• स्क्रीन रीडर प्रवेश
  • A-AA+
  • NotificationWeb

    Title should not be more than 100 characters.


    0

Asset Publisher

महाबळेश्वर

महाबळेश्वर जुन्या बॉम्बे प्रेसिडेन्सीची ग्रीष्मकालीन राजधानी म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातील हे हिल स्टेशन मनमोहक हिरवळ, उद्याने, ऐतिहासिक स्थळे आणि चित्तथरारक दृश्यांनी सर्वांना मोहित करते.


जिल्हा/प्रदेश    
सातारा जिल्हा, महाराष्ट्र, भारत.

इतिहास    
त्याच सुमारास शिवाजी महाराजांनी महाबळेश्वरजवळ प्रतापगड नावाचा किल्ला बांधला. हा किल्ला अजूनही छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांच्या ताब्यात आहे. 
महाबळेश्वरबद्दल पहिली ऐतिहासिक माहिती १२१५ सालची आहे, देवगिरीचा राजा सिंघन याने जुन्या महाबळेश्वरला भेट दिलीहोती. त्याने कृष्णा नदीच्या विहिरीवर एक लहान मंदिर आणि पाण्याची टाकी बांधली.१३५० च्या सुमारास ब्राह्मण घराण्याने या प्रदेशावर राज्य केले.१५५६ मध्ये मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी राजकीय परिस्थितीमुळे जावळीचे तत्कालीन नेते चंद्रराव मोरे यांचा वाढ केला आणि या प्रदेशावर अधिकार केला.
१८१९ मध्ये, मराठा साम्राज्याचे पतन झाल्यानंतर ब्रिटिशांनी महाबळेश्वरच्या आसपासच्या डोंगरांना साताराच्या राज्याला सोपविले.  १८२८ मध्ये ब्रिटिशांनी महाबळेश्वर च्या बदल्यात साताऱ्याच्या महाराजांना काही शहरे दिली. जुन्या नोंदींमध्ये महाबळेश्वरला गवर्नर च्या नावाने माल्कम पेठ म्हटले गेले. ब्रिटीश शासकांना हिल स्टेशन्समध्ये इंग्लैंड सारखे वातावरण हवे होते. हे लक्षात घेऊन, युरोपियन वनस्पती, उदाहरणार्थ, स्ट्रॉबेरी महाबळेश्वरमध्ये लावल्या. आणि लायब्ररी, थिएटर, बोटिंग तलाव आणि क्रीडांगणे यासारख्या सुविधा विकसित झाल्या. एकोणिसाव्या शतकाच्या समाप्तीपूर्वी हे जगातील प्रसिद्ध हिल स्टेशन झाले होते.

भूगोल
महाबळेश्वर हे पश्चिम घाटाच्या खडकाळ सह्याद्री पर्वत रांगांमध्ये जी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर उत्तर दिशे पासून दक्षिणेकडे जाते. महाबळेश्वर हे १५० किमी. लांबीचे सर्व बाजूंनी दऱ्यांनी वेढलेले एक विस्तीर्ण पठार आहे.
हे समुद्रसपाटीपासून १४३९ मीटर (४७२१ फूट) उंचीवर वसलेले आहे.  याच्या सर्वोच्च शिखराला विल्सन/सनराईज पॉईंट म्हणतात. हे पुण्यापासून १२० किलोमीटर दक्षिण -पश्चिम आणि मुंबईपासून २८५ किमी अंतरावर आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातून वाहणाऱ्या कृष्णा नदीचे मूळ म्हणून महाबळेश्वर परिसर ओळखले जाते. स्ट्रॉबेरीच्या विकासासाठी येथील वातावरण योग्य आहे, देशातील संपूर्ण स्ट्रॉबेरी उत्पादनात सुमारे ८५% उत्पादनात महाबळेश्वर स्ट्रॉबेरी चे योगदान आहे. यामुळे महाबळेश्वर ला जागतिक ओळख मिळाली.

हवामान    
•    या प्रदेशात वर्षभर गरम आणि अर्ध-शुष्क हवामान असते आणि सरासरी तापमान १९-३३ अंश सेल्सिअस असते.
•    एप्रिल आणि मे हे सर्वात गरम महिने असतात जेव्हा तापमान ४२ अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.
•    हिवाळा अत्यंत तीव्र असतो आणि रात्रीचे तापमान १० अंश सेल्सिअस पर्यन खाली जाऊ शकते, परंतु दिवसाचे सरासरी तापमान सुमारे २६ अंश सेल्सिअस असते.
•    प्रदेशात वार्षिक पाऊस सुमारे ७६३ मिमी होतो.

