भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थीला श्री गजाननाचा जन्म झाल्याचे मानले जाते, या चतुर्थीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. कोणत्याही शुभ कार्याच्या पूर्वी गणेशपूजन आवर्जून केले जाते. गणेशाला मोदक खूप आवडतात, त्यामुळेच गणेश चतुर्थीच्या दिवशी भाविक आपल्या लाडक्या बाप्पाला मोदक अर्पण करतात.
गणेशोत्सवाला सामाजिक आणि सार्वजनिक स्वरूप १८९३ सालापासून प्राप्त झाले. लोकजागृती करूनसमाजातील ऐक्याची भावना वाढावी या हेतूने लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सवाची सुरुवात केली. हा उत्सव गणेशचतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यत दहा दिवस सुरू करण्यात आला. सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात पुण्यात झाली व हळूहळू तो महाराष्ट्रभर साजरा होऊ लागला. मुंबईतील गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध सार्वजनिक उत्सव म्हणून ओळखला जातो.
मुंबईतील सर्वात जुने सार्वजनिक गणेश मंडळ म्हणून १२५ वर्षापूर्वीचे गिरगाव येथील केशवजी नाईक चाळ मंडळ प्रसिद्ध आहे. चिंचपोकळी येथील चिंतामणी गणेश, लालबागचा राजा,परळ येथील नरे पार्कचा गणपती, गणेश गल्लीचा राजा हे मुंबईतील गणपती जगप्रसिद्ध आहेत.
मुंबई
10 सेप्टें 2021
Images