• A-AA+
 • NotificationWeb

  Title should not be more than 100 characters.


  0

WeatherBannerWeb

Asset Publisher

About Koyana Dam (Mahabaleshwar)

पर्यटन स्थळे/ जागा यांची नावे आणि स्थळांचे थोडक्यात 3-4 ओळींमध्ये वर्णन

कोयना धरण हे भारतातील महाराष्ट्रातील मोठ्या धारणांपैकी एक आहे. हे कोयना नदी जी सह्याद्रि पर्वत रांगेतील हिल स्टेशन महाबळेश्वर येथे उगम पावते तिच्यावर  बांधलेले रबल कॉन्क्रिट चे धरण आहे. हे कोयना नगर जिल्हा सातारा येथे पश्चिम घाटात चिपळूण कराड राज्य महामार्गावर आहे

जिल्हा/प्रदेश

सातारा जिल्हा, महाराष्ट्र, भारत

इतिहास

धरणाचे बांधकाम 1956 मध्ये सुरू झाले आणि 1964 मध्ये याचे उत्घाटन झाले. हा भारतातला दूसरा सगळ्यात मोठा जलविद्यूत प्रकल्प आहे. पहिल्या महायुद्धांनंतर कोयना नदीवरचा जलविद्युत प्रकल्प टाटा ग्रुपने बांधला. या धरणाला पूर्वी हादरे बसले आहेत ज्यामुळे त्यावर काही भेगा पण पडल्या होत्या पण नंतर ते मजबूत करण्यात आले आणि भविष्यातही कोणत्याही टेक्टोनिक हालचाली सहन करण्यासाठी पुरेसे मजबूत असल्याचे मानले जाते.

भूगोल

कोयना नदी ही कृष्ण नदीची उपनदी आहे आणि भारतातील, महाराष्ट्रातील, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरला पश्चिम घाटात उगम पावते. ती पश्चिम घाटातील प्रसिद्ध हिल स्टेशन महाबळेश्वर येथे उगम पावते. महाराष्ट्रातील इतर नद्या पश्चिम पूर्व दिशेला वाहतात, कोयना नदी उत्तर- दक्षिण दिशेला वाहते. धरण डोंगराळ प्रदेशाने वेढेलेल आहे आणि ते कोयना अभयारण्य आणि चंदोली राष्ट्रीय उद्यान यांच्या दरम्यान आहे

वातावरण/हवामान
या
भागात वर्षभर उष्णकमी कोरडे हवामान असते आणि सरासरी तापमान 19-33 अंश सेल्सियस असते.

एप्रिल आणि मे हे पुण्यातील सर्वात उष्ण महीने असतात जेव्हा तापमान 42 अंश सेल्सियस पर्यन्त पोचते.

हिवाळा तीव्र असतो आणि तापमान रात्रीच्या वेळी 10 अंश सेल्सियस पर्यन्त काहलि जाऊ शकते, पण सरासरी दिवसाचे तापमान हे सुमारे 26 अंश सेल्सियस पर्यन्त असते.

या भागातील वार्षिक पर्जन्यमान हे सुमारे 4500 मिमी इतके असते

काय काय करू शकता  

कोयना धरणाच्या निसर्गरम्य सौंदर्या व्यतिरिक्त नेहरू बाग , शिवसागर तलाव, वासोटा किल्ला, ओझर्डे धबधबा, श्री राम मंदिर यासारख्या आसपासच्या ठिकाणांना पर्यटक भेट देऊ शकतात  

पर्यटन स्थळे/ जागा यांची नावे आणि स्थळांचे थोडक्यात 3-4 ओळींमध्ये वर्णन

पर्यटन स्थळे/ जागा यांची नावे आणि स्थळांचे थोडक्यात 3-4 ओळींमध्ये वर्णन

 • कासचे पठार : कास पठार हे आरक्षित जंगल हे महाराष्ट्रातील, सातारा शहारच्या पश्चिमेस 25 किमी अंतरावर एक पठार आहे. हे पश्चिम घाटाच्या सह्याद्रि रांगांमध्ये येते आणि 2012 मध्ये ते यूनेस्कोच्या जागतिक नैसर्गिक वारसा स्थळाचा भाग बनले आहे. कासमध्ये 850 पेक्षा जास्त विविध प्रकारच्या फुलांच्या जाती आहेत वनस्पती शास्त्र प्रेमी, फुलप्रेमी, निसर्गप्रेमी , आणि फोटोग्राफर यांनी आवश्य भेट द्यावी.

 

 • ठोसेघर धबधबा :- तीन बाजूंनी उंचा डोंगरांनी वेढलेला आश्चर्यकारक ठोसेघर धबधबा हा पर्यटकांसाठी एक मेजवानीच आहे आणि महाराष्ट्राच्या सातारा जिल्हयाला सहलीच्या वेळी सहज भेट देता येते . हा राज्यातील उंच धबधब्यापैकी एक मनाला जातो.

 • अजिंक्यतारा किल्ला :- अजिंक्यतारा किल्ला महाराष्ट्रातील इतिहासमुळे पर्यटकांचे सर्वात महत्वाचे आकर्षण आहे. हा डोंगरी किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात होता आणि त्या किल्ल्याने मराठा साम्राज्याच्या काही महत्वाच्या घटना पहिल्या आहेत. अजिंक्य ताराचा शब्द्श: अर्थ अजिंक्य किल्ला असा आहे. ही सातार्यातील वास्तुकलेची सर्वात विलक्षण निर्मिती आहे.