येथे काय करावे 
•    महाबळेश्वर मंदिर: हे भगवान शिव याचे मंदिर आहे जे हेमाडपंथी स्थापत्य शैलीचे एक उत्तम उदाहरण आहे.  चंद्रराव मोरे राजवंशाच्या काळात हे मंदिर १६ व्या शतकात बांधले गेले.
•    एल्फिन्स्टन पॉईंट: महाबळेश्वर मधील सर्वोच्च बिंदूंपैकी एक. १८३० मध्ये याचा शोध लागला.
•    प्रतापगड किल्ला: छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५८ मध्ये बांधला हा ऐतिहासिक महत्व असलेला किल्ला आहे.
•    मॅप्रो गार्डन: हे समृद्ध स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे ज्याने महाबळेश्वरच्या लोकप्रियतेमध्ये मोठ्या प्रमाणात योगदान दिले. येथे वार्षिक स्ट्रॉबेरी महोत्सव देखील आयोजित केले जाते.
•    बॉम्बे पॉइंट (सनसेट स्पॉट): येथे मावळत्या सूर्याच्या साक्षीने रंगांची उधळण बघू शकता.  हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात जुन्या ठिकाणांपैकी एक मानले जाते.
•    चायनामनचा धबधबा: मनमोहक चायनामन धबधबा महाबळेश्वरच्या कोयना खोऱ्याच्या दक्षिणेस आहे.
•    कॅथोलिक चर्च: टेकड्यांमध्ये असलेले हे चर्च खूप लोकप्रिय आहे.  हे १८ व्या शतकात ब्रिटिश नागरिकांनी बांधले.
•    ऑन व्हील्स: अंतहीन मजा, मनोरंजन आणि साहस याच्या शोधात असणारे लोक या मनोरंजन पार्कचा आनंद घेउ शकतात. रोमहर्षक राईड्स आणि मजेदार खेळांनी परिपूर्ण असे हे स्थळ आहे.
•    स्ट्रॉबेरी पिकिंग: स्ट्रॉबेरी हंगामात अनेक खाजगी शेतात हा मजेदार उपक्रम होतो ज्यामध्ये थेट शेतातून स्ट्रॉबेरी तोडण्याची संधी मिळते.

जवळची पर्यटन स्थळे    
•    सातारा (५६. ८ किमी) (१ तास ३४ मिनिटे)
कृष्णा आणि वेण्णा नद्यांच्या संगमाजवळ वसलेल्या शांत सातारा शहराची स्थापना सोळाव्या शतकात झाली. साताऱ्यात अनेक स्वप्नवत सुंदर ठिकाणे आणि ऐतिहासिक अवशेष आहेत. कास पठारावर ट्रेकिंग, ज्याला "फुलांची दरी" असेही म्हटले जाते, हे हजारो पर्यटकांना साताऱ्याकडे आकर्षित करणारे सर्वात प्रसिद्ध आकर्षण आहे.
•    पाचगणी (१९ किमी) (३४ मिनिटे)
पाच भव्य टेकड्यांना वेढलेले असल्याने याचे नाव पाचगणी पडले. हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक प्रसिद्ध हिल आहे. हे समुद्रसपाटीपासून सुमारे ४३७६ उंचीवर आहे. हे ठिकाण उंच पर्वत, शांत दऱ्या, धबधबे आणि घनदाट जंगलांनी भरलेले आहे. सिडनी पॉईंट, टेबल लँड, राजपुरी लेणी आणि धोम धरण ही ठिकाणे पाचगणीचे प्रमुख आकर्षण आहे.जी येथील सौंदर्य आणि मोहकता वाढवतात.
•    पुणे (११७. ३ किमी) (२ तास ३५ मिनिटे)
जर मुंबई हे महाराष्ट्रातील सर्वात जास्त गजबजलेले ठिकाण असेल तर त्याचा जवळील पुणे हे सांस्कृतिक केंद्र आणि राज्यातील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक आहे. एक आयटी सेंटर आणि एक आकर्षक शहर असलेल्या पुण्यात कशाचीच कमतरता नाही.  जे येथे आले आहेत किंवा या शहराबद्दल ऐकले आहे त्यांचा हा अनुभव आहे. लोहागढ आणि राजमाची किल्ल्यांवर ट्रेकिंग, कोलाड नदीतील कॅनोइंग आणि व्हाईट वॉटर राफ्टिंग आणि स्कूबा डायव्हिंगच्या पासून अंधारबनातील ट्रेकिंगच्या अनोख्या अनुभवापर्यंत, पुण्यात आणि जवळपास अनेक मनोरंजक गोष्टी आहेत.
•    अलिबाग (१६९. ७किमी)  (४ तास २४ मिनिटे)
मुंबईच्या सीमेच्या अगदी खाली वसलेले अलिबाग हे महाराष्ट्र राज्यातील एक छोटे किनारपट्टी शहर आहे. सोयीस्कर ठिकाणी वसलेले असल्याने ब्रिटिश राजवटीत हे शहर एक महत्त्वाचे धोरणात्मक बंदर म्हणून ओळखले जात असे. एक किनारपट्टी शहर असल्याने, अलिबागचे सौंदर्य मुख्यत्वे येथील विविध समुद्रकिनाऱ्यां मुळे आहे. चमचमत्या सोनेरी काळी वाळू आणि निळ्या लाटांनी नटलेले इथले स्वच्छ आणि झगमगते किनारे प्रेक्षणीय आहेत.
•    कोलाड (११०. २ किमी) (२ तास ५७ मिनिटे)
कोलाड हे मुंबईपासून ११० किलोमीटर अंतरावर महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील एक लहान गाव आहे. याला महाराष्ट्राचे ऋषिकेश म्हणून ओळखले जाते.असंख्य निसर्गरम्य दऱ्यांने आणि   धुक्याने वेढलेल्या डोंगरांनी आणि घनदाट सदाहरित जंगलांने भरलेले हे ठिकाण आहे. येथे हिरवीगार झाडे, स्वच्छ जल प्रवाह आणि शांत वातावरण या जागेच्या सौंदर्यात भर घालतात.

