लोणार सरोवर - DOT-Maharashtra Tourism
Breadcrumb
Asset Publisher
लोणार सरोवर
पर्यटन स्थळे/ जागा यांची नावे आणि स्थळांचे थोडक्यात ३-४ ओळींमध्ये वर्णन
लोणार सरोवर ज्याला लोणार क्रेटर असेही म्हणतात जो उल्कापातामुळे तयार झाला आहे. हे खारट आणि क्षरयुक्त पाण्यासह अधिसूचित भू वारसा स्मारक आहे. तसेच प्राणी, वनस्पती तसेच तलावाचे संवर्धन करण्यासाठी वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले आहे.
जिल्हा/प्रदेश
बुलढाणा जिल्हा, महाराष्ट्र, भारत
इतिहास
हे सरोवर प्राचीन काळापासून ओळखले जाते. ब्रिटिश अधिकारी जे.ई आलेक्झंडर हा पहिला युरोपियन अधिकारी होता ज्याने 1823 साली येथे भेट दिली. पूर्वी असे मानले जात होते हे सरोवर ज्वालामुखीमुळे तयार झाले असावे परंतु नंतर संशोधन अभ्यासाच्या मदतीने असे आढळुन आले की पृथ्वी बाहेरील वस्तूच्या परिणामाने हे सरोवर तयार झाले जसे की एकतर लघुग्रह किंवा धूमकेतू.
भूगोल
लोणार क्रेटर दक्खनच्या पठारावर आत तयार झाले आहे. जे ज्वालामुखीच्या बेसल्ट खडकाचे मैदान आहे. अंडाकृती आकाराच्या सरोवरात विविध जिवाणू तसेच सूक्ष्म जीव राहतात.
वातावरण/हवामान
हा प्रदेश वर्षभर बर्याचअंशी कोरडा असतो, आणि उन्हाळे तीव्र असतात. उन्हाळ्यातील तापमान सुमारे 30-40 अंश सेल्सियस असते.
हिवाळ्यात तापमान १० अंश सेल्सियस पर्यंत खाली येते.
या प्रदेशात वार्षिक पर्जन्यमान सुमारे १०६४.१ मिमी आहे.
काय काय करू शकता
बोटिंग, ट्रेकिंग आणि शॉपिंग करता येते. आणि गोमुख मंदिर, विष्णु मंदिर, बालाजी मंदिर इथे तुम्ही भेट देऊ शकता.
पर्यटन स्थळे/ जागा यांची नावे आणि स्थळांचे थोडक्यात ३-४ ओळींमध्ये वर्णन
- गोमुख मंदिर :- हे मंदिर पाण्याच्या प्रवाहाच्या सीमेजवळ आहे आणि भक्तांनी पवित्र मानले आहे. साप लांगूर, हरिण, कोल्हे, आणि मुंगूस सारखे प्राणी आसपासच्या भागात दिसू शकतात. या परिसरातील आवर्जून भेट देण्याजोगे ठिकाण आहे.
- दैत्य सुधान मंदिर :- हे प्राचीन मंदिर भागवान विष्णुना समर्पित आहे आणि ते चैत्य राजवंशाचे आहे ज्याने 6 व्या आणि 12 व्या शतकाच्या दरम्यान या प्रदेशावर राज्य केले. हेमाडपंथी शैलीमध्ये मंदिराचे बांधकाम एका अनियमित तार्यासारखे दिसते. विविध पोरणिक कथा दर्शवणार्य भिंतीवरील कोरीव काम पाहता येते.
- श्री गजानन महाराज संस्थान :- हे संस्थान १९०८ मध्ये श्री महाराजांच्या पवित्र उपस्थितीत अस्तित्वात आले. मंदिराला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संगमरवर लाऊन जीर्णोद्धार करण्यात आले आहे. देशातील सर्वात स्वच्छ आणि साफ मंदिरांपैकी एक आहे.
- आनंद सागर :- जरी या भागात पाऊस पडत नाही आणि तो दुष्काळ, कडक्याच्या उन्हाळ्यासाठी आणि पावसाच्या अभावासाठी प्रसिद्ध आहे तरीही सर्जनशीलता आणि महान दृष्टीसह या ठिकाणी एक अद्भुत तलाव तयार केला गेला आहे. शांतापूर्ण क्षणांसाठी संध्याकाळी किंवा पहाटेच्या वेळी भेट देणे आवश्यक आहे.
- कमालजा देवी मंदिर :- कमालजा देवी मंदिर तलावाला लागून आहे आणि त्यात कोरीव प्रतिमा देखील आहेत. हे या प्रदेशातील लोकप्रिय पर्यटन स्थलांपैकी एक आहे.
