• स्क्रीन रीडर प्रवेश
  • A-AA+
  • NotificationWeb

    Title should not be more than 100 characters.


    0

Asset Publisher

कुणकेश्वर

कुणकेश्वर भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. हे ठिकाण अतिशय नितळ पाणी, पांढरी वाळू आणि नारळाच्या झाडांच्या हिरवाईसाठी देखील ओळखले जाते. लोकप्रिय तीर्थक्षेत्र कुणकेश्वर मंदिर हे महाशिवरात्री उत्सव आणि कुणकेश्वर यात्रेसाठी प्रसिद्ध आहे.

जिल्हा/विभाग        

सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र, भारत.

ऐतिहासिक माहिती 

कुणकेश्वर हे महाराष्ट्रातील दक्षिण कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात आहे. हे ठिकाण स्वच्छ आणि वालुकामय किनारे आणि डोंगराळ परिसरासाठी ओळखले जाते. स्वच्छ पांढरी वाळू आणि नयनरम्य दृश्यांसह ४-५ किमी लांब स्वच्छ समुद्रकिनारा, आपल्या प्रियजनांसोबत दर्जेदार वेळ घालवण्यासाठी एक आदर्श ठिकाण बनते.

भौगोलिक माहिती   

हे देवगड किल्ल्याच्या दक्षिणेस दक्षिण कोकणात आहे. त्याच्या एका बाजूला हिरव्यागार सह्याद्री पर्वत आणि दुसऱ्या बाजूला निळा अरबी समुद्र आहे. हे सिंधुदुर्ग शहराच्या वायव्येस ६३ किमी, कोल्हापूरपासून १३७ किमी आणि मुंबईपासून ४२० किमी दूर आहे.

हवामान       

या प्रदेशातील मुख्य ऋतू म्हणजे पावसाळा. कोकण किनारपट्टीत मुख्यतः जास्त पाऊस (सुमारे २५०० मिमी ते ४५०० मिमी) अनुभवायला मिळतो आणि हवामान दमट आणि उबदार असते.

पावसाळ्यात तापमान ३० अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.

उन्हाळा गरम आणि दमट असतो आणि तापमान ४० अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.

इथे हिवाळ्यात तुलनेने सौम्य हवामान (सुमारे २८ अंश सेल्सिअस) असते आणि हवामान थंड आणि कोरडे असते.

करण्यासारख्या गोष्टी        

कुणकेश्वर इथली मंदिरे आणि शांत किनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे.

या ठिकाणी सूर्यस्नान (सनबाथिंग), पोहणे आणि वाळूवर चालणे या गोष्टींचा आनंद घेता येतो. समुद्रकिनाऱ्यावर दूरवर खोल समुद्रात डॉल्फिन डायव्हिंग करताना इथे दिसतात.

जवळची पर्यटनस्थळे        

कुणकेश्वरसह खालील पर्यटन स्थळांना भेट देण्याची योजना आपण करू शकता.

  • देवगड किल्ला: हा किल्ला देवगड बंदराच्या संरक्षणासाठी बांधण्यात आला होता जो कुणकेश्वरच्या उत्तरेस ८.४ किमी अंतरावर आहे.
  • देवगड समुद्रकिनारा: कुणकेश्वरच्या ७ किमी उत्तरेस स्थित हा समुद्रकिनारा मासेमारी आणि सूर्यस्नानासाठी प्रसिद्ध आहे.
  • विजयदुर्ग किल्ला: कुणकेश्वरच्या उत्तरेस ३७ किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला 13 व्या शतकात बांधण्यात आला होता आणि तो त्याच्या स्थापत्य कलेच्या उत्कृष्टतेसाठी प्रसिद्ध आहे.
  • तारकर्ली समुद्रकिनारा: जलक्रीडा उपक्रमांसाठी खूप प्रसिद्ध, तारकर्ली किनारा कुणकेश्वरच्या दक्षिणेस ४९ किमी अंतरावर आहे.
  • कवलेसाद पॉईंट: कुणकेश्वरपासून २३.६ किमी दूर आहे. पावसाळ्यात नयनरम्य दृश्यांचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणाला भेट देणे आवश्यक आहे.

रेल्वेने, विमानाने आणि रस्त्याने (ट्रेन, विमान, बस) तसेच ठराविक वेळेत पर्यटन स्थळावर कसे पोहोचावे      

जवळची रेल्वे स्थानके:

  • नांदगाव रोड – १०३ किमी
  • कणकवली – ५४.२ किमी (१ तास १२ मिनिटे)
  • जवळचे विमानतळ: चिपी विमानतळ, सिंधुदुर्ग - ५३.९ किमी (१ तास १६ मिनिटे)
  • दाबोलिम विमानतळ, गोवा – १७६ किमी (३ तास ५६ मिनिटे)

रस्त्याने:

  • सिंधुदुर्ग – ७२.६ किमी (१ तास २४ मिनिटे)
  • मुंबई – ४२० किमी (१० तास ३२ मिनिटे)
  • पुणे – ३६६ किमी (६ तास ३३ मिनिटे)

खाद्य वैशिष्ट्य आणि हॉटेल्स        

महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात असल्याने समुद्री अन्न पदार्थ (सी-फुड) हे येथील वैशिष्ट्य आहे. तथापि, हे सर्वाधिक भेट दिलेल्या पर्यटन स्थळांपैकी एक आहे. हे मुंबई आणि गोवा महामार्गावर असल्याने, स्थानिक रेस्टॉरंट्स विविध प्रकारचे पदार्थ देतात. मालवणी खाद्यपदार्थ आणि जेवण ही या ठिकाणाची खासियत आहे.

जवळच्या निवास सुविधा आणि हॉटेल/ हॉस्पिटल/ पोस्ट ऑफिस/पोलीस स्टेशन   

  • कुणकेश्वर हे एक छोटेसे गाव आहे आणि इथे राहण्यासाठीचे पर्याय मर्यादित आहेत. लॉज आणि घरगुती निवास सुविधा देवगड मध्ये उपलब्ध आहेत.
  • सरकारी ग्रामीण रुग्णालयांसह इतर रुग्णालये देवगडजवळ उपलब्ध आहेत.
  • सर्वात जवळचे पोस्ट ऑफिस कुणकेश्वरपासून २२ किमी अंतरावर असलेल्या वाडा या ठीकाणी उपलब्ध आहे.
  • समुद्रकिनाऱ्यापासून ७.६ किमी दूर देवगड येथे पोलीस स्टेशन आहे.

जवळपासचे एमटीडीसी रिसॉर्ट    

एमटीडीसीचा सी-साइड रिसॉर्ट कुणकेश्वर बीचजवळ उपलब्ध आहे.

पर्यटनासाठीचे नियम आणि वेळ, पर्यटनासाठी योग्य काळ     

  • हे ठिकाण पर्यटनासाठी वर्षभर उपलब्ध आहे. या ठिकाणास भेट देण्याची उत्तम वेळ ऑक्टोबर ते मार्च पर्यंत आहे.
  • जून ते ऑक्टोबर पर्यंत इथे भरपूर पाऊस असतो आणि उन्हाळा गरम आणि दमट असतो.
  • पर्यटकांनी समुद्रात प्रवेश करण्यापूर्वी भरती आणि ओहोटीच्या वेळ तपासून मगच समुद्रात जावे.
  • पावसाळ्यात समुद्राला येणारी भरती धोकादायक असू शकते म्हणून याकाळात समुद्रात जाणे टाळले पाहिजे.

या ठिकाणी बोलल्या जाणाऱ्या भाषा       

इंग्रजी, हिंदी, मराठी, मालवणी