• स्क्रीन रीडर प्रवेश
  • A-AA+
  • NotificationWeb

    Title should not be more than 100 characters.


    0

Asset Publisher

म्हैसमाळ

म्हैसमाळ हे भारताच्या महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात वसलेले एक हिल स्टेशन आहे. हे हिल स्टेशन घनदाट हिरवळ, डोंगर आणि जंगलाने वेढलेले पठार आहे जे स्वर्गीय अनुभूती देते.


जिल्हा/प्रदेश
औरंगाबाद जिल्हा, महाराष्ट्र, भारत.

इतिहास    
म्हैसमाळ भगवान शिव यांच्या प्राचीन मंदिराचे अवशेष आहेत.

भूगोल
म्हैसमाळ हे औरंगाबाद जिल्ह्यातील एक हिल स्टेशन आहे. हे समुद्रसपाटीपासून १०६७ मीटरपेक्षा जास्त उंचीवर सह्याद्री पर्वतरांगाने वेढलेले ठिकाण आहे.

हवामान    
•    या प्रदेशात उष्ण आणि कोरडे हवामान असते.उन्हाळा हा, हिवाळा आणि मान्सूनपेक्षा अधिक तीव्र असतो, जेव्हां तापमान ४०.५ अंश सेल्सिअस पर्यंत जाते. 
•    हिवाळा सौम्य असतो आणि सरासरी तापमान २८-३० अंश सेल्सिअस पर्यंत असते.
•    मान्सून बराच तीव्र असतो आणि वार्षिक पाऊस सुमारे ७२६ मिमी असतो.

येथे काय करावे      
म्हैसमाळ येथे सनसेट पॉईंट, व्हॅली व्ह्यूपॉईंट, नेकलेस पॉईंट सारखी ठिकाणे आहेत जेथे पर्यटक भेट देऊ शकतात. पर्यट क गिरिजा देवी मंदिर, बालाजी मंदिर, बोटॅनिकल वर्कशॉप सारख्या ठिकाणी जाऊ शकतात.  जुने जैन मंदिर या ठिकाणी कलेचे अप्रतिम प्रदर्शन बघण्यास मिळते. वाघोरा धबधबा आणि बानी बेगम गार्डनही देखील भेट देण्यासाठी उत्तम ठिकाणे आहेत. 

जवळची पर्यटन स्थळे    
•    घृष्णेश्वर मंदिर: एलोरा येथे स्थित घृष्णेश्वर मंदिर हे भारतातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक, आणि युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. 
•    औरंगाबादमधील हे ज्योतिर्लिंग भगवान शिव यांना समर्पित असून ते एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते. घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंगांपैकी सर्वात लहान आहे. ते १२ वे आणि शेवटचे ज्योतिर्लिंग मानले जाते. (१८ किमी)
•    अजिंठा लेणी: अजिंठा लेणी ३ रॉक-कट बौद्ध लेण्यांचा संच.  यांचा काळ ईसापूर्व २ शतके आणि ६५० सीई दरम्यानचा समजला जातो. अजिंठा लेणी भारतातील सर्वात प्रतिष्ठित स्मारकांपैकी एक आहेत कारण त्यामध्ये भारताची समृद्ध सांस्कृतिक वारसा दर्शविणारी अनेक सुंदर चित्रे आणि शिल्पे दिसतात. (११० किमी)
•    एलोरा लेणी: एलोरा लेणी म्हणजे आणखी एक जागतिक वारसा स्थळ आहे जे औरंगाबादमध्ये असताना कुणीही चुकवू नये. ही शिल्पे तीन धर्मांच्या घटकांचे प्रतिनिधित्व करतात आणि अत्यंत भव्यपणे आणि सुंदररीत्या मांडतात. (१४ किमी)
•    दौलताबाद किल्ला: दौलताबाद किल्ल्यातील सर्वात महत्त्वाच्या पैलूंपैकी एक म्हणजे त्याची रचना आहे, जी त्याला मध्ययुगीन काळातील सर्वात शक्तिशाली किल्ल्यांपैकी एक बनवते. हे ६५६ फूट उंच शन्क्वाकार टेकडीवर बांधलेला किल्ला आहे.  टेकडीवर बांधलेला असल्यामुळे या भव्य किल्ल्याला सामरिक स्थिती, स्थापत्य सौंदर्य आणि शत्रूंपासून संरक्षण मिळते.  बलाढ्य देवगिरी किल्ल्याचा आणखी एक अनोखा पैलू म्हणजे त्याची अभियांत्रिकी प्रतिभा, ज्याने शत्रू सैन्यापासून केवळ अभेद्य संरक्षणच दिले नाही तर पाण्याच्या स्त्रोतांचे देखील उत्तम प्रकारे व्यवस्थापन केले होते. (२० किमी)
•    सलीम अली सरोवर आणि पक्षी अभयारण्य: औरंगाबाद येथे दिल्ली गेटजवळ हिमायत बाग समोर, सलीम अली सरोवर (तलाव) आहे, जो सलीम अली तालाब म्हणून प्रसिद्ध आहे. हे शहराच्या उत्तर भागात स्थित आहे. मुघल काळात ते खिझिरी तालाब म्हणून ओळखले जात असे. महान पक्षीशास्त्रज्ञ आणि निसर्गवादी सलीम अली यांच्या नावावरून हे नाव बदलण्यात आले. यात औरंगाबाद महानगरपालिकेने देखरेख केलेली बाग आणि एक पक्षी अभयारण्य आहे. (३९ किमी.)