- बोथा वन :- बुलढाणा खामगाव रस्त्यावर बोथा राखीव जंगल आहे आणि ते वाघ आणि हरणांसारख्या प्राण्यांचे निवासस्थान म्हणून काम करते. त्यात तलाव आणि विविध वनस्पतींच्या प्रजाती आहेत.
- सिंद्खेड राजा किल्ला :- सिन्द्खेड राणी जिजबाईंचे वडील लखुजीराव जाधवांच्या राजवाड्यासाठी प्रसिद्ध आहे. हे ठिकाण सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात लखुजी जाधव यांनी बांधले होते. १२ जानेवारी १५९८ रोजी या ठिकाणी जिजाबाईंचा जन्म झाला, हा किल्ला त्यांचे जन्मस्थान आहे.
या पर्यटन स्थळावर रेल्वे, हवाई, रस्ता ( ट्रेन, विमान, बस) मार्गे कसे जायचे, अंतर आणि लागणार्या वेळासह
हे मुंबईशी एनएच ५४८ सी या महामार्गाने जोडलेले आहे. औरंगाबाद १३९ किमी ( ३ तास ३० मिनिटे), जालना ८२ किमी ( १ तास ५० मिनिट), आणि बुलढाणा ९२ किमी (२ तास ४५ मिनिटे ) या शहरांपासून राज्य परिवहन मंडळ, खाजगी गाड्या, आणि लक्झरी उपलब्ध आहेत.
जवळचे विमानतळ :शिओनी विमानतळ, अकोला १३४ किमी (३ तास १0 मिनिटे ).
जवळचे रेल्वे स्टेशन : ६७.१ किमी ( १ तास ४५ मिनिटे) वरचे परतूर रेल्वे स्टेशन.
विशेष अन्नपदार्थ वैशिष्ट्य आणि हॉटेल
महाराष्ट्रीयन जेवण किंवा भोजन हेच इथले वैशिष्ठ्य आहे.
शेगाव कचोरी ही या प्रदेशातली प्रसिद्ध डिश आहे.
जवळील राहण्याच्या व्यवस्था आणि हॉटेल/हॉस्पिटल/पोस्ट ऑफिस/पोलिस स्टेशन
लोणार क्रेटर जवळ विविध हॉटेल्स आणि रेस्टोरंट उपलब्ध आहेत.
लोणार क्रेटर जवळ ३.९ किमी बुलढाण्याच्या आसपास हॉस्पिटल्स आहेत.
जवळचे पोस्ट ऑफिस ११.६ किमी वर हिरदेव येथे उपलब्ध आहे.
जवळचे पोलिस स्टेशन ३.२ किमी अंतरावर लोणारला आहे.
जवळच्या एमटीडीसी रिसॉर्टचा तपशील
एमटीडीसी रिसॉर्ट लोणार क्रेटर जवळ बुलढाणाला आहे.
भेट देण्याचे नियम आणि वेळ
भेट देण्यासाठी उत्तम महिना
इथे भेट देण्याचा उत्तम कालावधी ऑक्टोबर ते मार्च हा आहे, आजूबाजूचे दृश्य नीट दिसावे यासाठी उन्हाळा आणि पावसाळा हे हंगाम टाळा.
या भागात बोलली जाणारी भाषा
इंग्रजी, हिन्दी आणि मराठी.
Gallery
How to get there

By Road
हे मुंबईशी एनएच ५४८ सी या महामार्गाने जोडलेले आहे. औरंगाबाद १३९ किमी ( ३ तास ३० मिनिटे), जालना ८२ किमी ( १ तास ५० मिनिट), आणि बुलढाणा ९२ किमी (२ तास ४५ मिनिटे ) या शहरांपासून राज्य परिवहन मंडळ, खाजगी गाड्या, आणि लक्झरी उपलब्ध आहेत.

By Rail
जवळचे रेल्वे स्टेशन : ६७.१ किमी ( १ तास ४५ मिनिटे) वरचे परतूर रेल्वे स्टेशन.

By Air
जवळचे विमानतळ :शिओनी विमानतळ, अकोला १३४ किमी (३ तास १0 मिनिटे ).
Near by Attractions
Tour Package
Where to Stay
Tour Operators
MobileNo :
Mail ID :
Tourist Guides
No info available
Subscription
आमचा पत्ता
पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र
१५ मजला, नरिमन भवन,
नरिमन पॉइंट, मुंबई ४०००२१
connect.dot-mh@gov.in
०२२-६९१०७६००
द्रुत दुवे
QR कोड वापरून मोबाइल अॅप डाउनलोड करा

Android

iOS