पर्यटन स्थळाला रेल्वे, हवाई, रस्ता (ट्रेन, उड्डाण, बस) द्वारे कसे जावे (अंतर आणि वेळेसह)    
•    सातारा, पुणे आणि मुंबई ही तीन महाबळेश्वरजवळ मोठी शहरे आहेत.
•    सर्वात जवळचे विमानतळ: नवीन पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ - १०९ किमी. (२ तास २७ मिनिटे).
•    रेल्वेमार्गे: महाबळेश्वरचे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन सातारा ७१. ३ किमी. (१ तास ४३ मिनिटे) आहे.
•    रस्तामार्गे: राज्य परिवहन आणि खाजगी बस मुंबई २६३ किमी. मार्गे पुणे (५ तास २६ मिनिटे), पुणे १२१ किमी. (२ तास ५९ मिनिटे), सातारा ५७ किमी. (१ तास ४२ मिनिटे) या ठिकाणांहून उपलब्ध आहेत.

विशेष खाद्य आणि हॉटेल    
महाबळेश्वर स्ट्रॉबेरी, चिक्की आणि गाजर यासाठी प्रसिद्ध आहे.  गेल्या काही वर्षांमध्ये या हिल स्टेशनवर भारतीय आणि जागतिक दोन्ही खाद्यप्रकार लोकप्रिय झाले आहेत. अनेक रेस्टॉरंट्स मध्ये आणि स्ट्रीट फूड विक्रेत्यांकडे सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ मिळतात.

जवळ उपलब्ध असलेली राहण्याची ठिकाणे, आणि हॉटेल, हॉस्पिटल, पोस्ट ऑफिस/ पोलीस स्टेशन  
•    महाबळेश्वर येथे बरीच हॉटेल्स आणि रिसॉर्ट उपलब्ध आहेत. 
•    महाबळेश्वर चे सरकारी हॉस्पिटल ६. २ किमी अंतरावर आहे. 
•    महाबळेश्वर सब-पोस्ट ऑफिस १. १ किमी. अंतरावर आहे. 
•    महाबळेश्वर पोलीस स्टेशन ऑफिस १. ८ किमी. अंतरावर आहे.

एमटीडीसी रिसॉर्ट ची माहिती    
एमटीडीसी रिसॉर्ट आणि हॉटेल महाबळेश्वर मध्ये उपलब्ध आहे. (१.८ किमी)

क्षेत्राला भेट देण्याचे नियम आणि वेळ, भेट देण्याचा सर्वोत्तम महिना    
महाबळेश्वरला भेट देण्याचा उत्तम काळ नोव्हेंबर ते फेब्रुवारी आहे. या वेळी तापमान १० ते २४ अंश सेल्सिअस दरम्यान जे फिरण्यासाठी आनंददायी असते. हा महाबळेश्वरचा स्ट्रॉबेरी पिकण्याचा हंगाम आहे. महाबळेश्वरला जाण्याचा आणखी एक चांगली काळ म्हणजे पावसाळा, जुलै ते ऑगस्ट दरम्यान.  जेव्हा येथे अप्रतिम हिरवळ असते. पण या काळात येथे भूस्खलन होण्याची बरीच शक्यता असते.

क्षेत्रात बोलल्या जाणाऱ्या भाषा    
इंग्रजी, हिंदी, मराठी.