मालवण, सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र, भारत. मालवणी थाळी प्रामुख्याने प्रादेशिक भारतीय खाद्यपदार्थांच्या श्रेणीत येते. थाळीचा शाब्दिक अर्थ म्हणजे थाळी, पण इथे ती एका जेवणासाठी वेगवेगळ्या खाद्यपदार्थांनी भरलेली थाळी म्हणूनसंबोधली आहे. मालवणी थाळी मांसाहारी खाद्य पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. मालवणी पाककृतीमध्ये कोरडे किसलेले, तळलेले, नारळाची पेस्ट आणि नारळाचे दूध यासह विविध प्रकारांमध्ये नारळाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. अनेक मसाल्यांमध्ये वाळलेल्या लाल मिरच्या तसेच धणे, मिरपूड, जिरे, वेलची, आले आणि लसूण यांसारखे अतिरिक्त मसाले असतात. वाळलेली कोकम (अंसूल), चिंच आणि कच्चा आंबा देखील काही पाककृतींमध्ये (कैरी) वापरला जातो. मालवणी मसाला हा १५ ते कोरड्या मसाल्यांचा बनलेला वाळलेला पावडर मसाला आहे.
मालवणी खाद्यपदार्थांची खासियत म्हणजे नारळ आणि हा नारळ वेगवेगळ्या रुपात वापरला जातो. जसे की किसलेले ओला नारळ, सुके खोबरे, भाजलेले खोबरे आणि नारळाचे दूध. अनेक प्रकारच्या मसाल्यांमधे सुकी लाल मिरची आणि खडे मसाले जसे की धणे, मिरी, जिरे, दालचिनी, आलं, लसूण असे घातले जाते. काही खाद्यपदार्थांमधे कोकम, सुके कोकम, हळद, कच्चा आंबा देखील वापरला जातो. प्रसिद्ध मालवणी मसाला हा पंधरा ते सोळा खड्या मसाल्यांपासून बनवला जातो.
मालवणी थाळी मध्ये भाकरी (तांदळाची) आणि मांसाहारी पदार्थ असतात आणि प्रामुख्याने तांदूळ वापरला जातो. यामधे आंबोळी, घावन, भाकरी हे तिन्ही पदार्थ तांदुळाचे बनवले जातात. कोकणात कोंबडी वडे किंव्हा मटण वडे फार प्रसिद्ध आहेत. जे तांदळाच्या पिठाचा वापर करून बनविले जातात. हे वाडे चिकन आणि मटणा सोबत खाल्ले जातात. अनेक मालवणी मांसाहारी पदार्थांमध्ये कोणत्याही प्रकारचा रस्सा हा "मालवणी मसाला" जसे कि खोबरं, आलं, लसूण घालून बनवतात. मालवणी थाळीत मुख्य पदार्थां सोबत तोंडी लावण्यासाठी कोलंबी आणि वेग वेगळ्या प्रकारची लोणची दिली जातात.
शाकाहारी जेवणामध्ये काळ्या वाटाण्याची उसळ असते. सोलकढी हे पेय मालवणी थाळीचे चैतन्य आहे. सोलकढी हि नारळाचे दूध आणि कोकमपासून बनते. सोलकढी हि मालवणी जेवणातला टाळता न येण्यासारखा पदार्थ आहे. मालवणच्या या खाद्यपदार्थांचा मूळ इतिहासाची नोंद कुठेच नाही. परंतु हे खाद्यपदार्थ कालांतराने विकसित झाले. मालवणी थाळी ही मालवणची खासियत आहे. ती विविध प्रसंगी विविध पद्धतीने वाढली जाते. खास मालवणी खाद्यपदार्थ विशिष्ट कार्यक्रमांना, सणांना आणि उत्सवांना आवर्जून बनवले जातात.
Images