• A-AA+
  • NotificationWeb

    Title should not be more than 100 characters.


    0

WeatherBannerWeb

Asset Publisher

About Malshej Waterfall (Pune)

पर्यटन स्थळे/ जागा यांची नावे आणि स्थळांचे थोडक्यात 3-4 ओळींमध्ये वर्णन

पश्चिम घाट महाराष्ट्र येथील मालशेज घाट हे प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. यात अनेक तलाव, धबधबे, पर्वत आणि वनस्पति आणि प्राण्यांची समृद्धता आहे. हे ठिकाण पर्वतारोही, ट्रेकर्स आणि निसर्ग प्रेमी यांच्यात प्रसिद्ध आहे.

जिल्हा/प्रदेश

ठाणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत.

इतिहास

मालशेज घाटाचा असा काही विशिष्ट इतिहास नाही. हे ठिकाण त्याची निसर्गरम्य दृश्ये, पक्षांची विविधता आणि धबधबे यासाठी प्रसिद्ध आहे.

भूगोल

मालशेज घाट हा ठाणे जिल्ह्यात, ठाणे आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवर आहे, त्याची सुमारे उंची 700 मीटर्स एवढी आहे. हा पुण्याहुन उत्तरेकडे 121 किमी अंतरावर आहे आणि मुंबईहुन ईशान्येकडे 129 किमी अंतरावर आहे.  

वातावरण/हवामान

या भागातील प्रमुख हवामान म्हणजे पाऊस आणि पावसाळया व्यतिरिक्त हवामान थंड कोरडे असते. या हंगामात तापमान 30 अंशपर्यन्त पोचते.

उन्हाळा उष्ण आणि कोरडा असतो आणि तापमान 40 अंश सेल्सियस पर्यन्त पोचते.

हिवाळ्यात वातावरण सौम्य असते ( सुमारे 15 अंश सेल्सियस), वातावरण थंड आणि कोरडे असते.

काय काय करू शकता  

मालशेज घाटात अनेक तलाव, धबधबे आणि डोंगर आहेत जे पर्यटकांना आकर्षित करतात. हे रॅप्लिंग, निसर्गात भटकंती, आणि कॅम्पिंग सारख्या साहसी उपक्रमांसाठी एक परिपूर्ण ठिकाण आहे.  

पर्यटन स्थळे/ जागा यांची नावे आणि स्थळांचे थोडक्यात 3-4 ओळींमध्ये वर्णन

  • पिंपळगाव जोगा धरणावर पक्षी निरीक्षण 19 किमी – 5 किमी लांबीचे पिंपळ गाव जोगा धरण भव्य पुष्पवती नदीवर बांधण्यात आले आहे, ज्यामुळे मालशेज घाटावर पर्यटक आकर्षित होतात. हे धरण गुलाबी फ्लेमिंगो, अल्पईन स्विफ्ट इत्यादि स्थलांतरित पक्ष्यांचे घर झाले आहे.

  • हरिश्चंद्रगड किल्ला : हरिश्चंद्र गड किल्ला हा समुद्रसपाटी पासून 1424 मीटर्स पेक्षा जास्त उंचीवर आहे , आणि हे 6 व्या शतकातील स्मारक आहे. बरेच उत्साही ट्रेकर्स आणि यात्रेकरू या ठिकाणी येतात.

  • अजोबा हिल फोर्ट ( 43 किमी) – आजोबा हिल फोर्ट सहसप्रेमी लोकांमध्ये लोकप्रिय आहे. हे ट्रेकर्सचे नंदनवन आहे कारण पायवाट हिरव्यागार लँडस्केप मधून जाते आणि हवामान थंड आणि शांत असते. रॉक क्लायंबिंग सारख्या उपक्रमांची येथे सोय येथे केली जाते

या पर्यटन स्थळावर रेल्वे, हवाई, रस्ता ( ट्रेन, विमान, बस) मार्गे कसे जायचे, अंतर आणि लागणार्या वेळासह

मुंबईहून मालशेज घाटाचे अंतर रस्त्याने 129 किमी एवढे आहे आणि पुण्याहून मालशेज घाट हे रस्त्याने 126 किमी आहे. कळ्यांहून राज्य परिवहन मंडळाच्या अनेक बस आहेत. मालशेज घाट मुंबई आणि पुण्याशी राज्य परिवहन मंडळाच्या ( एसटी) बसनी जोडलेला आहे

मालशेज घाटाला पोचायला जवळचे रेल्वे स्टेशन हे कल्याण आहे जे मालशेज घाटापासून सुमारे 85 किमी ( 2 तास 10 मिनिटे) वर आहे.

जवळचे विमानतळ हे 127 किमी ( 3 तास 46 मिनिटे) वरचे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.

विशेष अन्नपदार्थ वैशिष्ट्य आणि हॉटेल

रस्त्याच्या कडेला असलेल्या धाब्यांवर तुम्ही स्थानिक महाराष्ट्रियन पदार्थांची चव घेऊ शकता. ते साधारणपणे प्रसिद्ध मिसळ पाव, कांदापोहे, भजी इत्यादि देतात. पर्यटक घाटाच्या वर असलेल्या स्थानिक ठेल्यांवरून गरम मॅगी किंवा स्वीट कॉर्न खरेदी करू शकतात आणि सुंदर निसर्गा सोबत आनंद घेऊ शकतात.

जवळील राहण्याच्या व्यवस्था आणि हॉटेल/हॉस्पिटल/पोस्ट ऑफिस/पोलिस स्टेशन

मालशेज घाटाजवळ अनेक हॉटेल्स आणि रेसोर्ट्स उपलब्ध आहेत.

हेदवली सरकारी हॉस्पिटल हे मालशेज घाटापासून 25 किमी वर असलले जवळचे हॉस्पिटल आहे.

जवळचे पोस्ट ऑफिस हे 30 किमी वर ओतूर येथे आहे.

टोकवडे पोलिस स्टेशन ही मालशेज घाटाची पोलिस चौकी आहे जी घाट सुरू होतानाच आहे.

जवळच्या एमटीडीसी रिसॉर्टचा तपशील

एमटीडीसी रिसॉर्ट मालशेज घाटाजवळ उपलब्ध आहे.

भेट देण्याचे नियम आणि वेळ

भेट देण्यासाठी उत्तम महिना

मालशेज घाट हे मुंबई, पुणे, नाशिक येथील लोकांसाठी एक दिवसाच्या पिकनिक चे ठिकाण आहे. पावसाळ्यात पर्यटक मालशेज घाटाला भेट देऊ शकतात. पावसाळ्यात मालशेज घाट हिरव्यागार हिरवळीने व्यापलेला असतो आणि अनेक धबधबे पर्यटकांना या हंगामात आकर्षित करतात. मालशेज घाटाला भेट देण्याचा उत्तम कालावधी म्हणजे मान्सूनच्या माध्यापासून म्हणजेच ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. ट्रेकिंग साठी मालशेज घाटात जाण्यास उत्तम काळ म्हणजे हिवाळा आहे.

या भागात बोलली जाणारी भाषा

इंग्रजी, हिन्दी, मराठी.


Tour Package

Hotel Image
Blue Diamond Short Break Bustling Metropolis

2N 1Day

Book by:

MTDC Blue Diamond

Where to Stay

Responsive Image
MTDC Resort Malshej

MTDC resort is available near Malshej Ghat.

Visit Us

Tourist Guides

No info available