• स्क्रीन रीडर प्रवेश
  • A-AA+
  • NotificationWeb

    Title should not be more than 100 characters.


    0

Asset Publisher

माणिक डोह

पर्यटन स्थळे/ जागा यांची नावे आणि स्थळांचे थोडक्यात ३-४ ओळींमध्ये वर्णन

माणिक डोह धरण हे जुन्नर जवळ कुकडी नदीवरील धरण आहे. हे धरण सिंचन आणि जलविद्युत निर्मितीसाठी बांधण्यात आले होते.

जिल्हा/प्रदेश

पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत

इतिहास

धरण गुरुत्वाकर्षण पद्धतीने काम करणार्या धारणांच्या श्रेणीत येते. जुन्नरला ऐतिहासिक महत्व आहे त्याने प्रस्थापित काळापासून व्यापार आणि राजकीय केंद्र म्हणून काम केले आहे. शिवनेरी हा जवळचा किल्ला हे मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान आहे. ९ जानेवारी २०१८ रोजी महाराष्ट्र सरकारने जुन्नरला पुनहे जिल्ह्यातील पहिलं पर्यटन तालुका म्हणून घोषित केले.

भूगोल

हे धरण घोडं खोर्यात आहे आणि कुकडी प्रकल्पाचा एक भाग आहे , ज्यात या भागातील पाच धरणे बांधली गेली आहेत. भौगोलिक दृष्ट्या कोकण परिसराच्या काठावर सह्याद्रि पर्वतरांगांनी वेढलेले आहे.

वातावरण/हवामान

या परदेशात हवामान वर्षभर उष्ण आणि काहीसे कोरडे असते आणि सरासरी तापमान सुमारे १९ अंश ते ३३ अंशा सेल्सियस असते.

एप्रिल आणि मे हे सगळ्यात उष्ण महीने असतात जेव्हा तापमान ४२ अंश सेल्सियस पर्यन्त जाते.

हिवाले तीव्र असतात, आणि हवामान रात्री १० अंश सेल्सियस पर्यन्त खाली येते, परंतु सरासरी दिवसाचे हवामान हे सुमारे २६ अंश सेल्सियस पर्यन्त असते.

वार्षिक सरासरी पर्जन्यमान हे सुमारे ३५०० मिमी पर्यन्त असते.

काय काय करू शकता  

कुटुंबासह एक दिवसीय सहल, ट्रेकिंग आणि पक्षी निरीक्षण यासाठी हे चांगले ठिकाण आहे. या प्रदेशात आणखी पाच धरणे आहेत आणि काही जलक्रीडा उपक्रम देखील चालतात.

