाग दौर्‍यावर जाऊ शकतात. निसर्गरम्य सौंदर्‍यामुळे हे अनेक पर्यटकांना आकर्षित करते आणि हा एक सुंदर पिकनिक स्पॉट पण आहे.   

पर्यटन स्थळे/ जागा यांची नावे आणि स्थळांचे थोडक्यात ३-४ ओळींमध्ये वर्णन 
●वाकी वुड्स :-  नागपुर पासून सुमारे ३० किमी अंतरावर वाकी वुड्स हे आवर्जून भेट देण्याजोगे ठिकाण आहे. या सुंदर ठिकाणी धनुर्विद्या, बोटिंग , ट्रेकिंग,  तसेच फोटोग्राफी हे उपक्रम करता येतात. 
●रामटेक किल्ल्यातील मंदिर : शहारच्या गर्दीपासून दूर डोंगर माथ्यावर असलेले हे मदिर त्याच्या समृद्ध पोरणिक इतिहासासाठी लोकप्रिय आहे. असे मानले जाते की लंकेला जाताना भगवान रामाने या मंदिरात विश्रांति घेतली म्हणून या मंदिराला धार्मिक महत्व आहे.  
●अंबाझरी तलाव :- नागपुर शहरातील अकरा तलावांपैकी अंबझरी हा सगळ्यात मोठा आहे. पर्यटकांमध्ये लोकप्रिय पर्यटन स्थलांपैकी एक आहे आणि रॉ बोट्स आणि पॅडल बोट बोटिंग सारख्या मनोरंजनात्मक उपक्रमांसाठी ओळखला जातो. 
●अक्षरधाम मंदिर : स्वामिनारायण मंदिर किंवा अक्षरधाम मंदिर नागपुरातील रिंग रोडवर आहे. नव्याने बांधलेल्या या मंदिरामध्ये विशाल स्वयंपाकघर, पार्किंग, रेस्टोरंट, आणि लहान मुलांचे खेळण्याचे क्षेत्र देखील आहे. मंदिर लाईटिंग असताना अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसते, संध्यकाळच्या वेळी या मंदिराला आवश्य भेट दिली पाहिजे. 
●रामन विज्ञान केंद्र :- रामन विज्ञान केंद्र हे नागपुरातील इंटरक्टिव्ह विज्ञान केंद्र आहे, जे मुंबईच्या नेहरू विज्ञान केंद्राशी संलग्न आहे आणि जे सामान्य माणसा मध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन वाढविण्यासाठी विकसित केलेलं आहे. ७ मार्च १९९२ रोजी या केंद्राची स्थापना करण्यात आली, भारताचे नोबेल परितोषिक विजेते चन्द्रशेखर वेंकट रामन यांच्या नावावरून हे नाव देण्यात आले. 
●बोहरा मशीद :- मुख्यात: दाऊदी बोहरा समजतर्फे पूजा केली जाते. स्थापत्य कलेचा अद्भुत नमुना आहे, याचा वापर सामुदायिक मेळावे आणि विवाह सोहळ्यांसाठी होतो. 
या पर्यटन स्थळावर रेल्वे, हवाई, रस्ता ( ट्रेन, विमान, बस) मार्गे कसे जायचे, अंतर आणि लागणार्‍या वेळासह हे मुंबईशी एनएच ४८ या महामार्गाने जोडलेले आहे. नागपुर ५१ किमी (१ तास २५ मिनिट ), भंडारा ५२ किमी ( १ तास १४ मिनिट), चंद्रपुर २०७ किमी (३ तास ५० मिनिटे ) या शहरांपासून राज्य परिवहन मंडळ, खाजगी गाड्या आणि लक्झरी उपलब्ध आहेत. 
जवळचे विमानतळ :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ५८.६ किमी ( १ तास ३५ मिनिट) . 
जवळचे रेल्वे स्टेशन : नागपुर जंक्शन रेल्वे स्टेशन ५५ किमी ( १ तास २२ मिनिटे)

विशेष अन्नपदार्थ वैशिष्ट्य आणि हॉटेल     
भाजी, वडा, मिसळ पाव, साबुदाणा खिचडी, पोहे, उपमा, शिरा, आणि पाणी पुरी यासह विविध प्रकारचे स्नॅक्स इथे उपलब्ध आहेत. सावजी पाककृती विदर्भात प्रसिद्ध आहे आणि जवळील रेस्टोरंट यातील उत्कृष्ट पदार्थ देतात.  

जवळील राहण्याच्या व्यवस्था आणि हॉटेल/हॉस्पिटल/पोस्ट ऑफिस/पोलिस स्टेशन   

 खिंडसी तलावाजवळ अनेक हॉटेल आणि विश्रामगृह उपलब्ध आहेत. 
३.४ किमी वर रामटेक ला हॉस्पिटल्स आहेत. 
जवळचे पोस्ट ऑफिस ३.३ किमी वर रामटेकला आहे. 
जवळचे पोलिस स्टेशन ३.२ किमी वर रामटेक ला उपलब्ध आहे.  

जवळच्या एमटीडीसी रिसॉर्टचा तपशील     
एमटीडीसी रिसॉर्ट नागपुरला आहे. 
  
पर्यटन मार्गदर्शक माहिती 
    
भेट देण्याचे नियम आणि वेळ 
भेट देण्यासाठी उत्तम महिना 

    
नागपूरला भेट देण्याचा उत्तम काळ म्हणजे ऑक्टोबर ते मार्च महिना. डिसेंबर ते जानेवारी मध्ये तापमान १० अंश सेल्सियस पर्यन्त असते ज्यामुळे हिवाळा सुखद असतो. नागपूरला भेट देण्याचा हा सर्वोत्तम काळ आहे. जुलै ते सप्टेंबर पावसाळ्यात माध्यम ते जोरात पाऊस असतो. हे दररोज सकाळी १० ते संध्याकाळी ६.३० उघडे राहते. 

या भागात बोलली जाणारी भाषा     
इंग्रजी, हिन्दी, मराठी.