पर्यटन स्थळाला रेल्वे, हवाई, रस्ता (ट्रेन, उड्डाण, बस) द्वारे कसे जावे (अंतर आणि वेळेसह)    
•    राज्य परिवहन तसेच खासगी बसेस, महाराष्ट्रातील प्रत्येक प्रमुख बस डेपो औरंगाबाद साठी उपलब्ध आहेत, पुणे २३६ किमी. (५ तास ३० मिनिटे), मुंबई ३३५ किमी. (८ तास नाशिक १८२ किमी. (५ तास १० मिनिटे). औरंगाबाद येथून म्हैसमाळसाठी बस उपलब्ध आहेत.
•    सर्वात जवळचे विमानतळ: - चिकलठाणा विमानतळ, औरंगाबाद ४४.८ किमी. (१ तास ३० मिनिटे)
•    सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन: - दौलताबाद रेल्वे स्टेशन ३१ किमी. (५५ मिनिटे)

विशेष खाद्य आणि हॉटेल    
मराठवाड्याचा प्रदेश मसालेदार पदार्थ नान खलिया मांसाहारी पदार्थआणि इतर पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे.
जवळ उपलब्ध असलेली राहण्याची ठिकाणे, आणि हॉटेल, हॉस्पिटल, पोस्ट ऑफिस/ पोलीस स्टेशन      
•    म्हैसमाळपासून १२ किमी.च्या परिघात विविध हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स उपलब्ध आहेत.
•    म्हैसमाळपासून १२ किमी. अंतरावर ग्रामीण रुग्णालय आहे.
•    सर्वात जवळचे पोस्ट ऑफिस खुलताबाद येथे १२ किमी. अंतरावर आहे.
•    सर्वात जवळचे पोलीस स्टेशन खुलताबाद येथे १२. ५ किमी. अंतरावर आहे.

एमटीडीसी रिसॉर्ट ची माहिती    
एमटीडीसी रिसॉर्ट औरंगाबाद मध्ये उपलब्ध आहे. (३६ किमी)
    
क्षेत्राला भेट देण्याचे नियम आणि वेळ, भेट देण्याचा सर्वोत्तम महिना    
म्हैसमाळ ला भेट देण्याचा उत्तम काळ पावसाळा आहे. तसे वर्षभर येथे तापमान मध्यम असते. पावसाळ्याच्या काळात, म्हणजे जून ते सप्टेंबर महिन्यादरम्यान, या हिल स्टेशन वर भरपूर हिरवळ असते. पावसाळ्यात दऱ्या आणि टेकड्यांचे लँडस्केप अधिकच सुंदर बनते.
 
क्षेत्रात बोलल्या जाणाऱ्या भाषा
इंग्रजी, हिंदी, मराठी.