पर्यटन स्थळे/ जागा यांची नावे आणि स्थळांचे थोडक्यात ३-४ ओळींमध्ये वर्णन

  • मालशेज घाट : मालशेज घाटात अनेक तलाव, धबधबे, आणि सुंदर  डोंगर आहेत जे पर्यटकांना आकर्षित करतात. ट्रेकिंग, पक्षी निरीक्षण, धबधब्यामध्ये राप्प्लिंग, निसर्गातील भटकंती आणि कॅम्पिंग सारख्या साहसी उपक्रमांसाठी हे परिपूर्ण ठिकाण आहे.
  • पिंपळगाव जोगा : पिंपळगाव जोगा धरण हे जुन्नर जवळील कुकडी नदीची उपनदी पुष्पवती नदीवरील मातीचे धरण आहे. हे मालशेज घाटाच्या परिसरात आहे. हे सुंदर ठिकाण विविध ऋतूंमध्ये वेगवेगळी सुंदर दृश्य दिसतात. गुलाबी फ्लेमिंगो, अल्पईन स्विफ्ट इत्यादि स्थलांतरित पक्ष्यांसाठी हे धरण जणू दुसरे घरच आहे.
  • शिवनेरी किल्ला : हा भारतातील सर्वात मजबूत किल्ल्यां पैकी एक आहे. शिवनेरी किल्ला १७ व्या शतकातील जुन्नर जवळील लष्करी तटबंदी आहे. मराठा साम्राज्याचे सम्राट आणि संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान आहे.
  • हरिश्चंद्र गड : हरिश्च्नद्र गड किल्ला हेव्या शतकातील स्मारक आहे आणि याची समुद्रसपाटी पासुनची ऊंची १४२४ मीटर आहे. बरेच ट्रेकिंग उत्साही आणि यात्रेकरू या ठिकाणी भेट देतात.
  • नाणेघाट : नाणघाट किंवा नाणा  घाट म्हणूनही ओळखले जाते. हा कोकण किनारपट्टी आणि दक्खन पाठरावरील जुन्नर या प्राचीन शहरा दरम्यान पश्चिम घाट रांगेतील पर्वत रस्ता आहे. ट्रेकिंग प्रेमींसाठी हे प्रमुख आकर्षण आहे.   
  • जीवधन किल्ला : जीवधन हा जुन्नर तालुक्यातील घाटघर जवळील किमी अंतरावर डोंगरी किल्ला आहे. किल्ला सह्याद्रि पर्वत रांगेत आहे.
  • लेण्याद्री बौद्ध कालीन लेणी: लेण्याद्री ज्याला काही वेळा गणेश लेण, गणेश पहाड लेणी असे संबोधले जाते, सुमारे ३० बौद्ध लेण्यांची एक मालिकाच आहे जी माणिक डोह धरणाच्या पूर्वेला सुमारे १८.७ किमी अंतरावर खडकमध्ये कोरलेली आहे.
  • बिबट्या बचाव केंद्र माणिकडोह : या केंद्रात ३० पेक्षा जास्त बिबट्यांचे वास्तव्य आहे आणि येथे गावकर्यांनाकडून जखमी झालेले किंवा संघर्षात असलेल्या बिबट्यांची तात्पुरती किंवा आजीवन काळजी घेतली जाते

या पर्यटन स्थळावर रेल्वे, हवाई, रस्ता ( ट्रेन, विमान, बस) मार्गे कसे जायचे, अंतर आणि लागणार्या वेळासह

मुंबई १६६ किमी (४ तास ५५ मिनिटे), पुणे १०६ किमी ( २ तास ५७ मिनिटे), नाशिक १६३ किमी ( ३ तास २६ मिनिटे ) अशा शहरांमधुन राज्य परिवहन मंडळ, खाजगी गाड्या, लक्झरी बस उपलब्ध आहेत.

जवळचे विमानतळ : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ १०१ किमी ( २ तास ४१ मिनिटे

जवळचे रेल्वे स्टेशन : पुणे रेल्वे सटीओण १०४ किमी ( तास ५५ मिनिटे )

विशेष अन्नपदार्थ वैशिष्ट्य आणि हॉटेल

दिल्या जाणार्या पाककृतींचा भेद इथे मोठ्या प्रमाणावर आहे, इथे उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय पाककृती प्रसिद्ध आहेत. परंतु येथील प्रादेशिक पदार्थ ज्यामध्ये भात आणि मासे जे पाकृतीचा सगळ्यात महत्वाचा घटक आहे तेही चव घेणासाठी निवडता येतात

जवळील राहण्याच्या व्यवस्था आणि हॉटेल/हॉस्पिटल/पोस्ट ऑफिस/पोलिस स्टेशन

जुन्नर मध्ये जवळच हॉटेल्स आणि निवासी सोयी उपलब्ध आहेत.

१४.२ किमी वर जुन्नर मध्ये ग्रामीण रुंगणलाय उपलब्ध आहे.

जवळचे पोस्ट ऑफिस १३.८ किमी वर जुन्नर येथे आहे.

जवळचे पोलिस स्टेशन १३.७ किमी अंतरावर  जुन्नर येथे आहे.

 

जवळच्या एमटीडीसी रिसॉर्टचा तपशील

एमटीडीसी रिसॉर्ट मालशेज घाट येथे आहे.

 

भेट देण्याचे नियम आणि वेळ

भेट देण्यासाठी उत्तम महिना

या ठिकाणी वर्षभर येता येते पण उत्तम कालावधी हा पावसाळा आहे भोवतीचे सह्याद्रिने वेढलेले नैसर्गिक दृश्य हे विहंगम असते.

या भागात बोलली जाणारी भाषा

इंग्रजी, हिन्दी, मराठी.