• Screen Reader Access
  • A-AA+
  • NotificationWeb

    Title should not be more than 100 characters.


    0

Asset Publisher

कोपेश्वर मंदिर

खिद्रापूर गावाजवळील कोपेश्वर मंदिर हे पश्चिम भारतातील मंदिर स्थापत्य कलाकृतींपैकी एक उत्कृष्ट नमुना मानले जाते. मंदिर खडकांचा वापर करून बांधले गेले आहे, त्यात काही उत्कृष्ट कोरीव खांब, पटल आणि छत आहेत जे मंदिराला रेखीव बनवतात.
जिल्हा/विभाग    

कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र, भारत.

ऐतिहासिक माहिती    
कोपेश्वर मंदिर १२ व्या शतकातील शिलाहाराच्या कलाकृतींपैकी एक उत्कृष्ट नमुना आहे. खिद्रापूर गावाजवळ हे मंदिर आहे. मंदिराची अधोसंरचना पूर्णपणे जीर्ण आणि खराब झाल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी मंदिराचा जीर्णोद्धार केली.
मंदिराच्या चौथऱ्यावर दगडात कोरलेले हत्ती आहेत आणि ते त्यांच्या पाठीवर मंदिराला धरून आहेत. हे हत्ती दागिन्यांनी सुशोभित केलेले आहेत. या हत्तींवर स्वार असलेल्या अनेक आकृत्या दाखवण्यात कोरण्यात आल्या आहेत. मंदिराच्या भिंतींवर स्त्रियांची शिल्पे आहेत; छोट्या कोनाड्यांमध्ये विविध देवतांच्या प्रतिमा आणि हिंदू पौराणिक कथेनुसार सर्व दिशांचे रक्षक आहेत.
शिल्पकलेने नटलेल्या मंदिराच्या मंडपाला (हॉल) तीन प्रवेशद्वार आहेत. हॉलला अर्धी भिंत आणि खांबांच्या रांगा आहेत. यातील प्रत्येक खांब शिल्प आणि कलाकृतींनी सजलेला आहे. स्तंभ दैवी प्रतिमांनी सुशोभित केलेले आहेत. छताच्या गोलाकार मध्यभागी सुंदर भौमितिक नक्षीकाम आहे. या हॉलला ‘स्वर्गमंडप’ म्हणतात. 
मुख्य मंडप आयताकृती असून त्याला तीन प्रवेशद्वार आहेत. हॉलमध्ये दगडात कोरलेल्या जाळीच्या खिडक्या आहेत. आतील स्तंभ देखील गोलाकार हॉलमधील सजावटीसारखे आहेत. मंदिरातील प्रत्येक सजावट हि वर्तुळाकृती आणि भौमितिक नक्षीकामाची एक अद्वितीय कलाकृती आहे.
गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर, एका दगडात कोरलेले परिचर आहेत. गाभारा पाण्यात आहे, आणि शिवलिंग मध्यभागी आहे. गुंतागुंतीचे कोरीव काम, सुंदर शिल्प, भव्य हॉल आणि नाजूक अलंकार यासाठी हे मंदिर ओळखले जाते.
शिव मंदिरापासून काही अंतरावर जैन धर्माचे दुसरे मंदिर आहे. हे मंदिर जैन तीर्थंकर आदिनाथ यांना समर्पित आहे. मंदिर जैन धर्माच्या दिगंबर परंपरेशी संबंधित आहे.
ही दोन्ही मंदिरे स्थानिक काळ्या दगडाची (कोरड्या दगडाचे बांधकाम) रचना आहेत.

भौगोलिक माहिती    
हे मंदिर कोल्हापूर शहरापासून कृष्णा नदीच्या काठावर सुमारे ७५.१ किलोमीटर अंतरावर आहे. हे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर आहे.

हवामान    

•    या भागात वर्षभर उष्ण आणि काही अंशी शुष्क (कोरडे) हवामान असते आणि सरासरी तापमान १९-३३ अंश सेल्सिअस असते.
•    एप्रिल आणि मे हे पुण्यातील सर्वात उष्ण महिने असतात तेव्हा तापमान ४२ अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.
•    हिवाळा अत्यंत तीव्र असतो आणि रात्री तापमान १० अंश सेल्सिअस इतके खाली जाऊ शकते, परंतु दिवसाचे सरासरी तापमान सुमारे २६ अंश सेल्सिअस असते.
•    पुणे विभागात सरासरी वार्षिक पाऊस सुमारे ७६३ मिमी इतका असतो.

करण्यासारख्या गोष्टी      
खिद्रापूर येथील मंदिरात सुंदर वास्तुशिल्प काम केलेले आहे. दगडाने बनवलेल्या मंदिरावरील बारीक कोरीवकाम पाहत वेळ निघून जातो. 

जवळची पर्यटनस्थळे     
या मंदिराजवळ विविध ठिकाणी भेट देता येते.
•    शालिनी पॅलेस (६२.२ किमी)
•    नवीन राजवाडा (६०.९ किमी)
•    रंकाळा तलाव (६३.७ किमी)
•    लक्ष्मी विलास पॅलेस (६२.७ किमी)
•    टाउन हॉल संग्रहालय (५९.८ किमी)
•    नरसोबावाडी (१७.५ किमी)

रेल्वेने, विमानाने आणि रस्त्याने (ट्रेन, विमान, बस) तसेच ठराविक वेळेत पर्यटन स्थळावर कसे पोहोचावे हवाई मार्गाने: 
•    पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ (२७९ कमी)
•    रेल्वेने: मिरज रेल्वे स्टेशन (३३ किमी)
•    बी रोड: कोल्हापूर-रुकडी-सांगली महामार्ग (३८ किमी)

खाद्य वैशिष्ट्य आणि हॉटेल्स    
स्थानिक महाराष्ट्रीय जेवणात शाकाहारी खाद्यपदार्थांमध्ये पिठलं-भाकरी, ठेचा, वांगी रस्सा इत्यादी आणि मटण, भात, कोल्हापुरी पांढरा आणि तांबडा रस्सा यांचा समावेश होतो.

जवळच्या निवास सुविधा आणि हॉटेल/ हॉस्पिटल/ पोस्ट ऑफिस/पोलीस स्टेशन    
•    या भागात अनेक हॉटेल्स आणि लॉज उपलब्ध आहेत.
•    शिरोली पोलीस स्टेशन जवळचे पोलीस स्टेशन (२३.१ किमी) आहे.
•    चौगुले हॉस्पिटल जवळचे हॉस्पिटल आहे (३०.३ किमी)

पर्यटनासाठीचे नियम आणि वेळ, पर्यटनासाठी योग्य काळ      
•    पर्यटक वर्षभर या मंदिराला भेट देऊ शकतात.
•    या मंदिराला भेट देण्याचा उत्तम काळ ऑक्टोबर ते मार्च आहे कारण या काळात हवामान आल्हाददायक असते.

या ठिकाणी बोलल्या जाणाऱ्या भाषा     
इंग्रजी, हिंदी, मराठी.