 •  नटराज मंदिर :- सातरचे नटराज मंदिर महाराष्ट्र राज्यात आहे. हे तामिळनाडूच्या चिदम्बरम मंदिराचे अॅनिमेशन असल्याने, त्याला उत्तरा चिदंबरम मंदिर म्हणूनही ओळखले जाते. नटराज भागवान शिव यांचे दैवी नृत्यांगण म्हणून चित्रण हीच या मंदिराची देवता आहे. भारतभरातून बरेच शास्त्रीय नर्तक या ठिकाणी भेट देतात , दरवर्षी मंदिर समितिद्वारे या ठिकाणी आयोजित संस्कृतिक कार्यक्रमांत सादरिकरण करतात.

 • बामणोली :- महाराष्ट्रातील सातार्यापासून सुमारे 36 किमी अंतरावर आहे. बामणोली हे सुंदर गाव आहे जे मुख्यत: विहंगम आणि भव्य निसर्गासाठी ओळखले जाते. हे भव्य शिवसागर तलावा सभोवताल आहे. ज्यांना त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामधून काही शांततापूर्ण वेळ हवा आहे त्यांनी आवर्जून भेट द्यावी. शांत वातावरण पर्यटकांसाठी एक सुंदर पिकनिक स्पॉट आहे. आणि बोटिंग सारखे उपक्रमही येथे चालतात

 • मायानी पक्षी अभयारण्य :- मयानी अभयारण्यात पक्षांच्या विविधा जाती प्रजाती आहेत म्हणून हे सातार्याच्या लोकप्रिय पर्यटन स्थळापैकी एक आहे. हे अभयारण्य जगभरातील निसर्गप्रेमींसाठी एक आदर्श ठिकाण आहे. या अभयारण्यात पक्षांच्या 400 विविध जाती पाहायला मिळतात.

या पर्यटन स्थळावर रेल्वे, हवाई, रस्ता ( ट्रेन, विमान, बस) मार्गे कसे जायचे, अंतर आणि लागणार्या वेळासह

हे मुंबईला एनएच 48 या महामार्गाने जोडलेले आहे. मुबाई 279 किमी ( 7 तास 27 मिनिटे ), पुणे 195 किमी ( 4 तास 18 मिनिटे ), कोल्हपुर 129 किमी ( 2 तास 57 मिनिटे) या शहरांपासून राज्य परिवहन मंडळाच्या बस, खाजगी गाड्या आणि लक्झरी बस उपलब्ध आहेत.

जवळचे विमानतळ :- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक रत्नागिरी विमानतळ, रत्नागिरी 122 किमी ( 3 तास 13 मिनिटे ). 

जवळचे रेल्वे स्टेशन :- आरवली रोड रेल्वे स्टेशन 60.8 किमी ( 1 तास 45 मिनिटे).

विशेष अन्नपदार्थ वैशिष्ट्य आणि हॉटेल

सातारा हे गोड पदार्थासाठी प्रसिद्ध आहे. कंदी पेढे हा दुधाचा एक पदार्थ आहे जी जवळच्या गावांमध्ये उपलब्ध शुद्ध पूर्ण फॅट युक्त दुधाद्वारे तयार केली जाते. त्याला  नैसर्गिक समृद्धता आणि  गोडवा आहे. कंदी पेढ्याची अनोखी चव आहे आणि ती बाजारात उपलब्ध असलेल्या इतर पेढ्यांप्रमाणे साखरेने भरलेले नाही.

जवळील राहण्याच्या व्यवस्था आणि हॉटेल/हॉस्पिटल/पोस्ट ऑफिस/पोलिस स्टेशन

कोयना धारणाजवळ अनेक हॉटेल्स आणि रेस्टोरंट उपलब्ध आहेत.

कोयना धरणाच्या आसपास 24.1 किमी वर हॉस्पिटल्स आहेत

सगळ्यात जवळचे पोस्ट ऑफिस 2.4 किमी अंतरावर आहे.

सगळ्यात जवळचे पोलिस स्टेशन 2.0 किमी वर उपलब्ध आहे.

जवळच्या एमटीडीसी रिसॉर्टचा तपशील

एमटीडीसी रिसॉर्ट कोयनानगर ला आहे.

भेट देण्याचे नियम आणि वेळ

भेट देण्यासाठी उत्तम महिना

पावसाळ्यात धरणाचे सर्वोत्तम सौन्दर्य समोर येते आणि एक विलक्षण वातावरण तयार होते जे एकदा अनुभवले पाहिजे. तथापि हे वर्षभर सुंदर दिसते आणि त्याच्या सौंदर्याचे कौतुक करण्यासाठी पर्यटकांना आमंत्रित करते.

या भागात बोलली जाणारी भाषा

इंग्रजी, हिन्दी, मराठी.


Tour Package

Hotel Image
Blue Diamond Short Break Bustling Metropolis

2N 1Day

Book by:

MTDC Blue Diamond

Where to Stay

No Hotels available!


Tourist Guides

Responsive Image
Sumanth

ID : 200029

Mobile No. 9878765344

Pin - 440009