• Screen Reader Access
  • A-AA+
  • NotificationWeb

    Title should not be more than 100 characters.


    0

Asset Publisher

गिरीजात्मज अष्टविनायक मंदिर लेन्याद्री

गिरीजात्मज अष्टविनायक मंदिर लेन्याद्री हे जुन्नरच्या ऐतिहासिक शहराच्या परिसरात असलेल्या अष्टविनायक मंदिरांपैकी एक आहे. गिरीजा (पार्वतीचा) आत्मज (पुत्र) या अर्थाने या मंदिराचे नाव गिरिजात्मज असे आहे.
जिल्हा/विभाग

पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत. 

ऐतिहासिक माहिती    
गिरिजात्मजाचे मंदिर गुहेत आहे. जुन्नर हे अश्या परिसरातील एक शहर आहे, जिथून जवळपास २०० बौद्ध लेणी इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून ते सहाव्या शतकाच्या दरम्यान उत्खनन करण्यात आल्या. विनायक गणेशाचे सध्याचे मंदिर दुसऱ्या शतकातील बौद्ध लेणी आहे. मध्ययुगीन काळात बौद्ध मठाचे गणपतीच्या मंदिरात रूपांतर करण्यात आले.
मंदिरामध्ये सुशोभित अष्टकोनी खांबांसह एक विस्तृत खडकातून कोरलेला व्हरांडा आहे. हि गुंफा बौद्ध मठ असताना बौद्ध भिक्खूंसाठी बनविलेल्या असंख्य छोट्या खोल्या आहेत. हॉलच्या भिंतींवर मध्ययुगीन दगडांचे कोरीवकाम आहे. मध्यवर्ती खोल्या मंदिरात रूपांतरित केल्या आहेत ज्यात मागील भिंतीवर विनायकाची प्रतिमा आहे. विनायक हे गणपती किंवा गणपतीचे एक रूप आहे. हे मंदिर एक अखंड देवस्थान आहे.
या गुहा-मंदिराच्या परिसरात आणखी काही बौद्ध लेणी आहेत. या लेण्यांच्या समूहास म्हणजेच या ठिकाणास एका शिलालेखात 'कपिचित्त' असा उल्लेख आहे.

भौगोलिक माहिती    
लेन्याद्रीचे मंदिर जुन्नर शहरापासून सुमारे ८ किमी अंतरावर आहे.

हवामान     
•    या भागात वर्षभर उष्ण आणि काही अंशी शुष्क (कोरडे) हवामान असते आणि सरासरी तापमान १९-३३ अंश सेल्सिअस असते.
•    एप्रिल आणि मे हे सर्वात उष्ण महिने असतात तेव्हा तापमान ४२ अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.
•    हिवाळा अत्यंत तीव्र असतो आणि रात्री तापमान १० अंश सेल्सिअस इतके खाली जाऊ शकते, परंतु दिवसाचे सरासरी तापमान सुमारे २६ अंश सेल्सिअस असते.
•    या भागात सरासरी वार्षिक पाऊस सुमारे ७६३ मिमी इतका असतो.

करण्यासारख्या गोष्टी      
या मंदिरात जाण्यासाठी सुमारे ३०० पायऱ्या चढाव्या लागतात. हे मंदिर प्रसिद्ध बौद्ध प्रार्थना-स्थळ लेणी (चैत्य) च्या पुढच्या गुहेत आहे.

जवळची पर्यटनस्थळे     
आसपास पर्यटकांच्या आकर्षणाची अनेक ठिकाणे आहेत ज्यांना भेट देता येते.
•    शिवनेरी किल्ला (८.१ किमी)
•    माळशेज धबधबा (२६.४ किमी)
•    अष्टविनायक ओझर मंदिर (१४.६ किमी)
•    नाणेघाट किल्ला (३४ किमी)
•    हडसर किल्ला (१७.३ किमी)
•    कुकडेश्वर मंदिर (२७ किमी)
•    निमगिरी किल्ला (२५.१ किमी)

रेल्वेने, विमानाने आणि रस्त्याने (ट्रेन, विमान, बस) तसेच ठराविक वेळेत पर्यटन स्थळावर कसे पोहोचावे     
•    हवाई मार्गाने: पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ (९३.२ किमी)
•    रेल्वेने: पुणे स्टेशन (९८.९ किमी)
•    रस्त्याने: मुंबई-पुणे महामार्ग (१०२ किमी)

खाद्य वैशिष्ट्य आणि हॉटेल्स    
स्थानिक रेस्टॉरंट्समध्ये महाराष्ट्रीय पद्धतीचे जेवण आणि पदार्थ मिळतात.

जवळच्या निवास सुविधा आणि हॉटेल/ हॉस्पिटल/ पोस्ट ऑफिस/पोलीस स्टेशन    
•    मंदिराजवळ आणि जुन्नर शहरात राहण्याच्या विविध सुविधा आहेत.
•    सर्वात जवळचे पोलीस स्टेशन जुन्नर पोलीस स्टेशन आहे (४.८ किमी)
•    मंदिराजवळील रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय जुन्नर (४.८ किमी)

जवळपासचे एमटीडीसी रिसॉर्ट    
•    एमटीडीसी कार्ला ११२ किमी
•    एमटीडीसी पानशेत १४५ किमी

पर्यटन मार्गदर्शक (माहिती)    
संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटन मार्गदर्शक अष्टविनायक मंदिरांच्या दर्शनासाठी टूर आयोजित करतात.

पर्यटनासाठीचे नियम आणि वेळ, पर्यटनासाठी योग्य काळ      
•    मंदिर पहाटे ५.०० ते रात्री ८.०० पर्यंत खुले असते. 
•    प्रवेश तिकिटाची किंमत भिन्न असू शकते.
•    खासगी वाहनांमधून येणाऱ्या पर्यटकांसाठी सशुल्क पार्किंग सुविधा उपलब्ध आहेत.
•    मंदिरात फोटोग्राफीला परवानगी नाही.
•    मंदिराला भेट देण्याचा उत्तम काळ जून ते मार्च आहे.

या ठिकाणी बोलल्या जाणाऱ्या भाषा     
इंग्रजी, हिंदी आणि मराठी.