• स्क्रीन रीडर प्रवेश
  • A-AA+
  • NotificationWeb

    Title should not be more than 100 characters.


    0

Asset Publisher

लोणावळा

लोणावळा हे पश्चिम भारतातील हिरव्यागार दऱ्यांनी व्यापलेले हिल स्टेशन आहे. हे "सह्याद्री चे रत्न" आणि "गुम्फांचे शहर" म्हणून ओळखले जाते. हे चिक्कीसाठी देखील ओळखले जाते. मुंबई पुणे रेल्वे मार्गावरील हा एक प्रमुख थांबा आहे. घनदाट जंगले, धबधबे, तलाव धरणांनी वेढलेले लोणावळा निसर्गप्रेमींनी आवर्जून भेट देण्यासारखे ठिकाण आहे.


जिल्हा/क्षेत्र    
लोणावळा, पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत 

इतिहास    
लोणावळा आणि आसपासचा प्रदेश ईसापूर्व दुसऱ्या शतकात एक महत्त्वपूर्ण बौद्ध स्थान होते आणि गुफा मंदिरे आहेत. मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी या भागावर राज्य केले. पुढे ते पेशवे शासकांच्या अधिपत्याखाली गेले, ज्यांनी मराठा साम्राज्य पुनर्स्थापित केले. शेवटी पेशव्यांच्या साम्राज्याचे पतन झाल्यानंतर ब्रिटिशांनी ताब्यात घेतले.

भूगोल
लोणावळा हे भारतातील महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम भागात आहे. हे सह्याद्री पर्वतरांगा उतारांवर स्थित असून मुंबईच्या आग्नेय दिशेत १०६ किमी  अंतरावर  समुद्रसपाटीपासून २०५० फूट उंचीवर आहे.

हवामान     
•    या प्रदेशात वर्षभर उष्ण आणि अर्ध-शुष्क हवामान असते.सरासरी तापमान १९-३३ अंश सेल्सिअस असते.
•    एप्रिल आणि मे हे सर्वात गरम महिने असतात जेव्हा तापमान ४२ अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.
•    हिवाळा चांगलाच असतो आणि रात्री तापमान १० अंश सेल्सिअस इतके कमी होऊ शकते.  परंतु दिवसाचे सरासरी तापमान सुमारे २६ अंश सेल्सिअस असते.
•    या प्रदेशात वार्षिक पाऊस सुमारे ७६३ मिमी पडतो.

येथे काय करावे      
लोणावळा हे एक उत्तम ठिकाण आहे, विशेषत: पावसाळ्यात. पर्यटक येथील अप्रतिम हिरवाईमुळे ताजेतवाने होतात. येथील प्रमुख ठिकाणे आहेत   वॅक्स म्यूजियम, पवना तलाव आणि टायगर पॉईंट. कामशेत मध्ये पॅराग्लायडिंग, राजमाची किल्ल्यावर ट्रेकिंग, सह्याद्रीच्या डोंगरात जंगल कॅम्प आणि असेच अनेक साहसी खेळ. समावेश आहे. या व्यतिरिक्त पर्यटक, लोणावळा तलावावर फेरफटका मारणे, भाजे आणि कार्ला लेणी, भुशी धरणावर सहल आणि स्थानिक वस्तू आणि उत्पादनांची खरेदी करण्याचा आनंद घेवू शकतात.

जवळची पर्यटन स्थळे    
•    इमॅजिका: इमेजिका आनंद लुटण्याची जादुई दुनिया आहे.  मनोरंजन, मौज -मजा, विश्रांती, चविष्ट जेवण, खरेदी चा आनंद हे सगळे एकाच ठिकाणी मिळते.  हे एक जागतिक दर्जाचे थीम पार्क, आंतरराष्ट्रीय दर्जाचे वॉटर पार्क. भारतातील सर्वात मोठे स्नो पार्क आणि भारतातील पहिले थीम पार्क हॉटेल- आहे. हे एक लोकप्रिय कौटुंबिक ठिकाण आहे आणि खोपोलीतील सर्वोत्तम गोष्टींपैकी एक आहे. इमॅजिका कॅपिटल या रेस्टॉरंटच्या ग्रँड इंडियन फूड फेस्टिव्हलमध्ये या आणि देशभरातील विशिष्ट आनंददायी खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्या.
•    मावळ: पुणे जिल्ह्यातील एक लहान तालुका आहे. हे ठिकाण सुंदर सूर्यास्त, रोमांचकारी वाटर स्पोर्ट्स आणि कॅम्प साठी प्रसिद्ध आहे. . पर्यटक मावळ येथे राफ्टिंग, कयाकिंग, पोहणे आणि इतर साहसी क्रियाकलापांमध्ये सहभागी होऊ शकतात आणि इथल्या चवदार स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेवू शकतात. शिवाय, इथल्या स्वच्छ आणि प्रशस्त वातावरण रात्री कैम्पिंग करू शकतात (४. ६ किमी)
•    अलिबाग: समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेले अलिबाग वाटर स्पोर्ट्स आणि साहसी क्रीडा प्रकल्पासाठी देखील प्रसिद्ध आहे.  वॉटर स्पोर्ट्ससाठी मुख्य बीचेस आहेत मांडवा बीच, नागाव बीच आणि अलिबाग बीच. हे किनारे पॅरासेलिंग, समुद्री कयाकिंग, जेट स्की आणि बनाना बोट राईडसाठी प्रसिद्ध आहे   (८१ किमी)
•    कोंडाना लेणी: लोणावळ्याच्या उत्तरेस ३३ किलोमीटर अंतरावर कर्जत येथील कोंडाणा या छोट्या गावात कोंडाना लेणी हा १६ बौद्ध लेण्यांचा समूह आहे. अनेक स्तूप आणि शिल्प असलेल्या या लेण्या बौद्ध भिक्खूंच्या प्राचीन जीवनशैलीची झलक देतात. या लेण्यांमध्ये खूपच जटिल कोरीव काम दिसून येते. ही लेणी बौद्ध धर्माशी संबंधित आहेत आणि इ.स.पूर्व पहिल्या शतकातील असल्याचा अंदाज वर्तवला जातो. या लेण्यात उत्कृष्ट दगडी बांधकाम दिसते. ही लेणी इतिहास प्रेमींची उत्सुकता वाढवणारी आहेत.  पर्यटकांनी येथे अवश्य भेट देवून तेथील भव्यपणा अनुभवावा. ही लेणी आणि जवळचे धबधबे तुमची सुट्टी स्मरणीय आणि रमणीय बनवतील.

पर्यटन स्थळाला रेल्वे, हवाई, रस्ता (ट्रेन, उड्डाण, बस) द्वारे कसे जावे (अंतर आणि वेळेसह)    
लोणावळ्याला जाणे अत्यंत सुलभ आहे.  हे रस्तामार्गे मुंबईहून ८३. १ किमी. (१ तास ३७ मिनिटे), पुणे ६४. ९ किमी. (१ तास १६ मिनिटे). रेल्वे मार्गे मुंबई ६५ किमी (२ तास २८ मिनिटे), पुणे ६४ किमी (१ तास ६ मिनिटे). येथे जाण्यासाठी बस, टॅक्सी आणि ऑटो - रिक्षा उपलब्ध आहेत. सर्वात जवळचे विमानतळ: पुणे विमानतळ ७४. ३ किमी (१ तास २८ मिनिटे) आणि मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSIA) ८६ किमी (१ तास ४३ मिनिटे).

विशेष खाद्य आणि हॉटेल    
पर्यटकांना लोणावळ्यामध्ये जवळजवळ सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ मिळू शकतात.    गुजराती पदार्थांपासून ते मसालेदार पुदिना वडा पाव पर्यंत, आणि रस्त्यावर मिळणारी   अत्यंत चविष्ट,तोंडाला पाणी आणणारी भाजलेली मक्याची कणसे . लोणावळाचे रेस्टॉरंट्स दक्षिण भारतीय, कॉन्टिनेंटल, भारतीय, पंजाबी जेवण उपलब्ध करून देतात.  येथे चवदार मांसाहारी जेवण देखील मिळते.

जवळ उपलब्ध असलेली राहण्याची ठिकाणे, आणि हॉटेल, पोस्ट ऑफिस/ पोलीस स्टेशन      
महाबळेश्वर येथे बरीच हॉटेल्स, रिसॉर्ट्स, लॉज आणि घरगुती ठिकाणे आहेत. लोणावळा येथे 
हॉस्पिटल, पोस्ट ऑफिस आणि पोलीस स्टेशन चे व्यवस्थित नेटवर्क आहे. 

एमटीडीसी रिसॉर्ट ची माहिती    
एमटीडीसी रिसॉर्ट लोणावळा रोड, कार्ला येथे उपलब्ध आहे. (७. ३ किमी.)

क्षेत्राला भेट देण्याचे नियम आणि वेळ, भेट देण्याचा सर्वोत्तम महिना    
लोणावळा येथे वर्षभर कधीही जाता येते.  लोणावळ्याला प्रत्येक मोसमात वेगवेगळी आकर्षणे असतात, ज्यामुळे ते वर्षभर गजबजलेले पर्यटनस्थळ आहे. पावसाळ्यात खूप जास्त पाऊस पडत असल्यामुळे पर्यटकांना खबरदारी घेण्याची सूचना केली जाते.
 
क्षेत्रात बोलल्या जाणाऱ्या भाषा    
इंग्रजी, हिंदी, मराठी